कालची आणि आजची पत्रकारीता यात बरेच अंतर आहे.इलेट्रोनिक्स मीडियाच्या
झगमगात प्रिंट मीडियाचेही अस्तित्व टिकून आहे ही अत्यंत आनंददाइ बाब
मानली पाहिजे.आजतागायत आपण बघितले की बाळशास्त्री जांभेकर यांच "दर्पण
",टिळकांच "केसरी", आगरकराच "सुधारक" ,आचार्य अत्रेचा
"मराठा",डॉ.आंबेडकरांच "मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता अशी वृत्तपत्रिका
आपल्याला लाभली आहे.हे पत्रकार शब्दाशी खेळत समस्या सोडवली जात होती असा तो
काळ होता. आज लोकशाही चा चौथा आधार स्तंभ मानला जातो.आज या चौथ्या खांबाला
हलवीन्याचे प्रयत्न व्यवसाय व्यवस्थापणमुळे चालू आहे.पत्रकारांनी एकसंघ
होऊन शासन दरबारी आवाज उठवावा.पत्रकार हा जनतेची आरसा, शब्दसाधक
असतो.
त्याची जबाबदारी ही लोकशाही ला घातक ठरत असलेल्या समस्या सोडविने
जेणेकरून लोकशाही देशात अराजकतेच्या आहारी जाणार नाही.म्हणजेच शब्दाशी
खेळून समस्येचा मार्गी लावणारा धकाधकीचा साहित्यिक म्हणजे पत्रकार असे मत
महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ शाखा मुंबई शाखा ब्रम्हपुरी पत्रकार संघाचे
अध्यक्ष कविवर्य पत्रकार डॉ.धनराज खानोरकर यानी व्यक्त केले.
"दर्पणकार
"बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणजे पत्रकार दिन म्हणून पाडला
जातो.हा दिन खूप उत्साहात नुकत्याच झालेल्या ब्रम्हपुरी येथे पाडला जातो.या
दिनानिमित्त मा.श्री.विजय रामटेके, अरविंद चुनारकर,मा.श्री. शिवराज मालवी
सर , मा.श्री.गोवर्धन दोनाडकर म.रा.म .पत्रकार संघ सचिव ब्रम्हपुरी, महेश
पीलारे व्यासपिठावर उपस्थितीत होते,.रामटेके सर, चुनारकर सर , मालवीसर यानी
थोडक्यात मनोगत व्यक्त करून जांभेकराना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी मधुकर मेश्राम , प्रदीप बिंजवे , चंद्रशेखर सातव, गुरुदेव
अलोने, अनिल कांबळे, संजय बागडे, या पत्रकारांनी श्रम घेतले.लगेच २०१८ च
दिनदर्शिका वाटप करण्यात आली.चंद्रपुर जिल्हा मराठी
पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार सोहळा घेण्यात आला.त्यामध्ये मा.श्री
.नानाभाऊ पटोले यानी दै. देशोन्नतीचे पत्रकार श्री.रवी शेन्डे यांना शाल,
श्रीफळ व रोख देऊन सत्कार केला.
या सोहळ्यात
चंद्रपुर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिन समारंभ कार्यक्रमात
सहभागी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ब्रम्हपूरी तालुका सचिव श्री
गोर्वधन दोनाडकर, पिपंळगावचे उपसरपंच हेमराज कामडी, तंटामुक्त गाव
समीतीअध्यक्ष माधव उरकुडे, प्रल्हाद खोब्रागडे, व अन्य.उपस्थितित सोहळा
संपन्न झाला.