সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, June 30, 2018

 चंद्रपूर वीज केंद्रातील संच होऊ शकतात बंद

चंद्रपूर वीज केंद्रातील संच होऊ शकतात बंद

संबंधित इमेजचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.तीन हजार मेग़ावॅट वीज निर्मिती क्षमता या केंद्राची आहे. ते बंद झाल्यास राज्यात वीजेचे संकट निर्माण होऊ शकते. याचा धरणावरून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. ते एकमात्र स्त्रोत आहे. परिणामी शहरात सुद्धा पाणी टंचाई होऊ शकते. सध्या धरणात १८ दलघमी पाणीसाठा आहे. वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने सुद्धा १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सून सुरू होऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १५० मि.मी.च्यावर पाऊस पडला आहे.


ओबीसी समाजावरील अन्याय दूर करा

ओबीसी समाजावरील अन्याय दूर करा

Remove injustice from OBC community | ओबीसी समाजावरील अन्याय दूर करागोंदिया/प्रतिनिधी:
 वैद्यकीय शिक्षणात नियमानुसार ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत केवळ २ टक्के आरक्षण देऊन ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आला आहे. ओबीसींना २७ टक्के आरक्षण देऊन ओबीसी समाजावरील अन्याय दूर करावा, अन्यथा ओबीसी समाजाच्या वतीने देशव्यापी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत प्रधानमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी दिलेल्या निवेदनातून मागील काही वर्षापासून ओबीसी समाज आपल्या न्याय हक्कासाठी शासनाशी संघर्ष करीत आहे. नियमानुसार वैद्यकीय शिक्षणात २७ टक्के आरक्षणाची तरतूद असताना यावर्षी राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेत केवळ २ टक्के प्रवेश देण्यात आला. हा देशभरातील ओबीसी समाजावर मोठा अन्याय आहे. ही बाब आरोग्य मंत्र्याच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती निवेदनातून पंतप्रधानांना करण्यात आली आहे.
यापूर्वी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने १७ फेब्रुवारी २०१८ रोजी ओबीसी बांधवाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे हे सरकार ओबीसी समाज बांधवाच्या विकासाच्या बाबतीत उदासीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओबीसी समाज बांधवांच्या मागण्या तत्काळ मार्गी लावाव्या, अन्यथा ओबीसी समाज बांधव आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ओबीसीला २७ टक्के आरक्षण देण्यात यावे.
ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पूर्ववत देण्यात यावी. मागासवर्गीय आयोगांवर ओबीसी समाजबांधवांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरु करावे. ओबीसीची जातीनिहाय जनगणना जाहीर करुन नितीआयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला ५ हजार कोटी भांडवल द्यावे. उद्योग व्यवसायासाठी १० लाखांपर्यंत कर्ज मर्यादा वाढवावी. क्रिमिलेयरची अट रद्द करावी. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. मंडल कमिशनची १०० टक्के अमंलबजावणी करावी. शेतकºयांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे. शेतकºयांच्या तरुण मुलांना उद्योगासाठी शून्य व्याज दरावर कर्ज उपलब्ध करुन द्यावे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगर पालिकाप्रमाणे ओबीसींना विधानसभा व लोकसभेत २७ टक्के आरक्षण द्यावे.
तीन वर्षापासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रीशिप तत्काळ अदा करण्यात यावी व बंद केलेले शैक्षणिक कर्ज पूर्ववत करण्यात यावे, स्पर्धा परीक्षेत महिलांसाठी असलेली क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी. क्रिमिलेअरच्या अटीमुळे आयएएसच्या प्रक्रियेतून बाद ठरविलेल्या १६०० ओबीसी विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात यावी, आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.
शिष्टमंडळात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, विनोद हरिणखेडे, प्रभाकर दोनोडे, अशोक शहारे, राजलक्ष्मी तुरकर, देवचंद तरोणे, जितेश टेंभरे, बालकृष्ण पटले, नानू मुदलियार, सचिन गोविंद शेंडे, सुनील पटले, डॉ. किशोर पारधी, अजय हलमारे, प्रमोद लांजेवार, एकनाथ वहिले, चंद्रकुमार चुटे, जयंत कच्छवाह, राजेशकुमार तुरकर, किरण बंसोड, नंदकिशोर शरणागत, डॉ. विनोद पटले, रौनक ठाकूर, सुखदास धकाते, राजकुमार ठाकरे, लिलाधर डोमळे आदींचा समावेश होता.

वर्ध्यात दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या युवतीवर गुन्हा

वर्ध्यात दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या युवतीवर गुन्हा

Crime against a married woman for the second time | दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या युवतीवर गुन्हावर्धा/प्रतिनिधी:
नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर पतीच्या आजीच्या तेरवी कार्यक्रमादरम्यान पळून गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत वर्धेतील श्रीराम शिवमंदिरात शुक्रवारी विवाह पार पडणार होता. रितीरिवाजाने लग्नसोहळा आटोपत नवदाम्पत्याच्या डोक्यावर वऱ्हाड्यांनी अक्षदा टाकल्या; पण त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथकाने विवाह मंडपात येत नवदाम्पत्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस कचेरीत नेले. या प्रकरणी तरूणीच्या पहिल्या पतीच्या तक्रारीवरून नवदाम्पत्याविरूद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, उमेश रामदास भांडेकर रा. जामणी हा ग्रा.पं. कार्यालयात संगणक परिचारक म्हणून कार्यरत आहे. मार्च महिन्यात उमेशचा विवाह नागपूर जिल्ह्यातील बिबी (सावळी) येथील रहिवासी असलेल्या त्याच्या सख्ख्या मामेबहिणीसोबत नोंदणी पद्धतीने पार पडला. यानंतर उमेशच्या आजीचे निधन झाल्याने उमेशची पत्नी वगळता पत्नीकडील कुटुंबीय जामणी येथे तेरवीच्या कार्यक्रमाला आले होते. दरम्यान, उमेशच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत पलायन केले. तेव्हापासून उमेश व त्याची पत्नी यांच्यात कुठलाही संवाद झाला नाही; पण तिने फेसबुकवर टाकलेल्या एका मजकुरावरून उमेशला त्याची पत्नी दुसरे लग्न करीत असल्याचे निदर्शनास आले. सदर लग्न सोहळा वर्धेतच होत असल्याचे लक्षात येताच त्याने थेट पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देत योग्य कारवाई करा, अन्यथा मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेल, असे सांगितले. यानंतर आपला मोबाईल बंद केला. यावरून दामिणी पथकाच्या काळे यांनी आपल्या पथकासह सदर युवकाचा शोध घेत लग्नमंडपात धडक दिली. तेथे आनंदात असलेल्या नवदाम्पत्याला पथकातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले.
पूर्वीच्या पतीकडून घटस्पोट न घेता हा विवाह होत असल्याने पोलिसांनी उमेशच्या तक्रारीवरून दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या उमेशच्या पत्नीसह तिच्याशी लग्न करणाऱ्या गांधीनगर येथील राहूल कुनवटकर याच्याविरुद्ध कलम ४९४, ४९५, ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पळून गेल्यानंतर केळझर येथे उरकला विवाह
दुसºयांदा लग्न करणाऱ्या उमेशच्या पत्नीने तेरवीच्या कार्यक्रमादरम्यान माहेरून पळ काढल्यानंतर राहूल कुनघटकर याच्याशी केळझर येथे ६ जून रोजी लग्न केले. यानंतर आज रितीरिवाजाने लग्न सोहळ्याचे आयोजन शहरातील श्रीराम शिवमंदिरात केले होते, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पूढे आले आहे.

उमेश व राहूल यांच्यासह तरुणीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. शिवाय विचारपूस केली जात आहे. चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल.
- चंद्रकांत मदणे, ठाणेदार, शहर पोलीस स्टेशन, वर्धा.

समाजात महिला व पुरुषांमध्ये कायद्याचा वचक नाही. आजची ही घटना कायद्याचा गैरवापर करणारीच ठरत आहे.
- अनिता ठाकरे, कायदे तज्ज्ञ, वर्धा.

