ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण प्रतिनिधी :-
आज दि.२/१२/२०१८ ला स्थानीक लोकमान्य टिळक वाचनालय ब्रम्हपुरी येथे
भारतीय जनता पार्टी तालुक्यातील १०८ बुथ प्रमुखांचा अभ्यास वर्ग घेण्यात
आला. या अभ्यास वर्गाला प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी विधासभेचे
माजी आमदार प्रा.अतुल देशकर,तसेच तालुका अध्यक्ष नानाजी तुपट, चंद्रपूर
जिल्ह्याचे ओ. बी.सी.सेल चे अध्यक्ष प्रा.प्रकाशजी बगमारे,विधानसभा प्रमुख
शेख सर,भाजपा नगर अध्यक्ष जगदिशजी तलमले,भाजयुमो शहर अध्यक्ष प्रा. सुयोग
बाळबुधे,ब्रम्हपुरी प.स. सभापती सौ.प्रणालीताई मैद,उपसभापती विलासजी उरकुडे
व मुख्यमंत्री वार रूम मुंबई चे सदस्य निकेश कुकडे मंचावर उपस्थित होते.या
वर्गाचे संचालन मा.रामलालजी दोनाडकर तालुका अध्यक्ष भाजयुमो यांनी केले तर
प्रास्ताविक शेख सरांनी करताना बुथ प्रमुखाचे महत्त्व व त्यांच्यावर
असलेल्या जवाबदारी बद्दल समजावून सांगितले,तसेच प्रा.प्रकाशजी बगमारे यांनी
भारतीय जनता पार्टी ची पार्श्वभूमी व इतिहास जनसंघा पासून ते भाजपा पर्यंत
चा इतिहास समजावून सांगत बुथ विस्तारावर भर दिला,तसेच निकेशजी कुकडे यांनी
पं. दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजने अंतर्गत राबवत असलेल्या
महाविस्तार अभियानात बुथ प्रमुखांच्या कार्यप्रणाली बद्दल विस्तृत माहिती
दिली व बिजेपी महाआप्स बद्दल समजावून सांगितले,तसेच मा.अतुलभाऊ देशकर यांनी
आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व बुथ प्रमुखाचे मनोबल वाढविताना २०१९ मध्ये
होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी साठी कशा पद्धतीने बुथ प्रमुख महत्वपूर्ण
ठरेल यावर भर दिला.या कार्यक्रमाचे आभार मा.मनोजजी भुपाल शहर महामंत्री तथा
नगरसेवक न.प. ब्रम्हपुरी यांनी मानले.