नागरिकांनी समस्येचा वाचला पाढा
चंद्रपूर/ विशेष प्रतिनिधी:
ग्रामीण भागातील खेड्यांचा लवकरात लवकर विकास व्हावा या अनुशंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी प्रत्येक खासदाराने आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन ते २०१६ सालापर्यंत आदर्श करून दाखवयाचे होते. शिवाय २०१९सालापर्यंत दोन गावे आदर्श केली असावीत असा आदेश देशातील सर्व खासदारांना दिला होता. या अभियानाला ११ ऑक्टोबर २०१४ ला सुरवात देखील झाली. मात्र तब्बल ४ उलटूनही ‘अच्छे दिन’ असल्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकार मधील केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी घेतलेल्या भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावल नागरिकांना मुलभूत सोई सुविधान पासून वंचित असल्याची बाब काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पत्रकारांसमक्ष गावाची पाहणी केली असता पुढे आली.
हंसराज अहीर यांनी सांसद आदर्श गाव योजनेअंतर्गत २०१४ साली भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा हे गाव दत्तक घेतले.या गावात काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली व त्या गावाची दत्तक गाव योजने अंतर्गत केलेल्या कामाची पाहणी केली असता पाणी, वीज रस्ते, घरकुल, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच स्वच्छतेबाबत येथील स्थानिक नागरिकांनी जणू पाढाच वाचला.

गावात डॉक्टर नाही. पाणी, वीज रस्ते, घरकुल, प्राथमिकआरोग्य केंद्र आरोग्य सुविधा नाही,४०० रूपये भरून पाण्याचे एटीएमसुद्धा काढले मात्र पाणी नाही,सातबारा काढण्यासाठी पटवारी गावात येत नाही,बस फेऱ्या अपुऱ्या आहेत.येथील ग्रामपंचायत सदस्य वैशाली दडमल म्हणाल्या, ना. अहीर गावात आलेच नाही. समस्यांबाबत आमदार बाळू धानोरकर यांना सुद्धा सांगितले तरीही काहीच होत नसल्याची खंत व्यक्त केली.
चंदनखेडामध्ये पायाभूत व मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने याला आदर्श गाव कसे म्हणता येईल. ना. अहीर यांनी दत्तक घेतलेल्या चंदनखेडा या गावाची अशी दैना असेल तर इतर गावांची काय अवस्था असावी याचा अंदाजही व्यावेळी व्यक्त करण्यात आला.

हि तर चंदनखेडाची थट्टा- आ. वडेट्टीवार
फक्त फलकावर आदर्श चंदनखेडा गाव लिहिले आहे. मात्र गाव बघितले तर भकास .चार वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील गाव काय आहे ते पाहायला चंदनखेडा गावात आलो असता खासदारांना मिळणाऱ्या निधीतून गावासाठी एक रूपयाही दिला नाही व आदर्श गाव चंदनखेडासाठी विशेष निधीही आणला नाही.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंदनखेडा गाव दत्तक घेऊन गावाची व नागरिकांची थट्टा केली आहे. असा गंभीर आरोप विधानसभेतील कॉंग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, डॉ. विजय देवतळे उपस्थित होते.