मामेभावालाच दिला दगा
उमेशचे ज्या मुलीसोबत लग्न झाले, ती त्याची सख्खी मामेबहीण आहे; पण ती पळून गेल्याने त्याच्याही अडचणीत भर पडली होती. तिने आपल्या मामेभावालाच दगा दिल्याचे या प्रकरणात पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.


वर्ध्यात लोटाबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई

वर्ध्यात लोटाबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई

Penalty action on Lottoists | लोटाबहाद्दरांवर दंडात्मक कारवाईवर्धा/प्रतिनिधी:
जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन जिल्ह्यातील ५१३ ग्रा.पं. स्वच्छ व सुंदर करण्याचा विडाच उचलला आहे. गत तीन महिन्यांंत जि. प. स्वच्छता विभागाच्या जिल्हास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने ठिकठिकाणी पहाटे धडक देऊन सुमारे १० लोटाबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे दंडात्मक कारवाई हिंगणघाट तालुक्यातील काजळसरा या गावात करण्यात आली.
शाश्वत स्वच्छता हा हेतू केंद्रस्थानी ठेवून जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनात व जि. प. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम यांच्या नेतृत्त्वात जिल्हास्तरीय दोन गुडमॉर्निग पथक तयार करण्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील आठ तालुक्यात प्रत्येकी एक असे तालुक्याचे गुडमॉर्निग पथकही तयार करण्यात आले आहे. सदर जिल्हास्तरीय गुडमॉर्निग पथकातील सदस्य गत तीन महिन्यांपासून प्रत्येक आठवत्यातील मंगळवार व गुरूवारी विविध गावात धडक देत लोटाबहाद्दरांना समज देत आहेत. तसेच उघड्यावर प्रात:विधीकरिता गेल्यास त्याचे आपल्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात हेही पटवून देत आहेत. यंदाच्या एप्रिल महिन्यात हाती घेण्यात आलेला हा उपक्रम मे नंतर जून महिन्यातही राबविल्या जात आहे. तर पुढील तीन महिने हा उपक्रम पुन्हा नव्याने व प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना वरिष्ठांकडून जि. प. च्या स्वच्छता विभागाला प्राप्त झाल्या आहेत. शास्वत स्वच्छता या हेतूने व लोटाबहाद्दरांना समज देण्यासाठी गुरूवारी जिल्ह्यास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने गुंजखेडा, हिवरा हाडके यासह देवळी तालुक्यातील इतरही गावांमध्ये धडक देत पथकातील विनोद खोब्रागडे, सचिन खाडे, संपदा बोधनकर, नरेंद्र येणोरकर, कैलास बाळबुधे, अंकुर पोहाणे, अशोक रत्नपारखी, महेश डोईजोड यांनी त्यांना उघड्यावर प्रात:विधीस जाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. तर शुक्रवारीही अनेकांना सदर पथकाने समज दिली.
सहकार्य न करणाऱ्या ग्रा.पं.वर होणार कारवाई
जि.प. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने शास्वत स्वच्छतेसाठी गत तीन महिन्यांपासून विशेष प्रयत्न केले जात आहे; पण काही ग्रा.पं. सदर उपक्रमाला प्रतिसादच देत नसल्याचे दिसून येते. ज्या ग्रा.पं. लोटाबहाद्दूरांना समज देण्यासाठी व स्वच्छ गावाकडे पाठ करेल अशांचा अहवाल तयार करून तो योग्य कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.
यापुढे थेट दंड
गत तीन महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जिल्हास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने पहाटेच धडक देवून अनेक लोटाबहाद्दरांना समज दिली. परंतु, अनेक लोटाबहाद्दर उघड्यावर प्रात:विधीकरिता जातच असल्याचे निदर्शनास येत असल्याने उपक्रम राबविताना यापुढील तीन महिन्यात लोटाबहाद्दरांना समज देत थेट १०० रुपये ते १ हजार २०० रुपयेपर्यंत दंड ठोठावण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस व्हॅन पलटली

पोलीस व्हॅन पलटली

Police van turn down on the Nagpur-Amravati National Highway | नागपूर अधिवेशनासाठी जाणारी पोलीस व्हॅन नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर उलटलीअमरावती/प्रातिनिधी:
४ जुलै पासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरवात होणार असल्याने त्यामुळे पोलीस बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथून नागपुरात जाणारी राज्य राखीव दलाची गट क्र.७ ची तुकडीची पोलीस व्हॅन आज शनिवार रोजी सकाळी८.१५ वाजता तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्व.लालासाहेब महाविद्यालयाजवळ उलटली. यात चालकाचा हात फ्रॅक्चर झाला असून अन्य सहा कर्मचाऱ्यांना किरकोळ इजा झाली. यात एकूण ७ कर्मचारी होते.
नागपूर पावसाळी अधिवेशनात बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथून एम.एच.२७ बी. एक्स ०३६८ या क्रमांकाच्या पोलीस व्हॅनने गट क्र.७ ची राज्य राखीव दलाची ७कर्मचाºयांची एक तुकडी जात होती अचानकपणे चालकाचे नियंत्रण सुटले व पोलीस व्हॅन एकाएकी उलटली. यात काही अंतरावर वाहन चक्क घासत गेले. वाहन चालक एस.एस.चव्हाण वय ३५ रा.अमरावती हे जखमी झाले. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून तिवसा ग्रामीण रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू आहे. यातील एस.डब्ल्यू. वºहाडे, एस.जी.गाडगे, एस. एस.भागवत, आर.व्ही.राठोड, जी.ई. शेळके, एन.एस.निघोट हे सहा राज्य राखीव दलाचे कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अपघातात पोलीस व्हॅनचे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला यावेळी राज्य राखीव दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तिवसा पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन प्रकरणी चौकशी सुरू केली आहे(लोसे)


नागपूर सह सर्व रेल्वेस्थानकावर ‘ हायअलर्ट’ जारी

नागपूर सह सर्व रेल्वेस्थानकावर ‘ हायअलर्ट’ जारी

रेल्वे पोलीस नागपूर साठी इमेज परिणाम
संग्रहित
नागपूर/प्रतिनिधी:
रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना अल कायदाकडून प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या दिल्ली मुख्यालयाकडून सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी करण्यात आला आहेनागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १५० च्या वर प्रवासी गाड्या धावतात. यात प्रवाशांची संख्या ४० ते ४५ हजारावर आहे.कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित मुख्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचना अलर्टमध्ये देण्यात आल्या आहेत. ‘रेल्वे सुरक्षा दल नेहमीच सतर्क राहते. परंतु मुख्यालयाकडून पत्र मिळाल्यामुळे रेल्वेस्थानकावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर-अजनी स्थानकावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संवेदनशील तसेच दिल्लीकडून येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय श्वानपथकाद्वारे रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी करण्यात येत आहे.अशी माहिती ज्योती कुमार सतिजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त,आरपीएफ, नागपूर यांनी दिली.

 रामचंद्र देवतारे यांचा आज अमृतमहोत्सव

रामचंद्र देवतारे यांचा आज अमृतमहोत्सव

रामटेक तालुका प्रतिनिधीः
रामटेक येथिल श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व रा.स्व.संघ,नागपुर जिल्हयाचे माजी संघचालक रामचंद्र मारोतराव देवतारे यांचा अमृतमहोत्सव रामटेक येथे आज दिनांक 1 जुलै 2018 रोजी स्थानीक गंगा भवनम सभागृहात सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोळवलकर गुरूजी स्मृती प्रकल्प गोळवली,जिल्हा-रत्नागीरीचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे हे भूषविणार आहेत.नागपुर जिल्हयातील रास्वसंघाचे अधिकारी पदाधिकारी व देवतारे मास्तर यांचे चाहते मोठया संख्येत या कार्यक्रमाला
हजेरी लावणार आहेत.जुन्या रामटेक तालुक्यातील व सध्या मौदा तालुक्यात असलेल्या खात या गावात सामान्य कुटूंबात रामचंद्रराव यांचा 1 जुलै 2018 रोजी जन्म झाला.वडील रेल्वेत सिग्नल फीटर होते.मोठे बंधू त्यांना संघाच्या शाखेत आणले.अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत रामचंद्रराव यांनी डबल एम ए पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. व रामटेकच्या श्रीराम विद्यालयांत शिक्षकाची नोकरी धरली.पुढे ते या शाळेचे मुख्याध्यापक झाले.रास्वसंघाचे अतिशय निष्ठेने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचे नाव संपुर्ण नागपुर विभागात मोठ्या सन्मानाने घेतले जाते.विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतांना त्यांनी नागपुर जिल्हा संघचालक या पदावर अनेक वर्षे कार्य केले.रामटेकचे तरूण भारत वार्ताहर म्हणूनही त्यांनी सुमारे 25 वर्ष कार्य केले आहे रामटेकच्या संघ कार्यकर्त्यांसह सर्वच सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक
आहेत.रामटेकच्या सार्वजनिक क्षेत्रांतील या आधारवडाचा अमृतमहोत्सव हा या सर्वच कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा विषय आहे.या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन भानुप्रताप   देवतारे,भारती देवतारे,नागेश देवतारे,भारती देवतारे येवतीकर,मंगेशसिंह येवतीकर,योगीता देवतारे कचवे व मनीश सिंह कचवे यांनी केले आहे.


