সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 06, 2018

वर्ध्याच्या आजनसरा येथे होणार ‘आॅक्सिजन पार्क’

'Oxygen Park' to be organized at Ajnsara | आजनसरा येथे होणार ‘आॅक्सिजन पार्क’वर्धा/प्रतिनिधी:
हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान विदर्भातील व विदर्भाबाहेरील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. येथे दररोज भाविकांची मोठी गर्दीही असते. याच परिसरात ‘आॅक्सिजन पार्क’ तयार व्हावे अशी मागणी होती. त्याला मुर्त रुप देण्यासाठी उपविभागी महसूल अधिकारी समाधान शेंडगे व तहसीलदार यादव यांनी झुडपी जंगल जागेची पाहणी केली. ही संकल्पना आ. समीर कुणावार यांची आहे, हे विशेष.
मंदिर देवस्थानचे नवनियुक्त विश्वस्त डॉ. विजय पर्बत हे पदावर रुजू झाल्याबरोबर त्यांनी आपल्या विकासात्मक दृष्टिकोनातून स्वच्छता व सौंदर्यीकरणावर विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. त्यांना आ. समीर कुणावार यांचे सहकार्य लाभत आहे. देवस्थान विकासा सोबतच नागरिकांचे निरोगी आरोग्य हा हेतू केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या वृक्षलागवड व सौंदर्यीकरण योजनेंतर्गत आजनसरा परिसरात ‘आॅक्सिजन पार्क’ तयार करण्याची संकल्पना आ. कुणावार यांनी सूचविली आहे. तशी मागणीही वनविभागील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.
नुकतेच उपविभागीय महसूल अधिकारी समाधान शेंडगे व तहसीलदार सचिन यादव यांनी ‘आॅक्सिजन पार्क’ प्रकल्पासाठी झुडपी जंगल जागेचे सर्वेक्षण केल. या प्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष धनराज मेश्राम, शिवदास पर्बत, रमेश ठाकरे, नामदेव गाढवे, राजेंद्र ढवळे, माजी सरपंच नरेंद्र पाटील, मनोहर चांभारे, विजय आष्टणकर, किसना पाटील, मंडळ अधिकारी लभाणे आदींची उपस्थिती होती.
पटवून दिले जाणार वृक्षाचे महत्त्व
आजनसरा येथे होऊ पाहणाऱ्या आॅक्सिजन पार्कच्या माध्यमातून या पार्कमध्ये येणाऱ्यांना मनुष्यांसह इतर प्राणीमात्रा जगण्यासाठी वृक्ष किती महत्त्वाचे आहेत हे पटवून दिल्या जाणार आहे. सदर आॅक्सिजन पार्कची संकल्पना आ. कुणावार यांची असून ती हा प्रकल्प पुर्णत्त्वास जाण्यासाठी धडपड करीत आहेत.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.