भंडारा/प्रतिनिधी:
उमरेड - कराण्डला अभयारण्याची शान असलेला जयचंद हा वाघ लागूनच असलेल्या गोसेखुर्दच्या मुख्य कालव्यात पडला असल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली , मिळालेल्या माहितीवरून हा वाघ शिकारी करीता पाठलाग करत असतांना नहरात पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे . .जवळपास दुपारी १ वाजताच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचे समजते आहे, जयचंद हा तब्बल ३ तास पाण्यातून बाहेर येण्यासाठीचे प्रयत्न करत होता. मात्र त्याला पाण्याबाहेर येणं शक्य होत नव्हते . हि घटना वाऱ्यासारखी पसरताच घटनासाठली गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती
त्याच्या बचावासाठी ,वन विभागची टीम तसेच पोलिसांचा ताफा घटना स्थळी दाखल झाला असून जयचंद या वाघाला पाण्याबाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.काही वेळातच वनविभागाच्या पथकाने लांबसीडी लावली आणि काही क्षणातच तो सीडीच्या साहाय्याने बाहेर येत थेट जंगलात निघून गेला .