चंद्रपुरच्या पोलिसाने दिला पोलिसातील माणुसकीचा परिचय

चंद्रपुरच्या पोलिसाने दिला पोलिसातील माणुसकीचा परिचय

चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूरच्या एका वाहतूक शिपायाने कर्तव्यावर असताना पोलिसातील माणुसकीचा परिचय दिला आहे.
एका रुग्णाला रक्ताची गरज आहे आणि तो रक्तगट आपलाही आहे, हे समजताच चंद्रपुर वाहतूक पोलीसात कार्यरत असणाऱ्यां पोलीस कर्मचाऱ्यानी रुग्णालयात जावून रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपत एक उदाहरण जगासमोर निर्माण केले आहे.
संदीप वझे असे या वाहतूक शिपायाचे नाव असून त्यांनी कर्तव्यावर असताना एका गरजू रुग्णाला तात्काळ रक्तदान केले. संदीप वझे हे शनिवारी दुपारी २ वाजताच्या प्रियदर्शनी चौकात कर्तव्यावर होते. अशातच त्यांच्याजवळ रक्तदान निस्वार्थ सेवा संस्थेचे काही लोक आले. मोनिका पिसे या एका सिकलसेल असलेल्या महिला रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी संदीप वझे यांना सांगितले.त्यांनी क्षणाचाही विलंब न आपल्या कर्तव्य स्थानावर एका साथीदार पोलीस कर्मचाऱ्याची मदत घेत लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. व पोलिसातील माणुसकीचे जिवंत उदाहरण सर्वांपुढे ठेवले. संदीप वझे यांनी रक्त दिल्याने गंभीर स्थिती टळून त्या गरजू महिलेला उपचार मिळाले.व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.विशेष म्हणजे या पोलिसाने वर्दीवर असतांना रक्तदान केले. त्यांच्या या कार्याने निस्वार्थ सेवा संस्थेच्या लोकांनी त्यांचे आभार मानले.संदीप यांनी केलेल्या कार्यामुळे त्याच्यावर समाजातील सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Friday, June 29, 2018

महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी व कुटुंबियांसाठी  मोफत आरोग्य सुविधेबाबत बाह्य रुग्ण विभाग

महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी व कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य सुविधेबाबत बाह्य रुग्ण विभाग

वेळेची व पैशाची बचत होणारश्री. विनोद बोंदरे;आरोग्य सुविधा संजीवनी ठरणार श्री.कैलाश चिरूटकर
महानिर्मिती परिवाराच्या आरोग्याची काळजी घेणारी योजनाश्री. नितीन चांदुरकर
जुलै महिन्यातील आरोग्य सुविधेचा तारीखनिहाय कार्यक्रम जाहीर

      नागपूर/प्रतिनिधी:
 वीज उत्पादनाच्या क्षेत्रातील नामांकित अश्या महानिर्मिती कंपनीच्या मुंबईतील सुमारे ६०० अधिकारी-कर्मचारी व कुटुंबियांसाठी अद्ययावत आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने महानिर्मिती व ग्लोबल हॉस्पिटलच्या परस्पर सहकार्यातून अभिनव योजना सुरु करण्यात आली आहे.
 महानिर्मितीच्या धारावी, माटुंगा, मुंबई येथील कार्यालयातील पहिल्या माळ्यावर बाह्य रुग्ण विभाग स्थापन केला असून दर शुक्रवारी दुपारी २ ते ५.०० या कालावधीत ग्लोबल हॉस्पिटल मुंबई यांचे मार्फत विविध क्षेत्रातील निपुण व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत संपूर्ण आरोग्य विषयक तपासणी व आरोग्यविषयक सल्ला-मार्गदर्शन (विनामुल्य) केले जाणार आहे. 
       बाह्य रुग्ण विभागाचे  उद्घाटन नुकतेच महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) श्री. विनोद बोंदरे यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी संचालक(संवसु -१) श्री. कैलाश चिरूटकर, कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) श्री. नितीन चांदुरकर,ग्लोबल हॉस्पिटल मुंबईचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.मिलिंद फडके प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 
       महानिर्मितीच्या मुंबई येथील मनुष्यबळाला दैनंदिन कामाच्या ठिकाणी आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या वेळेची बचत होईल, गर्दीपासून सुटका मिळेल, सोबतच अशा पद्धतीच्या आरोग्य सल्ला मार्गदर्शनाकरीता मुंबईत मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे श्री. विनोद बोंदरे यांनी सांगितले. महानिर्मितीच्या मुंबई येथील मनुष्यबळाला हि आरोग्य सुविधा  संजीवनी ठरणार असल्याचे श्री. कैलाश चिरूटकर म्हणाले तर श्री. नितीन चांदुरकर म्हणाले कि सध्यस्थितीत महानिर्मितीमध्ये नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असल्याने आनंदी वातावरण आहे व त्यात विनामुल्य आरोग्य सुविधा म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. एकूणच महानिर्मिती परिवाराच्या आरोग्याची काळजी घेणारी हि योजना असल्याचे त्यांनी सांगितले. 
        प्रारंभी प्रास्ताविकातून मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. अनिल मुसळे यांनी आरोग्यविषयक योजनेची सविस्तर भूमिका मांडली व याव्यतिरिक्त हृदयरोग, लकवा किंवा अचानक घडणाऱ्या प्रसंगी कशाप्रकारे मनुष्य प्राण वाचवायचे याचे प्रशिक्षण देखील आगामी काळात विद्युत केंद्र निहाय देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
       समारंभाला श्री. प्रमोद नाफडे मुख्य अभियंता(स्थापत्य), श्री. दत्तात्रय साळुंखे उप मुख्य अभियंता (स्थापत्य), श्री. सुरेंद्र माहुरे अधीक्षक अभियंता (स्थापत्य), सौ. लता संख्ये उप महाव्यवस्थापक(मासं), सहाय्यक महाव्यवस्थापक(मासं) श्री समीर देऊळकर, श्री. मिसाळ, श्री. योगेंद्र पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) श्री. कौस्तुभ इंगवले, श्री. रणधीर पाठक, महानिर्मितीचे अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. अतिशय समर्पक व सूटसुटीत  सूत्र संचालन व आभार प्रदर्शन औद्योगिक संबंध अधिकारी श्री. विलास हिरे यांनी केले. 
       जुलै महिन्यातील आरोग्य सेवेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे ६ जुलै रोजी डॉ.अनुप खत्री (अस्थिरोग तज्ज्ञ), १३ जुलै रोजी डॉ.जिग्नेश गांधी (जनरल सर्जन), २० जुलै रोजी डॉ. अनघा छत्रपती (स्त्री रोग तज्ज्ञ), २७ जुलै रोजी डॉ.पंकज अग्रवाल(न्युरोलॉजिस्ट) हे आपली सेवा देणार आहेत.

