जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2018 रोजी सकाळी 8 वाजता महानगर पालिका पटांगण, गांधी चौक चंद्रपूर येथून निसर्ग संवर्धन व पर्यावरण जनजागृती वाढविण्यासाठी भव्य संयुक्त रॅलीचे आयोजन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर तर मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक ऋषीकेश रंजन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी, जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोत्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहे. या रॅलीमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे या वर्षीच्या 13 कोटीच्या वृक्ष लागवडीच्या अभियानाला यशस्वी करावे, असे आवाहन वन विभाग, वन्यजीव विभाग व वन विकास महामंडळाने जनतेला केले आहे.