সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, January 08, 2018

ग्रामीण भागातील पत्रकारांनी शेतकरी,कष्टकरी यांच्या समस्या लिहाव्या: माजी मंत्री राजेन्द्र मुळक

रामटेक तालुका प्रतिनिधी:
तालुकास्तरावर व ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांनी शेतकरी,कष्टकरी यांच्या व्यथा,वेदना प्रभावीपणे लिहाव्यात.ग्रामीण भारताचे हे महत्वाचे घटक असले तरी त्यांना मात्र अद्यापही योग्य ते जीवनमान मीळाले नसल्याची खंत राज्याचे माजी मंत्री व नागपुर जिल्हा ग्रामीण कॉग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केली.रामटेक तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व तालुक्यातील बातमीदारांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते आपले विचार व्यक्त करीत होते. 
      पत्रकार दिनाच्या निमीत्ताने त्यांच्या रामटेक येथील कार्यालयांत बातमीदारांचा सत्कार समारंभ दिनांक 8 जानेवारी 2017 रोजी संपन्न झाला.यावेळी रामटेक तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष नकुल बरबटे,मत्स्य विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक बर्वे,जि.प.सदस्या शांता कुमरे,जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष असलम शेख,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष त्रिलोक मेहर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 
   रामटेकचे सर्वश्री सादिक अली कुतूबी,विजय पांडे,वसंतराव डामरे,राहुल पेटकर,नत्थू घरजाळे,हरीहर अपराजित,ललित कनोजे,अशोक सारंगपुरे,पंकज बावनकर, जगदीश  सांगोडे,अनिल वाघमारे,राहुल पिपरोदे,अविनाश पगाडे, नंदकिशोर चंदनखेडे,सतीश  डोंगरे,मनोज मलघाटे,कमलेश  सहारे,आकाश 
सहारे,कृष्णा भाल आदी पत्रकारांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. 
आपल्या संबोधनातून त्रिलोक मेहर यांनी ग्रामीण बातमीदारांना असलेल्या समस्या उपस्थितांसमोर मांडल्या.अनेक बातमीदारांनीही यावेळी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाला रामटेक व ग्रामीण भागातील नागरीक बंधूभगीनी मोठया संख्येत उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेवक दामोधर धोपटे यांनी केले तय उपस्थितांचे आभार नकुल बरबटे यांनी मानले. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.