सावंगी मेघे रुग्णालयाचा उपक्रम;रविवारी भद्रावती येथे महाआरोग्य शिबीर

सावंगी मेघे रुग्णालयाचा उपक्रम;रविवारी भद्रावती येथे महाआरोग्य शिबीर

आरोग्य शिबीर सावंगी मेघे साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने भद्रावती येथे रविवार,दि. 1 रोजी मोफत आरोग्य तपासणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.भद्रावती येथील राजनंदन मंगल कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत
आयोजित या शिबिरात सावंगी मेघे रुग्णालयाच्या मेडिसिन, शल्यक्रिया, मुखशल्यचिकित्सा,अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनरोग, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, नेत्ररोग आणि कान, नाक व घसारोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णतपासणी करणार आहेत. या शिबिरात ईसीजी सुविधाही उपलब्ध राहणार आहे. या शिबिरातून सावंगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती होणार्या  रुग्णांना नोंदणी, रुग्णभरती, रुग्णखाट, सामान्य तपासण्या, भोजन आदी सुविधा विनामूल्य प्राप्त होतील. 
तर, अतिविशेष चाचण्या, बाहेरील औषधी, इम्प्लांट, दुर्बिणव्दारे तसेच विशेष शस्त्रक्रिया या सेवा माफक शुल्कात उपलब्ध होतील. या शिबिराव्दारे महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच फाटलेले ओठ व दुभंगलेला टाळूची मोफत शस्त्रक्रिया करनाऱ्या योजनेचाही लाभही घेता येईल. त्यासाठी रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड आपल्या सोबत आणणे, आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांनी या आरोग्यसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, यांनी केले आहे.

महावितरण ठरली कंत्राटदार,कर्मचा-यांची देणी ऑनलाईन अदा करणारी  देशातील पहिलीच वीज कंपनी

महावितरण ठरली कंत्राटदार,कर्मचा-यांची देणी ऑनलाईन अदा करणारी देशातील पहिलीच वीज कंपनी

नागपूर/प्रतिनिधी:
सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी साधारण शासकीय विभागाबद्दल असणारा समज मागिल काही वर्षात खोटा ठरवित पारदर्शक आणि तत्पर सेवा देणा-या महावितरणने देशाच्या वीज क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. अधिका-यांच्या टेबलवर फ़ाईल्सचे ढिग, कार्यालयात वारंवार खेटे घालणे, कागदोपत्री खोळंबिलेली कामे ही शासकीय विभागाची ओळख झटकून देत कागदविरहीत झालेले महावितरण आता सर्व कंत्राटदारांची आणि कर्मचा-यांची देणी केंद्रीयप्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन अदा करणारी भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरणार आहे. 
आधुनिक माहिती तंत्रज्ञानासमवेत योग्य सांगड घालून एचआरएमएस आणि ईआरपी या प्रणालींचा वापर करीत यापुर्वीच पेपरलेस झालेल्या महावितरणने सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन करण्याकडे प्रवास सुरु केल्याने पेपरलेस कामकाज असलेले महावितरण आता लवकरच कॅशलेसही होणार आहे. महावितरण लवकरच आपल्या सर्व कंट्राटदार आणि पुरवठादाराची देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणे सुरु करीत असून कर्मचा-यांचे वेतन, इतर भत्ते, स्थायी आणि अस्थायी अग्रीम उचल सोबतच आवश्यक कार्यालयीन खर्चाची प्रतिपुर्तीही ऑनलाईन पद्धतीने करणार आहे, त्याअनुषंगाने महावितरणच्या मुख्यालयात केंद्रीय देयक अदायगी प्रणाली सुरु करण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांचा कंपनीच्या कामकाजात संपुर्ण पारदर्शकतेचा आग्रह असून कंत्राटदार, पुरवठादार यांचेशोबतच कर्मचा-यांनाही त्यांची देयके मिळण्यासाठी कुठेही अडवणूक होऊ नये यावर त्यांचा विशेष भर आहे.
महावितरणमध्ये कंपनीचे विविध दैनंदिन आर्थिक व्यवहार ईआरपी प्रणालीद्वारे करण्यात येत असल्याने कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश आणि पी.ओ. (पर्चेस ऑर्डर) ही ईआरपी मार्फ़त करण्यात येत आहे. त्यात अधिक सुसुत्रता आणून राज्यातील सर्व कंत्राटदारांची देयके मुंबई येथील मुख्यालयातील केंद्रीय प्रणालीव्दारे निश्चित कालमर्यादेत ऑनलाईन पद्धतीव्दारे अदा करण्यात येणार आहे. याशिवाय कर्मचा-यांची अग्रीम उचल, वेतन आणि इतर देयकेही याच प्रकारे ईसीएस प्रणालीव्दारे कर्मचा-यांच्या बॅंक खात्यात वळती करण्यात येतील. यासाठी लागणारी यंत्रणा महावितरणच्या मुख्यालयात कार्यान्वित करण्यात आली असून यासाठी कंट्राटदारांचे आणि कर्मचा-यांचे आवश्यक दस्तावेज क्षेत्रीय कार्यलालयांकडून मागविण्यात आली आहेत. ही प्रणाली पुणे आणि स्थापत्त्य मंडलांसाठी प्रायोगिक तत्वावर संपुर्णपणे राबविण्यात येत असून त्यास मिळालेले भरघोस यश बघता राज्यात इतरत्रही ही पद्धती लवकरच सुरु करण्यात येत आहे. केंद्रीयकृत देयक अदायगी प्रणालीमुळे महावितरणच्या विकासकामांना अधिक गती लाभणार असून सोबतच संपुर्ण आर्थिक व्यवहार कॅशलेस आणि पारदर्शक असणारी महावितरण ही भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरणार आहे.
मिटरचा फ़ोटो असलेले वीजबील होणार कालबाह्य
वीज देयकांमध्ये अचुकता आणि पारदर्शकतेसाठी बिलांवर मीटरचा फ़ोटो द्यायचा प्रयोग महावितरणने 2008 साली सुरु केला. अशाप्रकारची सुविधा देणारी महावितरण ही भारतातील पहिली वीज वितरण कंपनी ठरली होती, महावितरणच्या या यशस्वी प्रयोगाचे अनुकरण भारतातील इतरही वीज वितरण कंपन्यांसोबतच, पाणी पुरवठा आणि इतरही अनेकांनी केला आहे. तेव्हापासून आतापर्यंत महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकसेवेत केलेल्या सकारात्मक सुधारणांमुळे महावितरणच्या वीज देयक प्रणालीत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आली. त्यातही महावितरण मोबाईल ॲपमुळे देयक प्रणालीत मानवी हस्तक्षेपाला संधीच उरलेली नाही, यासोबतच मीटर रिडर ने मीटरवरील वीज वापराची नोंद घेताच त्याची माहीती देणारा एसएमएस काही क्षणातच संबंधित वीज ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर दिल्या जात असल्याने ग्राहकाला रिडींग योग्य असल्याची खातरजमा करणेही सहज शक्य झाले आहे. सोबतच वीजबिलावर हाय रिसोल्यूशन फ़ोटो छापायसाठी लागणारा कालावधी आणि फ़ोटोचा दर्जा बघता उपलब्ध एसएमएसची सुविधा अधिक पारदर्शी, सोयीस्कर आणि तत्पर प्रक्रीया असल्याने मीटरचा फ़ोटोसहित असणारी वीजदेयक प्रक्रीया लवकरच कालबाह्य होणार आहे. ग्राहकाला एसएमएसच्या माध्यमातून अश्या प्रकारची सेवा उपलब्ध करून देणा-या देशातील काही निवडक वीज वितरण कंपन्यांमध्ये महावितरणचा समावेश आहे.
महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज रिडींग, वीज देयक आणि वीजपुरवठा आदीबाबतची माहिती एसएमएस च्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या जात आहे. राज्यात महावितरणचे सुमारे 2 कोटी 54 लाख असून त्यापैकी 2 कोटींहुन अधिक ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असून उर्वरीत ग्राहकांनीही त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करून महावितरणच्या एसएमएस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

