चंद्रपूर/प्रतिनिधी : चंद्रपूर येथील वरोरा २२० केव्ही वीज उपकेंद्राच्या ट्रान्सफॉर्मरला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वरोरा २२० केव्ही वीज उपकेंद्राचे २ ट्रान्सफॉर्मरमध्ये भीषण स्फोट झाले आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. थंडीच्या दिवसात ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती सध्यातरी मिळू शकली नाही .
- या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले.हि आग जवळच अ सलेल्या मुख्य उपकेंद्रापर्यंत पोहचू नये म्हणून वीज कर्मचाऱ्यांनी तत्काळ वीजपुरवठा खंडीत केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यास मदत झाली.
- आगीचे स्वरूप इतके हि भयानक होते कि हि आग वीजविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मंगलवारी सकाळी ६ वाजेपरीयंत मेहनत घ्यावी लागली.
- या लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील जवळपास ३० ते ३५ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याची माहिती आहे तर महापारेषण विभागाचे लाखोंचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे
- हा संपूर्ण वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जवळपास ३६ तासांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या घटनास्थळी ऊर्जाविभागाचे बडे अधिकारी पोहचले असून हि आग नेमकी कशामुळे लागली याचा तपस सुरु आहे.