সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 05, 2018

अखेर पालिकेने "निर्मला देवी रोड" नामांतरणाचे फलक हटविले


 
ग्रीन प्लेनेट व  ईको-प्रो संघटनेचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मानले नागरिकांचे आभार   

Image may contain: one or more people, tree and outdoorचंद्रपूर(ललित लांजेवार):
जगप्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर शहरातील तुकुम येथून  ताडोबा जाणाऱ्या  मार्गाचे नामकरण  करून  या मार्गाचे नाव निर्मला माता  करण्याचा ठराव चंद्रपूर महानगर पालिकेत ठराव पारित केला होता  . या ठरावाला  शहरातील विविध संघटनांकडून व सुजाण नागरिकांकडून निवेदने  व सोशल मीडियाच्या माध्यमातून  विरोध होऊ लागताच पालिकेने ठराव मागे घेत नामांतरण उद्घाटनाची तयारी झालेले फलक शुक्रवारी सकाळच्या सुमारास हटविले.  

काही दिवसाअगोदर पालिकेने आमसभेत या मार्गाच्या नामांतरणाचा ठराव मंजूर केला होता, ४ जानेवारी ला सकाळी एक समारंभ घेवनू या मार्गाचे निर्मला माता असे नामकरणक केले जाणार होते. तशा निमंत्रन पत्रिका शहरात वाटल्या गेल्या होत्या. जाहिरातबाजी देखील मोठ्याप्रमाणात करण्यात आली होती. मात्र ह्या नामांतरणाची माहिती शहरातील पर्यावरण,सामाजीक क्षेत्रातील कार्यकर्त्याना मिळताच ह्याचा विरोध करीत महापालीकेच्या लक्षात आणून दिले .  
                        चंद्रपूर ते ताडोबा रोड अत्यंत महत्वाचा आहे, हा राज्य महामार्ग असल्याने त्याचे नामकरण महापालकेला करता येते काय? ताडोबा इतका महत्वाचा असल्याने त्याचे पुन्हा नव्याने नामकरण  करायची गरज  आहे काय?  आणि करायचे असेल तर  धार्मीक वा    संप्रदायाचे नांव        देणे उचीत नाही,    असे निवेदनकर्ते    प्रा. सुरेश    चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, संजय चिताडे,  सूर्यभान  झाडे,अंकुश दाते, अनिल चिताडे, अशोक चिताडे, संजय चिताडे, रामकृष्ण बेले ,   संजय चांदेकर,डॉ. विद्याताई  बांगडे यांनी निवेदनाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता. सोबतच चंद्रपूर येथील ग्रीन प्लेनेट, ईको-प्रो संघटनेने देखील या नामांतरनाला विरोध दर्शवित याबाबत वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे तक्रार केली होती . 

४ जानेवारीला या  नामांतरण कार्यक्रमाचा मोठा फलक  शहरातील वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर लावण्यात आला होता मात्र विविध स्थरावरून विरोध होताच पालिकेने एक पाऊल मागे घेत संपूर्ण बणाबणाया कार्यक्रम रद्द केला. याबाबाद अनेक नागरसेवकांनी देखील या नामांतरणाला विरोध केला त्यामुळे आता या मार्गाचे नाव हे ताडोबा मार्गच  हे स्पष्ट झाले आहे.

ताडोबा रोड स्वाक्षरी अभियान सुरु
घडलेल्या संपूर्ण प्रकारावरून ताडोबा रोडचे "ताडोबा रोड" ह्याच नावाचा महानगरपालिकेने रीतसर ठराव घेऊन या रोडचा नामकरण सोहळा पुन्हा करावा या मागनिकरिता चंद्रपूर शहरात इको-प्रो संस्थेकडून  'स्वाक्षरी अभियानाचे  येणार आहे.

या घडलेल्या संपूर्ण प्रकारानंतर किमान यापुढे असे नामकरण करण्यापूर्वी महानगर पालिकेने "Notification" काढायला पाहिजे, नागरिकांची "Objection"( नागरिकांचे मत ) मागितले पाहिजे. आपल्या शहराचे वैभव, आपला इतिहास बदलता कामा नये याकरिता सर्व चंद्रपुरकर याच प्रकारे पुढे सुद्धा संघटितपणे लढा देण्याची गरज आहे.- बंडू धोतरे, अध्यक्ष, इको-प्रो संस्था

Image may contain: 15 people, people standing and outdoor



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.