चंद्रपूर जिल्हयातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओ.बी.सी. प्रवर्गातील युवक व युवतीकरिता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी व संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, वाहतुक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय,तांत्रिक व्यवसाय, अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी स्थानिक राष्ट्रीयकृत बॅक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून 20 टक्के बिज भांडवल योजना सुरु केला आहे.
तसेच किरकोळ व्यवसाय अथवा अन्य तांत्रिक लघु सेवा उद्योग सुरु करण्यासाठी महामंडळाची 25 हजार रुपयाची थेट कर्ज योजना सुरु केली आहे. त्या योजनामध्ये 20 टक्के व्याज दराने परतफेडीचा कालावधी 3 वर्षे आहे.तरी सर्व मागासवर्गीय (ओ.बी.सी.ना ) व इतर इच्छूकांनी सदर योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,चंद्रपूर यांनी कळविले आहे.अधिक माहितीसाठी खालील पत्यावर संपर्क साधावा. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जलनगर चंद्रपूर येथे संपर्क साधावा असे,जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.