সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, January 31, 2018

चंद्रपुरातील ‘घोडाझरी’ अभयारण्याच्या निर्मितीला शासनाची मंजुरी

चंद्रपुरातील ‘घोडाझरी’ अभयारण्याच्या निर्मितीला शासनाची मंजुरी

चंद्रपूर/प्रतिनिधी:                                     
चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील ‘घोडाझरी’ या नवीन अभयारण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत या अभयारण्याच्या निर्मितीस परवानगी देण्यात आली. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवरही उपस्थित होते.
ब्रम्हपुरी वन विभागातील एकूण 159.5832 चौ.कि.मी क्षेत्र घोडाझरी अभयारण्यात समाविष्ट होणार असून या क्षेत्रामध्ये वन विभागातील नागभीड, तळोधी व चिमूर वन परिक्षेत्रातील पहाडी जमीनीचे आणि घोडाझरी तलावालगतचे वनक्षेत्र आहे.

या क्षेत्रामध्ये सात बहिणी पहाड, मुक्ताई देवस्थान- धबधबा असून प्रस्तावित अभयारण्याच्या पूर्व भागास नागपूर ते चंद्रपूर रोड आहे. या वनक्षेत्रात पहाडी भाग मोठ्याप्रमाणात असून वन्यजीवांच्या अधिवासासाठी हा भाग अतिशय उपयुक्त आहे.या वनक्षेत्रात 10 ते 15 वाघ, 23 बिबटे यासह रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, कोल्हे, रानडुक्कर, माकड आणि ससे यासारखे वन्यजीव वास्तव्यास आहेत. या अभयारण्याच्या निर्मितीमुळे आजुबाजूच्या 59 गावांमध्ये रोजगार निर्मिती होईल.

घोडाझरी हे राज्यातील हे ५५ वे अभयारण्य ठरणार असून यामुळे इको टुरिझमला चालना मिळेल, या अभ्यारण्याच्या निर्मितीवर येत्या आज बुधवारी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तबकरण्यात आला.
पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा घोडाझरी हा महत्त्वाचा कॉरिडोर आहे. घोडाझरीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारे आहे. नागपूरपासून १०३ किमी अंतरावर घोडाझरी असून याबाबतचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडून राज्य शासनाला केला होता .

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह ५४ अभयारण्य असून राज्यातील घोडाझरी हे ५५ वे अभयारण्य ठरणार आहे. १६० चौ. किमीचे ब्रह्मपुरी वनविभागातील नवे अभयारण्य अस्तित्वात येणार असल्याची शक्यता आहे. मागील वर्षी येथे जंगल सफारी सुरू करण्यात आली. मात्र, त्यास हवा तसा खास प्रतिसाद मिळालेला नाही. आता मात्र, या अभयारण्याच्या रूपाने इको टुरिझमला बुस्टर मिळणार आहे.एकाच दिवशी होणाऱ्या जंगलभ्रमंतीत जंगली पशुपक्ष्यांचे दर्शन आणि घोडाझरीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येईल,अशी माहिती सूत्राने दिली.

दोन गावांचे पुनर्वसन
या अभयारण्यात कोरंबी व घोडाझरी ही दोन गावे येतात. या दोन्ही गावांचे पुनर्वसन होणार असल्याची शक्यता आहे. तशा मौखिक सूचना वन विभागाकडून तेथील सरपंचांना दिल्या असून ठराव मागितले आहे. पर्यटकांना या अभयारण्यात हिरापूर येथील महापाषाणयुगीन मांडव गोटा व डोंगरगाव येथील खडक चित्रे यांचा समावेश केला जाणार आहे.Image result for घोडाझरी
चंद्रपुरातील ‘घोडाझरी’ अभयारण्याच्या निर्मितीस मंजुरी

विरोधकांच्या गदारोळाणे गाजली मनपाची आमसभा

विरोधकांच्या गदारोळाणे गाजली मनपाची आमसभा

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
चंद्रपूर मनपाच्या नगरोत्थान निधीचा वाद संपता संपेना बुधवारी मनपाच्या सभागृहात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी नगरोत्थान निधीचा विषय, अंबुजा कंपनी कचरा प्रक्रिया विषय, सराई मार्केट या विविध विषयांवर सभागृहातील वेलमध्ये जाऊन चांगलाच गदारोड बघायला मिळाला. सत्ताधार्यांनी नगरोत्थान निधी स्वत:च्या प्रभागात पळविळ्याचा आरोप बसपा गटनेता अनिल रामटेके यांनी केला आहे, यात विरोधकांनी वेलमध्ये येऊन संपूर्ण पदाधिकार्यांसमोर ठिय्या देत तीव्र निषेध नोंदविला.