अज्ञात वाहनांच्या धडकेत चार चितळांचा  जागीच मृत्यु

अज्ञात वाहनांच्या धडकेत चार चितळांचा जागीच मृत्यु

रामटेक(तालूका प्रतिनिधी):
पवनी वनपरीक्षेत्रांतर्गत पवनी-तुमसर राज्यमार्गावर हिवरा बाजार ते सालई दरम्यान दिनांक28/06/2018 चे रात्री कुठल्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चार चितळांचा जागीच मृत्यू झाला तर पाचवा गंभीर जखमी असल्याने त्याला रेस्क्यू सेंटर नागपुर येथे पाठविण्यात आले आहे.तिथे त्याचेवर उपचार सुरु असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगीतले. ऊपरोक्त राज्यमार्गावर बावनथडी नदीवरील देवनारा रेतीघाटावरुन रेती भरलेले दहाचाकी ट्रक्स मोठ्या संख्येत ये जा करतात.यापैकी एखाद्याने या चितळांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.याप्रकरणी वनविभागाने प्रकरण नोंदविले आहे.याप्रकरणी पवनीचे वनक्षेत्रपाल सुमीत कुमार(आयएफएस) हे अधीक तपास करीत आहेत.  
रामटेक वनपरीक्षेत्रांतील नगरधन शिवारांत काळविटाच्या शिकारीचे प्रकरण ताजे असतांनाच व त्याप्रकरणांत आरोपींना गजाआड करण्यात वनाधिकार्‍यांना यश आले नसतांनाच ऊपरोक्त घटनेत चार चितळ मृत्युमुखी पडल्याने शंका कुशंकांचे पेव फुटले आहे.


कारंज्यात प्लास्टिक जप्ती मोहीम

कारंज्यात प्लास्टिक जप्ती मोहीम

कारंजा शहरामध्ये नगर पंचायत वतीने गुरूवार (ता.२८) प्लास्टिक विक्री मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मोठया व्यवसायाकडून प्लास्टिक जप्त केले असून एका व्यवसायाकडून ५०००/रु. दंड आकारण्यात आला. सदर ही कारवाई  नगर पंचायत च्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत, देवासे, प्रवीण दिवाने, अशोक जसुतकर, रुस्तम शेख, जगदीश माळोदे, यांनी केली. याशिवाय शहरात रविवारला आठवडी बाजाराच्या दिवशी प्लॅस्टिक जप्ती मोहीम राबवण्यात येणार आहे.



अवैध मोहफुल दारु भट्टीवर पोलीसांची कारवाई

अवैध मोहफुल दारु भट्टीवर पोलीसांची कारवाई

रामटेक (तालूका प्रतिनिधी):
 रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेक वरुन तिन की .मी. अंतरावर उदापुर शिवारात अवैध   मोहफुल  दारु भट्टी वर रेड करुन 160 लिट मोहफुल दारु व इतर भट्टी सहित्य एकुन 21860 रु चा माला सहीत इतर साहीत्य जप्त करण्यात आले . आरोपी अजय वरखडे रा. नगरधन अटक करण्यात आले असुन  एक अारोपी घटना स्थळावरुन फरार झाला. सदर ची कारवाई  उपविभगिय पोलीस अधिकारी रामटेक लोहित मतानी साहेब याच्या आदेशाने रामटेक पोलीस निरीक्षक दिपक वंजारी यांच्या मार्गदर्शनात स पो नि वर्षा मते  ,  पो.शि. रोशन पाटिल, आशिक कुंभरे ,राजु भोयर,यानी केली.



महावितरण कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय आरोग्य शिबीर संपन्न

महावितरण कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय आरोग्य शिबीर संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
महावितरण चंद्रपूर परिमंडळात कार्यरत, महावितरण कर्मचारी कला व क्रिडा मंडळ व श्री. साई डिव्हाईन क्युअर मल्टिस्पेश्यालिटी हाॅस्पिटल चंद्रपूर द्वारा महावितरण चंद्रपूर परिमंडळात एक दिवसिय आरेाग्य शिबिराचे आयोजन आज दिनांक 29 जून रोजी करण्यात आले. मुख्य अभियंता श्री. अरविंद भादिकर यांनी आरोग्यदायी जीवनाची कामना करीत या शिबिराच्या आयोजनाच्या सुचना केल्या त्यानुसार महावितरण कंपनीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरेाग्याची काळजी घेण्याच्या संकल्पनेतून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या आरेाग्य शिबिरात कर्मचाऱ्यांच्या रक्तशर्करेची, रक्तदाबाची, ह्दयगतीची ECG व अस्थिघनतेची BMD तपासणी करण्यात आली तसेच हृदयरोगतज्ञ डाॅ. श्री. सुजय कोतपल्लीवार व अस्थिरोगतज्ञ डाॅ. श्री. प्रसन्न मद्दिवार यांच्याद्वारे शिबिरात उपस्थितांना आरेाग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता प्रमोद रागीट, सहा. महाव्यवस्थापक श्री. महेश बुरंगे, वरिष्ठ व्यवस्थापक श्री. विठृठल मडावी व उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी श्री. सुशील विखार तसेच इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महावितरण कर्मचारी कला व क्रिडा मंडळाचे श्री. विजय चैरे, भालचंद्र घोडमारे, बंडू कुरेकार, अमित बिरमवार, नंदकुमार नरड, ललित निमकर, निवलकर,सिद्धर्थ खोब्रागडे, शिल्पा महेशगौरी व रोहिणी ठाकरे यांनी विषेश प्रयत्न केले. या आरोग्य षिबिराचा लाभ चंद्रपूर परिमंडळातील कर्मचाऱ्यांनी मोठया प्रमाणात घेतला.


Thursday, June 28, 2018

आता लाईन गेली तरी "नो टेन्शन"

आता लाईन गेली तरी "नो टेन्शन"

 महावितरणचा अभिनव उपक्रम ‘पॉवर ऑन व्हील’
नागपूर/प्रतिनिधी:

नागपूर शहरातील महावितरणच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी ‘पॉवर ऑन व्हील’ ची अभिनव सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एखाद्या भागातील वितरण रोहीत्र नादुरुस्त झाल्यास, तो रोहीत्र दुरुस्ती किंवा बदली करण्याच्या कालावधीत तेथील वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागू नये यासाठी महावितरणने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
वितरण रोहीत्र हा वीज यंत्रणेचा आत्मा असतो, यात काही बिघाड उद्भवल्यास या रोहीत्रावरील ग्राहकांना रोहीत्र दुरुस्त किंवा बदली होईपर्यंत अंधारात राहावे लागते, ग्राहकांचा हा त्रास लक्षात घेऊन महावितरणने पॉवर ऑन व्हीलची सुविधा कॉग्रेसनगर विभागातील वीज ग्राहकांसाठी सुरु केली असून या अंतर्गत वाहनावर 630 एमव्हीए क्षमतेचे रोहीत्र उभारण्यात आले आहे. ज्या ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड आला, त्या ठिकाणी हे वाहन उभे करून तेथील नादुरुस्त रोहीत्रांवरील ग्राहकांच्या वीज जोडण्या वाहनावरील रोहीत्राला जोडण्यात येऊन तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात येऊन ग्राहकांना दिलासा दिल्या जात आहे. यादरम्यान नादुरुस्त रोहीत्रातील बिघाड दुर करून अथवा नादुरुस्त रोहीत्र बदली करेपर्यंत ग्राहकांना या ‘पॉवर ऑन व्हील’ च्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येत आहे.
रोहित्र नादुरुस्त झाल्यावर त्याच्या दुरुस्ती किंवा बदलण्यासाठी साधारणपणे ३-४ तासाचा कालावधी लागतो. या काळात वीज ग्राहकांना वीजेसिवाय लागू नये यासाठी ‘पॉवर ऑन व्हील’ सोबतीला असल्याने रोहित्र बदलायचे काम सुरु असतांना ‘पॉवर ऑन व्हील’ च्या माध्यमातून ग्राहकांना वीज पुरवठा सुरु राहत असल्याने शहरातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून या सुविधेमुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्याचे ऊर्जा, नवीन व नीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नेहमीच वीज ग्राहकांना अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठ्यासाठी आग्रही असतात, या अनुषंगाने पावसाळ्याच्या दिवसात वाढणा-या रोहीत्र नादुरुस्त होण्याच्या प्रमाणाचा फ़टका सर्वसामान्य वीज ग्राहकांना अधिक वेळ पडू नये यासाठी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ‘पॉवर ऑन व्हील’ चा उपक्रम राबविण्याबाबत केलेल्या सुचनेच्या अनुषंगाने नागपूर प्रविभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या पुढाकाराने महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागात ‘पॉवर ऑन व्हील’ चा उपक्रम यशस्वीरित्या सुरु झाल्याची माहीती, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिली असून विदर्भातील सर्व प्रमुख शहरांतून हा उपक्रम राबविण्याची तयारी महावितरणकडून करण्यात येत आहे.

