बनावट कागदपत्रामार्फत निविदा मिळविल्याचे तपासात निष्पन्न
नागपूर/प्रतिनिधी:
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपुर अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील मोखाबर्डी उपसासिंचन पुच्छ शाखा कालव्याच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहाराबाबद महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्या आदेशावरून उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांनी केलेल्या चौकशीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी विशेष न्यायाधीश( ला.प्र.का ) यांच्या न्यायालयात ४४५६ पानाचे दोषारोपपत्र सादर केले.
या कामांत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 20 जणांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये तत्कालीन मुख्य अभियंता आणि अधिकारी; तसेच भागीदार कंत्राटदारांच्या फर्मचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हे गुन्हे दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
विदर्भ पाटबंधारे विकास मंडळ नागपूर येथे नियुक्तीस असलेले अधिकारी आरोपी लोकसेवक यांनी त्यांना मिळालेल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून आरोपी कंत्राटदार मे.आर.जे.शहा कंपनी आणि ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (जे.व्ही) यांच्या भागीदारी गुन्हेगारी संगणमत करून नियमबाह्य निवडीचे अद्ययावतीकरण करून त्यांची भागिदारी फर्मला सदर ५६,५७,३२,680 रुप्याचे कंत्राक मिळवून दिले. बेकायदेशीर कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न केला असून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ राज्य शासनावर निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले
यांनी प्रस्ताव सादर केला यातील नमूद कार्यकारी अभियंता यांनी तांत्रिक मंजुरी मिळण्यापूर्वी निविदा सुचना प्रसिद्धीचा प्रस्ताव नियमबाह्यपणे सादर केला तसेच कार्यकारी अभियंता व विभागीय लेखाधिकारी यांनी घटनेने दिलेल्या पूर्वानुभवाच्या प्रमाणपत्राची योग्य प्रकारे छाटणी केली नाही त्याचप्रमाणे पुरता अर्ज छाननी समितीच्या बैठकीत उपस्थित अधिकारी यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ठेकेदारास पात्रते संदर्भात गुण देतांना नियमबाह्य सवलत देऊन पात्र अपात्र ठरविले असल्याचे व यासाठी मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता व संबंधित विभागीय अधिकारी जबाबदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
आरोपी कंत्राटदार मे.आर.जे.शहा कंपनी आणि ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (जे.व्ही) भागीदार यांनी सदर निविदा प्रक्रियेसाठी पूर्वानुभवाचा बनावट प्रमाणपत्र तयार करून ते सुबकॉन्ट्रॅक्टर म्हणून आहेत असे माहीत असताना प्रमुख कॉन्ट्रॅक्टर असल्याचे भासवून गुन्हेगारी कारस्थान करून कामाचे ठेका मिळविले त्यांच्या हाती दगडपारवा जि.अकोला येथे काम सुरू असताना या निविदा सादर करावयाच्या घोषणा पत्र मध्ये त्यांनी हाती वि.पा.वि.म अंतर्गत कोणतेही काम सुरू नसल्याचे बनावट घोषणा पत्र सादर केले. तसेच आणिच्या ऐवजी किंवा या शब्दाचा वापर करून गैरमार्गाने हे कंत्राक मिळवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
श्री.सोपान रामराव सूर्यवंशी पूर्वअहर्ता मूल्यांकन समिती अध्यक्ष तथा मुख्य अभियंता गोसीखुर्द प्रकल्प नागपूर, श्री. उमाशंकर वासुदेव पूर्वअहर्ता मूल्यांकन समिती सदस्य सचिव कार्यकारी अभियंता गोसीखुर्द उजवा कालवा विभाग ब्रम्हपुरी, श्री श्री चंदन तुळशीराम जीभकाटे वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी, श्री देवेंद्र परशुराम शिर्के सेवानिवृत्त कार्यकारी संचालक वि.पा.वि.म , श्री दिलीप देवराव पोहेकर अधीक्षक अभियंता यशस्वी कांट्रॅकदार आर.जे.शहा कंपनी लिमिटेड आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (जे.व्ही) चे भागीदार आरोपी क्र (६)कालिदीं राजेंद्र शहा (७) तेजस्विनी राजेंद्र शहा (८) विशाल प्रवीण ठक्कर ,जिगर प्रवीण ठक्कर,अरुण कुमार गुप्ता, रमेश कुमार सोनी,या प्रकरणात गोवल्या गेले आहेत. तपासाअंती यातील वि.पा.वि.म चे तत्कालीन अधिकारी आणि यशस्वी कांट्रॅकदार आरोपी कंत्राटदार मे.आर.जे.शहा कंपनी आणि ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (जे.व्ही) या फार्मचे सक्रिय भागीदार आरोपी यांचेवर कलम १३ (१)(क)(ड) सहकलम १३ (२) सहकलम १५ ला.प्र.का,सहकलम ४२०,४६७,४६८,४७१,१०९,१२०,(ब) भादंवि अनन्व्ये गुन्हा दाखल होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तपासात ४४५७ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते , न्यायालयाने यावर निर्णय देत पुढील तपास सुरु ठेवण्याचे सांगितले आहे. सादर गुन्याचा तपस श्री आर, पी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री गणेश कदम , पोलीस शिपाई मंगेश कळवे, महिला पोलीस शिपाई मंजुषा बुंधाले, यांनी पूर्ण केला.