राज्यसरकारकडून प्रत्तेक वर्षी शहरातील प्रभागाच्या विकास कामांसाठी नगरोत्थान निधी देण्यात येतो. या नगरोत्थान निधीचे समांतर वाटप हे प्रत्तेक नगरसेवकाला द्यावे लागते.  यावेळी देखील ८ कोटी  ७५ लाख २० हजार ७०० रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला होता . निधीच्या वाटपासाठी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे आणि गटनेता वसंता फुलझेले यांचा समावेश असलेली समिती गठीत केली होती. समितीकडून निधीचे समान प्रमाणात वाटप होईल, अशी सर्व नगरसेवकांना आशा होती. मात्र, पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या प्रभागात अधिकाधिक निधी ठेवून घेत काही नगरसेवकांना लाखो रुपयांची कामे दिली गेली. तर, अनेक प्रभागात निधी देण्याचा समितीला विसर पडला. त्यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवकांसह समर्थन देणारे मनसे, सेना, अपक्ष नगरसेवक आणि बसप नगरसेवकांत तीव्र संताप व्यक्त केला   . सत्ताधार्यांनी सत्तेतील अधिकाराचा गैर फायदा घेत या नगरोत्थान निधीच्या वाटपाच्या समितीतील सदस्यांनी ७० टक्के निधी हा आपल्याच प्रभागात वडता केला व ईतर नगरसेवकांना कमी प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले.  त्यामुळे उर्वरित सत्तेतील व विरोधातील काही नगरसेवकांनी सभागृहात चांगलाच गदारोळ घातला. महापौर अंजली घोटेकर यांनी विश्राम गृहात नाराज गटनेत्यांची बैठक घेतली होती व त्यांना नगरोत्थान व दलित वस्तीतील ४० टक्के कामे देण्याचे आश्वासन दिले होते मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्याने आज विरोधकांनी मनपाच्या सभागृहात चांगलाच गोंधळ घातला, यात बसप गटनेते अनिल रामटेके,पप्पू देशमुख ,पुष्पा मून, रंजना यादव, लक्ष्मी कारंगल, पितांबर कश्यप, धनराज सावरकर, बंटी परचाके,प्रदीप डे,  व अन्य नगरसेवकांनी संताप व्यक्त करत चांगलाच गदारोळ घातला. या आधीही नगरोत्थान निधीच्या वादावरून उपमहापौर अनिल फुलझेले आणि भाजपचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्यात  चांगलीच शाब्दिक झाली होती.

मनपाच्या आमसभेत पप्पू देशमुखांचे "अंबुजा गो बॅक"
बुधवारी झालेल्या मनपाच्या आमसभेत अंबुजा सिमेंट कंपनीला चंद्रपूर शहराच्या कंपोस्ट डेपोतील कचरा देण्याचा विषय अजेंड्यावर होता. शहर विकास आघाडीचे गटनेते तसेच प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या संदर्भात एक पत्र देखील महापौर अंजली घोटेकर यांच्या नावे लिहले होते. उपरवाही ग्रामसभेने अंबुजामध्ये प्लास्टिक व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते.यामुळे दुर्गंधी व अनारोग्य पसरत असल्याने कंपनीविरोधात कारवाई करण्यात यावी असा ठराव उपरवाही ग्रामसभेत घेण्यात आला होता.या ठरावाची प्रत देशमुख यांनी महापौर यांना दिलेल्या तक्रारीसोबत जोडलेली होती.या तक्रारी च्या प्रत देशमुख यांनी सर्व नगरसेवकांना देऊन सहकार्य करण्याची विनंती सुध्दा केली होती.चंद्रपूर मनपाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य करीत असतांना अश्या बेजाबदार पाने काम करणाऱ्या व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या तसेच गोरगरीब ग्रामीण लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कंपनीला प्रक्रीया करण्यासाठी कचरा देणे चंद्रपूर मनपासाठी भूषणावह ठरणार नाही अशी भूमिका नगरसेवक पप्पू देशमुख  त्यांनी मांडली होती. हा विषय आमसभेत चर्चेला आल्यानंतर देशमुख व अन्य काही नगरसेवकांनी अंबुजा "गो बॅक" चे नारे दिले व त्यानंतर सर्वानुमते अंबुजाला कचरा देण्याचा ठराव रद्द करण्यात आला.

वडगाव प्रभागातील दत्त नगरला नगरोत्थानमधून डावलल्याचा निषेध..
शहरातील वडगाव प्रभाग हा एक महत्वाचा प्रभाग गणल्या जातो.वडगाव प्रभागातील दत्त नगरमध्ये 900 च्या वर लोक वास्तव्यास आहे. या प्रभागात गेल्या  20 वर्षापासून रस्ते,नाल्या यासोबतच अनेक विकासकामे झालेली नाहीत.२०१७-२०१८  या वर्षासाठी आलेल्या नगरोत्थानमधेही दत्त नगरला वगळण्यात आले.याचाही नगरसेवक देशमुख यांनी महापौर यांच्या डायस समोर जाऊन निषेध केला.