नागपुरातून १ लाख शेळ्या मेंढ्यांची विदेशात निर्यात

नागपुरातून १ लाख शेळ्या मेंढ्यांची विदेशात निर्यात

mendhi sheli ' साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
येत्या शनिवारचा दिवस नागपूर व विदर्भाच्या दृष्टीने ऐतिहासिक राहणार आहे. प्रथमच नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन हजार शेळ्या मेंढ्या आखाती देशांमध्ये निर्यात करण्यात येणार आहेत. या नवीन प्रकल्पाद्वारे शेळी-मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी बाजारपेठ खुली होणार आहे व पुढील तीन महिन्यांत १ लाख शेळ्या-मेंढ्या विदेशात निर्यात करण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती खा.विकास महात्मे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेदरम्यान दिली.
गुरुवारी राजीव गांधी बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेमध्ये त्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आर्थिक विवंचनेतून होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पूरकव्यवसाय करम्यासाठी संधी व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. याच विचारातून डॉ.महात्मे यांना शेळ्या-मेंढ्या विमानाने विदेशात निर्यात करण्याच्या योजनेची कल्पना सुचली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या योजनेला पाठबळ दिले. डॉ.महात्मे यांनी केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांचीदेखील अनेकदा भेट घेऊन या योजनेचा पाठपुरावा केला. या योजनेअंतर्गत ३० जून रोजी दुपारी एक वाजता नागपूर विमानतळावरुन पहिल्या टप्प्यात दोन हजार शेळ्या मेंढ्या निर्यात करण्यात येणार आहेत. निर्यात होणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
मुख्यमंत्री, गडकरी, प्रभूंची उपस्थिती
नागपूर विमानतळावर ३० जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला तीन केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय कृषीमंत्री गजेंद्र शेखावत, राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, हे प्रामुख्याने उपस्थित राहतील, असे डॉ.विकास महात्मे यांनी सांगितले. केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय, मिहान, एअर इंडिया यांच्या संयुक्त सहभागातून ही योजना आखली गेल्याचेदेखील डॉ. महात्मे यांनी सांगितले. निर्यातीचे काम खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे.
पशूधन ‘एटीएम’सारखे काम करेल
या नव्या प्रकल्पाद्वारे मेंढपाळ तसेच शेळी पालन करणाºया शेतकºयांना रोजगाराच्या तसेच आर्थिक उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून शेळी-मेंढी पालनाचा स्वीकार करतील. आर्थिक विवंचनेच्या काळात हेच पशूधन त्यांच्यासाठी ‘एटीएम’सारखे काम करेल, असा विश्वास डॉ.महात्मे यांनी व्यक्त केला.(लोसे)

वर्ध्यात धाडसी चोरी;६ लाखांचा ऐवज लंपास

वर्ध्यात धाडसी चोरी;६ लाखांचा ऐवज लंपास

Brave theft in the city | शहरात धाडसी चोरीवर्धा/प्रतिनिधी:
 शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेच्या वेळी दोन्ही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी कुलूप बंद घराला टार्गेट केले. यातील एक घर माजी जि.प. सदस्य अमित उर्फ गुड्डू ठाकूर यांचे आहे, हे विशेष!
माजी जि.प. सदस्य अमित विजयसिंग ठाकूर हे दोन महिन्यांपासून स्वत:च्या घराचे बांधकाम सुरू असल्याने शेजारीच असलेल्या धोंगडे यांच्या घरी किरायाणे राहत आहे. अमित ठाकूर हे कुटुंबीयांसह गोवा येथे फिरायला गेले असता चोरट्याने त्यांच्या कुलूप बंद घरात प्रवेश करून घरातील आलमारीतून सुमारे चार लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेल्याचे सांगण्यात आले. बुधवारी गोवा येथून परतल्यावर घरात चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज तेलगोटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
दुसरी घटना शहरातीलच हिंदनगर येथे घडली. तेथील रमेश गुलाब गजभिये (६१) हे कुटुंबीयांसह कर्करोगग्रस्त असलेल्या बहिणीला अमरावती येथे भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान, गजभीये यांच्या कुलूप बंद घरात चोरट्याने प्रवेश करून रोख १७ हजार रुपये, एक महागडा कॅमेरा तसेच सोन्या-चांदीचा ऐवज असा एकूण १ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. यावरून सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी पथकासह घटनास्थळ गाठले.
दोन्ही प्रकरणात रामनगर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
चोरीनंतर आलमारी केली व्यवस्थित बंद
माजी जि.प. सदस्य अमित ठाकूर यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्याने ज्या लोखंडी आलमारीतून सोन्याचा ऐवज लांबविला, त्याच आलमारीत वरच्या कप्प्यात चांदीचे साहित्यही होते; पण चोरट्याने त्याला हातही लावला नाही. शिवाय ज्या आलमारीतून सदर मुद्देमाल चोरून नेला, ती आलमारी चोरट्याने काम फत्ते केल्यानंतर व्यवस्थित बंद करून ठेवली होती. यामुळे चोरटाही तज्ज्ञच होता काय, असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. तत्सम चर्चाही रामनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांमध्ये सुरू होती.
श्वानपथक ठरले अपयशी
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी चोरी झालेल्या घरांची बारकारईने पाहणी केल्यानंतर चोरट्यांबाबतचा थोडातरी सुगावा लागावा या हेतूने श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथकाने तब्बल तासभर दोन्ही घटनास्थळी चोरट्यांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनाही पाहिजे तसे यश आले नसल्याचे सांगण्यात आले.

 वर्ध्यात लाखोंची मोहा दारू जप्त

वर्ध्यात लाखोंची मोहा दारू जप्त

'Wash-out' on a whiteboard | पांढरकवडा बेड्यावर ‘वॉश आऊट’वर्धा/प्रतिनिधी:
नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी सावंगी पोलिसांनी केली.
पांढरकवडा पारधी बेड्यावर गावठी मोह दारू गाळून त्याची विक्री वर्धा शहर परिसरातील अनेक गावांमध्ये केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनुसार, सावंगी पोलिसांच्या विशेष पथकाने ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या नेतृत्त्वात पांढरवडा पारधी बेड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दारूविक्रेत्यांकडून जमिनीत लपवून ठेवलेला कच्चा मोहरसायन सडवा शोधून तो नष्ट केला. शिवाय काही ठिकाणी दारू गाळण्याचे साहित्य आढळून आल्याने व गावठी मोहाची दारू आढळल्याने ती जप्त करण्यात आली आहे.
सदर कारवाईदरम्यान पोलिसांनी दारूविक्रेता रमेश चिमणे, शिंडू भोसले, शरद ठाकरे, इंद्रपाल भोसले याला ताब्यात घेवून त्यांच्याकडून २ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपींविरुद्ध सावंगी पोलीस ठाण्यात दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सावंगी (मेघे) ठाण्यातील पोलिसांनी केली.
आॅटोसह ३.६७ लाख रूपयांचा दारूसाठा पकडला


समुद्रपुर- येथील हिंगणघाट-उमरेड मार्गावर पोलिसांनी सापळा रचुन अवैधरीत्या दारुची वाहतूक करणाऱ्या आॅटोला अडवून वाहनातील विदेशी दारूसाठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी आॅटोसह ३ लाख ६७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय दारूची वाहतूक करणाºया तिघांना अटक करण्यात आली.

बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूरकडून चंद्रपूरकडे जाणाºया एम.एच.३१ टी.सी. १०८ या आॅटोची पोलिसांनी वाहन अडवून पाहणी केली. पाहणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तो पोलिसांनी जप्त केला आहे. आॅटोतून पोलिसांनी विदेशी दारू किंमत ५७ हजार ६०० रुपये तसेच ३३ हजार ६०० रुपये किंमतीची बियर तसेच आणखी काही दारूसाठा असा एकूण ३ लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात दारूची वाहतूक करणाºया शेख शाहिद शेख खालिद (२८) रा. नागपूर, निलेश हरिचंद्र निकोडे (२९), इम्रान अमान उल्हास खान पठाण (२९) रा. चंद्रपूर यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात समुद्रपुरचे ठाणेदार प्रविण मुंडे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण लिंगाडे, पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड, सचिन रोकडे, राजू जयसिंगपुरे, चरडे, कृष्णा इंगोले यांनी केली.

कारंजाच्या रस्त्यांवर लागले ब्रेकर्स;युवकांच्या मागणीला यश

कारंजाच्या रस्त्यांवर लागले ब्रेकर्स;युवकांच्या मागणीला यश

 कारंजा/प्रतिनिधी:
  शहरातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना खुप ञास सहन करावा लागत होता .वारंवार होणारे अप्धात   अतिशय वेगाने वाहत असलेले वाहने आता त्यांचा वेग हा गतिरोध कामुळे कमी झालेला आहे.
   शहारा लगत असलेले खेडे त्यातील बहुतांश नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना होत आसलेला त्रास हा कमी झालेला आहे.आताच काही दिवसांआधी एक वृद्ध नागरिकाचा या महामार्ग ओलांडताना जीव गेला याचीच दखल घेत करांजातील युवकांनी ऐकत्र येऊन गतिरोधक लावण्याकरिता पाऊल उचलले व त्या उचललेल्या पाऊलाला यश मिळाले.

चंद्रपूर जिल्ह्याचे एव्हरेस्ट वीर राष्ट्रपतींच्या शुभहस्ते सन्मानित

चंद्रपूर जिल्ह्याचे एव्हरेस्ट वीर राष्ट्रपतींच्या शुभहस्ते सन्मानित

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची उपस्थिती
चंद्रपूर/प्रतिनिधी:
‘शौर्य मिशन’’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करून चंद्रपूर या आदिवासी बहुल व ऐतिहासिक वारस्याचा धनी असलेल्या जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावत आपल्या या शौर्याचा नवइतिहास अखिल भारतीय स्तरावर पोहचविणाऱ्या आदिवासी विद्याथ्र्यांची दखल अखेर राष्ट्राची शान असलेल्या राष्ट्रपती भवनाने घेतली व महामहीमांच्या शुभहस्ते हे आदिवासी वीर सन्मानित झाल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या  शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तूरा खोवला गेला आहे. 
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार देशाचे गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या विशेष उपस्थितीमध्ये एव्हरेस्ट वीर ठरलेल्या मनिषा धुर्वे, विकास सोयाम, प्रथमेश आडे, कवीदास काठमोडे, उमाकांत मडावी व इतरांचा राष्ट्रपती कोविंद यांनी भेटवस्तू देवून सन्मान केला. त्यांच्या असामान्य शौर्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करून या विद्याथ्र्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून आदिवासींच्या शौर्याच्या इतिहासाला अजरामर केल्याची भावना या प्रसंगी व्यक्त केली. या शुरांच्या शौर्याची महती हा देश सदैव स्मरणात ठेवेल, लाखो युवक त्यांच्या या शौर्यातुन प्रेरणा घेतील असेही राष्ट्रपती कोविंद यांनी गौरवोद्गार काढले. 
आदिवासी या पे्ररणा व आनंददायी सोहळ्याला  आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, चंद्रपुरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील व एव्हरेस्ट सर करतांना माघार घ्यावी लागलेल्या इंदू कन्नाके, अक्षय आत्राम, शुभम पेंदोर यांचीही या विशेष सन्मान सोहळ्याला  उपस्थिती लाभली होती. राष्ट्रपती महोदयांशी हितगुज करतांना या वीर युवकांनी आपल्या एव्हरेस्ट चढाई प्रसंगीचे अनुभव कथन केले. आमच्यासाठी हा अत्यंत मौल्यवान ठेवा असल्याच्या भावना या विजयश्री संपादन केलेल्या आदिवासी एव्हरेस्ट वीरांनी व्यक्त करून आमच्या या यशात जिल्ह्यातील  व सहकार्याप्रती सदैव ऋणी राहू अशी भावना या सोहळा प्रसंगी व्यक्त केली.

