সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 04, 2018

रामटेक भूषण मधुकर किंमतकर अनंतात विलीन; साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप

 अॅड.  मधुकर किंमतकर यांचे पार्थिवावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार


रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेकचा विकास व त्यासाठी आयुष्य वेचणारे रामटेकचे सुपुत्र,रामटेक भूषण व राज्याचे माजी मंत्री,श्री समर्थ  शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व विदर्भ वैधानिक मंडळाचे तज्ञ सदस्य,विदर्भ अनुषेशाचे गाढे अभ्यासक अॅड मधुकर किंमतकर यांचे पार्थिवावर गुरूवारी दिनांक 4 जानेवारी 2017 रोजी दुपारी 2.30 वाजता रामटेकच्या अंबाळा मोक्षधामावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनांक 3 जानेवारी 2017 रोजी नागपुरला त्यांनी  गेटवेल या खाजगी रूग्णलयांत उपचारा दरम्यान शेवटचा श्वास  घेतला होता.मामा या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या किंमतकरांच्या निधनाची वार्ता कळताच रामटेकसह,विदर्भ शोकसागरांत बुडाले होते.             सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव रामटेकच्या त्यांच्या पैतृक निवासस्थानी आणण्यात आले.याठीकाणी अंत्यदर्शनानंतर त्यांना रामटेकच्या श्री समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यावेळी नागपुरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, विदर्भ सिंचन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश कुर्वे,पालकमंत्री व राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमदार व राज्य पंचायत राज समीतीचे अध्यक्ष सुधीर पारवे,आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी,आमदार आषिश देशमुख,माजी आमदार अॅड आशिष जयस्वाल,आनंदराव देशमुख,माजी मंत्री राजेंद्र मुळक,बाबुराव तिडके,राष्ट्रवादीचे सलील देशमुख,अतुल खंडार पाटील,नगराध्यक्ष दिलीप देशमुख,पर्यटक मीत्र चंद्रपाल चौकसे,सदानंद निमकर,दयाराम भोयर,नरेश बर्वे,रमेश कारामोरे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोक,शहराध्यक्ष आनंद चोपकर, भाजयुमोचे राहुल किरपान,संजय मुलमुले,सचिन किरपान,गजाननराव भेदे,उदयसिंह यादव,रंजित सफेलकर,देवेंद्र गोडबोले,तापेश्वर वैद्य,सुरेष कुमरे,माजी सभापती चंद्रकला मडावी,देवा कुमरे,योगेश वाडीभस्मे,भारत किंमतकर,रूशिकेष किंमतकर आदी मान्यवरांसह हजारो चाहत्यांनी अंत्यदर्शन घेतले. 
    12 च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा फुलांनी सजविलेल्या ट्रकवरून काढण्यात आली.किसान चौकातील तालुका कॉगेंस कमेटीच्या कार्यालयासमोर त्यांच्या  पार्थिवावर तालुकाध्यक्ष नकुल बरबटे,शहर अध्यक्ष ईसराईल शेख व अन्य पदाधिकारी यांनी पुष्पांजली अर्पण केली.पुढे ही यात्रा राष्ट्रीय आदआदर्श  विद्यालयांत पोहचली.यावेळी

विद्यार्थ्यांनी ‘जबतक सुरज चांद रहेगा,किंमतकर साहेब का नाम रहेगा’किंमतकर साहेब अमर रहे च्या घोशणांनी त्यांना अभिवादन केले.शाळेचे व्यवस्थापन समीतीचे पदाधिकारी,शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांचे पार्थिवावर पुष्पांजली अर्पित केली.यानंतर रामटेक नगरपालीकेच्या कार्यालयासमोर नगराध्यक्ष दिलीप देशमुख,उपाध्यक्षा कविता मुलमुले,मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांचेसह न.प पदाधिकारी व कर्मचारी यांनी आदरांजली अर्पण केली.यानंतर गांधी चौकात रामटेक व्यापारी मंडळाचे अध्यक्ष शंकर जिवतोडे,सुधिर धुळे,लक्ष्मीकांत कोल्हे यांचेसह व्यापारी बंधूनी श्रद्धांजली अर्पण केली,रामटेक नागरीक सहकारी पतसंस्था तर्फे अध्यक्ष विश्णू माकडे,नरेश  येलपुरे,किरण कारामोरे व अन्य पदाधिकारी व कर्मचारी यांनी पुश्पचक्र अर्पण केले.          श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय एनसीसी कॅम्पतर्फे मानवंदना देण्यात आली व अंत्ययात्रा अंबाळाकडे रवाना झाली.      अंबाळा मोक्षधाम येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पोलीस अधिक्षकशैलेष  बलकवडे,सहा.पो.अधिक्षक लोहीत मतानी,उपविभागीय अधिकारी राम जोशी ,तहसिलदार धर्मेष फुसाटे यांचे उपस्थितीत शासनातर्फे सषस्त्र पोलीस जवानांकडून हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.पुत्र प्रसाद किंमतकर यांनी स्व.मधुकर किंमतकर यांच्या चितेला भडाग्नी दिला.यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाालेल्या सभेत अॅड आशिष  जयस्वाल,सलिल देखमुख,माजी खासदार सुरेश  वाघमारे,अविनाश  कुर्वे,पत्रकार नितीन रोंघे,राजेंद्र मुळक,आम मल्लिकार्जुन रेड्डी,जेष्ठ  अर्थतज्ञ व किंमतकरांचे निकटचे सहकारी बि.टी.देशमुख यांनी आपल्या भाषणातून स्व.किंमतकर यांच्या कार्याचा गुणगौरव केला व श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी त्यांचे हजारो चाहते व रामटेककर उपस्थित होते.      किंमतकरांनी रामटेक विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्राच्या  विधानसभेत दोनवेळा प्रतिनिधीत्व केले.बाबासाहेब भोसले व वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही कार्य केले.विधानपरिषद  सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे.विदर्भ अनुषेशाचा षास्त्रषुद्ध अभ्यास व मांडणी यासाठी तर ते प्रसिद्ध होते.विदर्भ वैधानीक विकास मंडळावर ते अनेक वर्षापासुन तज्ञ सदस्य म्हणून कार्यरत होते.या मंडळावर असतांना त्यांनी रामटेक व परीसराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.