चंद्रपूर जिल्हयातील शेती प्रामुख्याने पर्जन्य आधारीत असून,85 टक्के क्षेत्र कोरडवाहू पीकाखाली आहे.कधी अवर्षण तर कधी अतीवृष्टी,तसेच पावसातील खंड,किड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येते.या सर्व बाबीचा विचार करुन शासनाने खरीप हंगाम 2018-19 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात निर्णय घेतला असून, या योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतीम मुदत 31 जुलै 2018 व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतीम मुदत 24 जुलै 2018 अशी आहे.
तरी अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित पिके घेणारे, कुळाने अगर भाडेकराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजने भाग घेण्यास पात्र आहेत. चंद्रपूर जिल्हयातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता आयसी आयसी आय लोंबार्ड जनरल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीची शासनामार्फत नेमणूक करण्यात आली आहे.या योजनेअतंर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयांची विमा हप्ता रक्कम तपशील खालील प्रमाणे आहे.
पिकाचे नाव भात (तांदूळ) विमा संरक्षित एकूण 4000, शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 800 रुपये प्रती हेक्टर. पिकाचे नाव (ज्वारी) विमा संरक्षित एकूण 24000 शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 480 रुपये /प्रति हेक्टर पिकाचे नाव (सोयाबीन) विमा संरक्षित एकूण 42000/- शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 840 प्रती हेक्टर. पिकाचे नाव (मूग) विमा संरक्षित एकूण 18900 शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता – 378 रुपये प्रती हेक्टर. पिकाचे नाव (उडीद) विमा संरक्षित एकूण 18900 शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 378 रुपये प्रती हेक्टर. पिकाचे नाव (तुर) विमा संरक्षित एकूण 31500 शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 630 रुपये प्रती हेक्टर. पिकाचे नाव (कापूस) विमा संरक्षित एकूण 42000 शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 2100 रुपये प्रती हेक्टर या प्रमाणे भरणा करावयाची आहे.
विमा संरक्षणी बाबी:- पीक पेरणी पासून काढणी पर्यतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट.पीक पेरणीपूर्व लावणीपूर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गीक आपती, खरीप हंगाम 2018 पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बॅकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेले बॅक खाते पुस्तकांची प्रत,तसेच आधारकार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.आधारकार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती सोबत खालीलपैकी कोणतेही एक फोटो असलेला ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
मतदान ओळखपत्र किंवा किसान क्रेडिटकार्ड किंवा नरेगा जॉबकार्ड किंवा वाहनचालक परवाना.खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बॅकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बॅकेशी संपर्क करावा अर्ज भरण्यासाठी बॅकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अर्ज भरण्यांसा सुलभता यावी म्हणून येत्या खरीप हंगामपासून शेतकऱ्यांचे अर्ज व विमा हप्ता COMMON Service Centre( सीएससी) मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.याकरीता जिल्हयात सी.एस.सी.ई.गव्हेनंस सर्व्हीसेस इंडीया लिमीटेड द्वारे कार्यान्वीत आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज भरण्यास मदत करतील व विमा हप्ता स्विकारतील याकरीता प्राधिकृत आपले सरकार सेवा केंद्राचे चालक विमा योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरतील.विमा प्रस्ताव करीता आवश्यक कागदपत्रे जसे की 7/12 उतारा,आधारकार्ड,बॅकखात्याचा तपशील इत्यादी अर्जास ऑनलाईन पध्दतीने जोडतील.शेतकऱ्यांना विमा अर्जाची प्रत व पोहोच उपलब्ध करुन देतील.
राज्य शासनामार्फत राज्यात महावेध प्रकल्पातर्गत चंद्रपूर जिल्हयात 50 स्वयंचलीत हवामान केंद्रा द्वारे प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहितीचा मुख्यत: पीक विमा योजना तसेच शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी कृषी व हवामान संशोधनासाठी,आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि अन्य क्षेत्रामध्ये उपयोग होणार आहे.महावेध प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे तापमान,पर्जन्यमान,सापेक्ष आर्द्रता,वाऱ्याचा वेग व दिशा या हवामान विषयक घटकांची (रिअल टाईम)माहितीची नोंद दर 10 मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.