সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 11, 2018

इरई धरणातील पाणी शहरास आरक्षित करण्याची इको-प्रो ची मागणी

200.500 मीटर धरणाची लेवल च्या वर विजनिर्मीती करीता पाण्याची उचल करू नये 

जिल्हाधिकारी यांना निवेदन - पाणी बचत करिता नागरीकांना इको-प्रो चे आवाहन

चंद्रपूरः यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे विशेष करून इरई धरणात पाणी साठा फारच कमी आहे. यामुळे इरई धरणावर निर्भर असणाऱ्या चंद्रपूर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक बिकट होण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. उन्हाळयात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई समस्या पासुन चंद्रपूर शहराला पाण्याचा समस्येपासुन वाचविण्याकरीता इरई धरणातील पाणी चंद्रपूर शहराकरीता आरक्षीत करण्याच्या मागणीचे निवेदन इको-प्रो संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना (2 जाने रोजी) देण्यात आले आहे.

इरई धरणाच्या पाण्याच्या वापर विज निर्मीतीकरीता आणी शहरास पिण्यासाठी होत असल्याने आणी यंदा धरणात पाणी साठा अत्यल्प असल्याने ते वेळीच नियंत्रीत करण्यात न आल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे. निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे सध्या स्थितीत धरणात 203.175 मीटर पातळीपर्यत म्हणजेच 34 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णीक विदयुत केंद्र व्यवस्थापन धरणातील पाण्याची पातळी 198.000 मीटर पर्यत विजनिर्मीती करीता पाण्याची उचल करणार असल्याचे कळते. 198.000 मीटर पातळी पर्यत धरणात जवळपास 7 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक असेल.

धरणाच्या 198.000 मीटर पातळी नुसार धरणातील पाणी साठा अत्यल्प असुन इरई धरणाचा मृत साठा असेल. त्याचवेळेस इकडे भर उन्हाळयात शहरातील नागरीकांची पाण्याची समस्या अधिक तिव्र होणार आहे. कारण, यंदाचा अत्यल्प पावसामुळे भुजल पातळी सुध्दा वाढलेली नाही त्यामुळे शहरातील बोअर आणी विहरीची भुजल पातळी खालावलेली आहे. आज वर्तमान परीस्थीतीत चंद्रपूर शहराला 1 दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. तसेच विजनिर्मीती करीता 7 दशलक्ष घनमीटर पाणी असे दर महीन्याला 8 दशलक्ष घनमीटर पाणी उचल होत आहे. अशा परीस्थीतीत आजच्या धरणातील पाणी पातळीनुसार पुर्ण विज प्रकल्प येत्या 2-3 महीन्यात बंदच करावा लागेल. हीच परिस्थीती जवळपास 2010 मध्ये निर्माण झाली होती. पंरतु, चंद्रपूरकरांना पिण्याचे पाणी मिळावे याकरीता इको-प्रो संस्थेने घागर पदयात्रा, धरणे आंदोलन आणी चंद्रपूर बंद यासारखे आंदोलन केलेली होती. 

किमान यावेळेस प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन येत्या काही महीन्यात निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची संकटकालीन परीस्थीती असल्याने याचे पुर्व नियोजन होणे गरजेचे आहे. कारण यापुर्वी 2010 मध्ये निर्माण झालेली समस्या आणी प्रशासनाला आलेला अनुभव यावरून त्वरीत निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. आणी 198.000 मीटर पातळीवर पाणी उचल बंद करण्यासंदर्भात खालील प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनातुन स्पष्ट करण्यात आलेले आहे.

1. 198.000 मीटर पातळीवरील मृत साठा खरंच 7 दशलक्ष घनमीटर पाणी असेल काय ? आणी असेल तर त्यात गाळ किती आणी पाणी किती असेल ? 

2. कारण धरणाच्या निर्मीतीपासुन (30 वर्षा पेक्षा अधिक काळ) अदयापही हा गाळ काढण्यात आलेला नाही. या पातळीला धरणात पाण्यापेक्षा अधीक गाळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

3. यावेळी धरणात पिण्यायोग्य पाणी किती असेल आणी किती पाण्याची उचल करणे शक्य असेल. 2010 मधील अनुभव नुसार गाळ स्वरूपातील पाणी उचलणे मोठे जिकरीचे कार्य आहे. 

4. तसेच उन्हाळा सुरू होत असल्याने या महीन्यापासुनच पाण्याचे जमीनीत झीरपण्याचे (पाझर) आणी बाष्पीभवन होण्याचे प्रमाण सुध्दा सतत वाढत जाणार आहे.

5. यंदा पावसाळा लांबला तर अजुनच शहरात पाणी समस्या अधीक तिव्र होईल. 

6. यावर उपाय म्हणुन धरणातील पाण्याची पातळी 200.500 मीटर वर विजनिर्मीती करीता पाण्याची उचल बंद करावी.

7. विजेपेक्षाही पिण्याचे पाणी महत्वाचे असुन जवळपास 4 लाख पेक्षा अधिक चंद्रपूरकर यावर निर्भर आहेत.

8. 2010 मध्ये पाण्याची समस्या बघता चंद्रपूरकरांसाठी पिण्याचे पाण्याची सोय व्हावी म्हणुन चारगांव धरणातुन पाणी इरई धरणात सोडण्यात आले होते परंतु यंदा चारगांव धरणात सुध्दा पाणी साठा कमी आहे. 

या सर्व बाबीचा विचार करता जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे रितसर पत्रव्यवहार करून समस्या लक्षात आणुन दयावी, तसेच विज निर्मीती करीता पाण्याची उचल ही 200.500 मीटर पातळीवरच बंद करावी अशी मागणी इको-प्रो च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केली आहे.

 

विज प्रकल्पाची महीन्याकाठी गरज आणी शहराची गरज यात प्रचंड तफावत आहे, चंद्रपूर महाऔष्णीक विदयुत केंद्राने विज प्रकल्प बंद करण्यापुर्वी महानगरपालीकेने शहराच्या पाणीपुरवठा मध्ये कपात करू नये अशी मागणी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले आहे. तसेच उन्हयाळयातील पाण्यासंदर्भातील संकटकालीन परिस्थीती बघता चंद्रपूर शहरातील नागरीकांनी सुध्दा पाण्याचा अत्यल्प वापर करीत पाणी बचत करण्याचे आवाहन केलेले आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.