Wednesday, June 27, 2018

अखेर अहमदनर शाळेला मिळाले शिक्षक

अखेर अहमदनर शाळेला मिळाले शिक्षक



राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस सह अहमदनगरवासींच्या आंदोलनाला मिळाले यश
कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:
नागपुर जिल्ह्यातील काटोल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बाहूल अहमदनगर गावात सन 1984 मध्ये निर्मीत शाळा़ दोन वर्षांपुर्वी ५मे २०१६ला आलेल्या वादळामुळे येथील छप्पर उडले. येथील ग्रामपंचायत   ल शाळा व्यवस्थापन समिती  ने संबधित विभागाला वेळोवेळी  पत्रव्यवहार केल्यावरही छप्पर टाकण्यात आले नाही. येथील शाळेची पटसंख्या कमी असल्याचे कारण देत येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाऊने दोन किमी स्थित जंगली मार्ग असलेल्या हेटी  गावात जाण्यास भाग पाडले.  अहमदनगर हे गांव संपुर्णताः आदीवासी बाहुल व जंगलीभागात वसलेले आहे.येथे जंगली प्राण्यांचा वावर असतो. यामुळेच अहमदनगर चे नागरिक आपल्या पाल्यांना हेटीच्या शाळेत पाठविण्यास राजी नाही.। या परीस्थीतीत ग्रामीण आदिवासी विद्यार्थी आपल्या शिक्षणापासुन  वंचित होऊ नये म्हणुन 19मार्च ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते व प्रदेश उपाध्यक्ष सलिल देशमुख व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आकाश गजबे यांनी   अहमदनगरच्या विद्यार्थी व पालकांसह संविधान चौक नागपुर येथे आंदोलन केले. तसेच नागपुर जिल्हापरिषदच्या तत्कालीन मुख्यकार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या व शाळा चालु करण्याचे निवेदन केले. ज्यावर तोडगा काठण्याची माहीती दिली होती.  सी ई ओ यांच्या आदेशावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगरला भेट देऊन रिपोर्ट वरीष्ठांना दिला होता तरी सुद्धा विद्यार्थ्यांकरीता शाळा सुरु होऊ शकली नाही या समस्येवर माहीती घेण्यात आली असता असे निदर्शनास आले की येथें 53घरे असुन लोकसंख्या 202 आहे. ज्यात 175अनुसुचित जमाती  तर अनुसुचित जाती चे 27 नागरिक येथे वासत्व्यास आहे. व शाळेत ७ पटसंख्या आहे. ज्यात ३ विद्यार्थीनी व ४ विद्यार्थी आहेत. येथील शाळेचे समायोजन हेटी येथे झाल्यावर विद्यार्थ्यांनी शाळेत जावे बंद केले.  आता येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आंधारात असल्याचे दिसुन येते होते. विद्यार्थी आहे परंतु  शिक्षक नाही या परीस्थीती मुळे पालकवर्ग चिंतातुर आहे.  येथील सरपंच जानराव बाहे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक सोमकुवर ने सांगीतले कि या 
 नागपुर जिल्ह्यातील काटोल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बाहूल अहमदनगर गावात सन 1984 मध्ये निर्मीत शाळा़ दोन वर्षांपुर्वी ५मे २०१६ला आलेल्या वादळामुळे येथील छप्पर उडले. येथील ग्रामपंचायत   ल शाळा व्यवस्थापन समिती  ने संबधित विभागाला वेळोवेळी  पत्रव्यवहार केल्यावरही छप्पर टाकण्यात आले नाही. येथील शाळेची पटसंख्या कमी असल्याचे कारण देत येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाऊने दोन किमी स्थित जंगली मार्ग असलेल्या हेटी  गावात जाण्यास भाग पाडले. अहमदनगर हे गांव संपुर्णताः आदीवासी बाहुल व जंगलीभागात वसलेले आहे.येथे जंगली प्राण्यांचा वावर असतो. यामुळेच अहमदनगर चे नागरिक आपल्या पाल्यांना हेटीच्या शाळेत पाठविण्यास राजी नाही.। या परीस्थीतीत ग्रामीण आदिवासी विद्यार्थी आपल्या शिक्षणापासुन  वंचित होऊ नये म्हणुन 19मार्च ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते व प्रदेश उपाध्यक्ष सलिल देशमुख व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आकाश गजबे यांनी   अहमदनगरच्या विद्यार्थी व पालकांसह संविधान चौक नागपुर येथे आंदोलन केले. तसेच नागपुर जिल्हापरिषदच्या तत्कालीन मुख्यकार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या व शाळा चालु करण्याचे निवेदन केले. ज्यावर तोडगा काठण्याची माहीती दिली होती.  सी ई ओ यांच्या आदेशावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगरला भेट देऊन रिपोर्ट वरीष्ठांना दिला होता तरी सुद्धा विद्यार्थ्यांकरीता शाळा सुरु होऊ शकली नाही या समस्येवर माहीती घेण्यात आली असता असे निदर्शनास आले की येथें 53घरे असुन लोकसंख्या 202 आहे. ज्यात 175अनुसुचित जमाती  तर अनुसुचित जाती चे 27 नागरिक येथे वासत्व्यास आहे. व शाळेत ७ पटसंख्या आहे. ज्यात ३ विद्यार्थीनी व ४ विद्यार्थी आहेत. येथील शाळेचे समायोजन हेटी येथे झाल्यावर विद्यार्थ्यांनी शाळेत जावे बंद केले.  आता येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आंधारात असल्याचे दिसुन येते होते. विद्यार्थी आहे परंतु शिक्षक नाही या परीस्थीती मुळे पालकवर्ग चिंतातुर आहे.  येथील सरपंच जानराव बाहे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक सोमकुवर ने सांगीतले कि या आदिवासी गांवातील विद्यार्थी वरिष्ठ अभियंता, प्राध्यापक, सैन्य व पोलीसमध्ये में अधिकारी म्हणुन कार्यरत आहे. बंद करण्यात आलेली हि शाळा सुरु करण्याबाबत निवेदन आंदोलन करुन सुद्धा प्रकरण मार्गी लागले नाही या दरम्यान नागपुर जि.प. च्या सी ई ओ यांची बदली झाली. त्यापश्च्यात सलील देशमुख व आकआश गजबे यांनी अहमदनगरवासीयांना सोबत घेऊन नागपुरचे नव नियुक्त  सी ई ओ यांची भेट घेऊन पुन्हाः  अहमदनगर शाळेबाबत समस्येचा पाठा वाचला व शाळा सुरु करण्याची मागणी केली. अखेर सलिल देशमुख, जि.प.सदस्य रामदास मरकाम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष स्वप्निल व्यास, आकाश गजबे  रविंद्र साठे व त्यांचे राष्ट्रवादीचे सर्व सहकारी यांनी २६जुनला अहमदनगर येथील  शाळेला शिक्षक  नियुुक्त झाल्याची माहीती दिली.  या संदर्भात काटोलचे खंड शिक्षणाधिकारी दिनेश धवड यांच्याकडुन माहीती घेतली असता सांगीतले की अहमदनगर येथील शाळा प्रारंभ करण्यात आली आहे.  तर याबाबत विद्यार्थी आहे पण शिक्षक नाही या संदर्भात आपल्या वृत्तपत्रात दि.१४ एप्रिल ला वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.
 पावसाच्या सलामीने चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला सुरुवात

पावसाच्या सलामीने चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला सुरुवात

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली असून पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ दया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेमार्फत आयोजित वृक्षदिंडीची सुरुवात करण्यापूर्वी उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. या वृक्षदिंडीच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने चंद्रपूर जिल्हयात सलामी दिली. 
चंद्रपूर जिल्हा परिषदेने राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेमध्ये 12 लक्ष वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद 1571 शाळांमध्ये 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना एक झाड लावायला देणार आहे. त्याची निगा राखण्यासाठी वृक्षसंवर्धन कृषी कार्यक्रम तयार करण्यात आला असून महिनावार या रोपाची निगा राखल्याची माहिती भरता यावे, असे रिपोर्टकार्ड तयार करण्यात आले आहे असेच रिपोर्टकार्ड कर्मचा-यांनाही देण्यात आले आहे. या दोन्ही रिपोर्टकार्डचे प्रकाशन ना.मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. 
कार्यक्रमानंतर पावसाळी वातावरणात आज उत्साहात या दिंडीला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाला संबोधित करतांना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज वनाचा मोठया प्रमाणात होणारा –हास बघता वृक्ष लागवड किती आवश्यक आहे, याबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे असून राज्यभर वृक्ष लागवड मोहीमेला उत्सवाचे स्वरुप आले आहे. चंद्रपूर जिल्हयाने गेल्यावर्षीही 4 कोटी वृक्ष लागवडीमध्ये भरीव कार्य केले होते. यावर्षी देखील 13 कोटी वृक्ष लागवडीमध्ये या जिल्हयाकडून मोठया प्रमाणात अपेक्षा व्यक्त करतो. या वृक्ष लागवडीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केलेला संकल्प सिध्दीस जावो, त्यांच्या नियोजनात ही मोहीम यशस्वी होवो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. भरपावसातही मोठया संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, सभापती अर्चना जिवतोडे, गोदावरी केंद्रे, ब्रिजभूषण पाझारे, संतोष तंगडपल्लीवार, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक रविंद्र शिवदास, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले व अन्य अधिकारी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवडीच्या मोहीमेला बळकटी देणा-या ग्रीनआर्मी नोंदणीला जिल्हयामध्ये उत्स्फूर्तप्रतिसाद असून 8500 वृक्षप्रेमींची नोंद करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचारी व प्रत्येक विद्यार्थी एक झाड लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वच्छता अभियानातंर्गत संपूर्ण हागणदारीमुक्त जिल्हयाची उपलब्धीही अभिमानाने नमूद केली. 
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संबोधित करतांना ना.सुधीर मुगंटीवार यांनी सुरु केलेल्या लोकचळवळीला 12 लक्ष वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाने बळ दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आतापर्यंत कोणत्याही वनमंत्र्यांनी अशा पध्दतीच्या मोहीमेला हाती घेतले नव्हते. महाराष्ट्राला हिरवेगार करण्याचे स्वप्न ना.मुगंटीवार यांनी पाहिले असून राष्ट्रीय सणासारखा उत्साह जनतेमध्ये आहे. जिल्हा परिषदेच्या 1571 शाळांमध्ये 1 लाख 25 हजार विद्यार्थी एक झाड लावणार व जगवणार आहे. कर्मचारी देखील हाच कित्ता गिरवणार आहेत. 
आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी संबोधित करतांना वनमंत्री झाल्यापासून ना.मुनगंटीवार यांनी 2 कोटी, 4 कोटी आणि आता 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घेतला असून मागील मोहीमेप्रमाणेच यावर्षी देखील ही मोहीम यशस्वी होईल. ना.मुनगंटीवार यांच्यामुळे कधीकाळी मागास जिल्हयाचे बिरुद लागलेल्या चंद्रपूर जिल्हयामध्ये आता जागतिक स्तरावरचे उपक्रम, योजना राबविल्या जात आहे. चंद्रपूरमध्ये वाघांची संख्या वाढली. पर्यटक वाढले, वेगवेगळया योजना, उपक्रमातून जिल्हयाचे नांव जागतिक स्तरावर गेले आहे. यासाठी चंद्रपूरची जनता आपले अभिनंदन करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच जिल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात आलेल्या वृक्षदिंडीच्या चित्ररथाला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.