रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्स,सब इन्स्पेक्टरच्या ९७३९ जागांसाठी अशी होईल भरती प्रक्रिया-
भरती प्रक्रियेचे तीन टप्पे-
१. संगणकाधारित चाचणी
२. शारिरीक पात्रता चाचणी व शारिरीक मोजमाप चाचणी
३. कागदपत्रांची पडताळणी
१. संगणकाधारित चाचणी -
महाराष्ट्रातील उमेदवारांना ही चाचणी मराठीतून देता येईल
परीक्षेचा दर्जा हा पदवीच्या स्तराचा असेल
प्रत्येक बरोबर प्रश्नाला एक गुण तर १/३ गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरातून होणार वजा
चाचणी कालावधी- ९० मिनिटे
प्रश्नांची संख्या- १२०
विषयनिहाय गुण- सामान्य ज्ञान (५० गुण), अंकगणित (३५ गुण) आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि तार्किक (३५ गुण)
२. शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणी-
संगणकाधारित चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांना शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणीसाठी बोलावले जाणार
कॉन्स्टेबल्स पदासाठी शारिरीक पात्रता चाचणी-
पुरुष उमेदवारांसाठी -
● १६०० मीटर ५ मि. ४५ सेकंदात धावणे
● उंच उडी- ४ फूट
● लांब उडी- १४ फूट
महिला उमेदवारांसाठी-
● ८०० मीटर ३ मि. ४० सेकंदात धावणे
● उंच उडी- ३ फूट
● लांब उडी- ९ फूट
सब इन्स्पेक्टर पदासाठी शारिरीक पात्रता चाचणी-
पुरुष उमेदवारांसाठी-
● १६०० मीटर ६ मि. ३० सेकंदात धावणे
● उंच उडी- ३ फूट ९ इंच
● लांब उडी- १२ फूट
महिला उमेदवारांसाठी-
● ८०० मीटर ४ मिनिटात धावणे
● उंच उडी- ३ फूट
● लांब उडी- ९ फूट