सराई मार्केटची ईमारत ठाकूर यांच्या संस्थेला देण्यास नगरसेवकांचा विरोध.
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथील महानगर पालिकेच्या मालकीची ६३४९.५९ चौरस मीटर मध्ये असणारी इमारत गेल्या काही वर्षापासून जीर्ण अवस्थेत आहे, जुन्याकाळी हि ईमारत धर्मशाळा म्हणून वापरली जात होती. सध्या हि ईमारत भग्नावस्थेत असल्याने इंडिअन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज चालविणाऱ्या ईतिहासकार अशोकसिंग ठाकूर यांनी हि ईमारत त्यांच्या संस्थेला मिळावी यासाठी मनपात २६ डिसेंबर २०१७ ला अर्ज केला होता. अशोकसिंग ठाकूर हे पुरततव जाणकार असून ते विविध विषयांवर प्रदर्शनी भरवित असतात.  मनपाने हा विषयाला २८ डिसेंबरला सर्वसाधारण सभेत मंजुरी देखील प्रधान करण्यात आली होती.  मात्र काही नगरसेवकांनी शासनाची ऐतिहासिक ईमारत एका अशासकीय संस्थेला देण्यात येऊ नये यासाठी विरोध दर्शविला. तर पप्पू देशामुख यांनी या ऐतिहासिक इमारतीला जर मनपा कोणाला देत नसेल तर या ईमारतीला विकसित करत त्यात राणी हिराईचे संग्रहालय बनविण्यात यावे अशी मागणी यावेळी केली. 



चंद्रग्रहन live  बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा आणि घर बसल्या बघा चंद्रग्रहण

चंद्रग्रहन live बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा आणि घर बसल्या बघा चंद्रग्रहण

संध्याकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ झाला असून  6 वाजून 21मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल आणि 6वाजून 25 मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रदोय होऊन सुपर-ब्ल्यू-ब्ल्डमूनचे दर्शन होत आहे.

खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी होईल आणि रात्री 8 वाजून 42 मिनिटांनी ग्रहण सुटेल. दरम्यान, शिर्डी येथील साईमंदिर चंद्रग्रहण काळात बंद राहणार आहे.
मुख्यप्रशासकाचे पद लबाडी करून लाटल्याची चौकशी थंड बस्त्यात

मुख्यप्रशासकाचे पद लबाडी करून लाटल्याची चौकशी थंड बस्त्यात

राजकीय दबावाखाली कारवाई होत नसल्याचा 
किरपान यांचा आरोप 
कारवाई न झाल्यास आमरण उपोशणाचा ईशारा
 रामटेक तालुका प्रतिनिधी:  
 रामटेकचे  कृषी उत्पन्न बाजार समीतीचे मुख्यप्रशासक अनिल लक्ष्मणजी कोल्हे हे व्यवसायाने  शिक्षक आहेत मात्र त्यांनी आपण शिक्षक असल्याची माहीती शासनाला सादर केलेल्या शपथपत्रातून लपविली व त्यामुळे त्यांची नियुक्ती मुख्यप्रशासक या पदावर करण्यांत आलीत्यांनी आपला धंदा शेची अर्धसत्य माहीती देवून हे पद लाटले या प्रकरणाची चौकशीचे जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालयांत प्रलंबित असून याबाबत अक्षम्य टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप दणका युवा संघटनेचे रामटेक तालुकाध्यक्ष अजय किरपान यांनी बातमीदारांशी बोलतांना केला.याप्रकरणी आठवडाभरांत कारवाई झाली नाही तर आमरण उपोषनाद्वारे केला आहे.  रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीचे अषासकीय प्रशासक मंडळाची नुकतीच राज्य सरकारने घोषणा तसे अधिकृत आदेश नागपुर जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले यांनी जारी केले व त्यानुसार मुख्य प्रशासक अनिल कोल्हे,उपमुख्यप्रशासक किशोर रहांगडाले व अन्य प्रशासकांनी दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी कार्यभार स्विकारला.मात्र अलिकडेच आकोट कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या अतुल माधवराव म्हैसने या संचालकांना अकोल्याचे जिल्हा निबंधक यांनी ते नोकरी करीत असल्याने अपात्र घोशित केल्याने व अशाच कारणांसाठी आकोटच्या बाजार समीतीच्या सभापतीसह सात संचालकांनाही अपात्र घोशित केल्याने रामटेकच्या बाजार समीतीचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्यप्रशासक अनिल कोल्हे हे पदावर कसे काय राहू शकतात असा प्रश्न अजय किरपान यांनी उपस्थित केला होता. कोल्हे यांना तात्काळ पदावरून दूर करावे व खोटे शपथपत्र सादर केल्याबाबत पोलीसांत तक्रार दाखल करावी अशी मागणी रामटेक दणका युवा संघटनेने रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटूळे व जिल्हानिबंधक सतीश भोसले यांचेकडे लेखी तक्रार देवून केली होती. मात्र  शासनाकडे तसे अधिकार असल्याचे भोसले यांनी सांगीतले.       याबाबत सत्य पडताळण्यासाठी आपण रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटूळे यांना तात्काळ चौकशी करण्यासाठी तसे आदेश देत आहोत व त्यानंतर शासनाकडे तसा अहवाल सादर करण्याचे आस्वासन यावेळी जिल्हाउपनिबंधक यांनी दणका युवा संघटनेचे संस्थापक व माजी जि.पसदस्य योगेश वाडीभस्मे,तालुकाध्यक्ष अजय किरपान व अन्य सदस्यांना दिले होते.मात्र वीस दिवसांचा अवधी झाला तरीही याबाबत चौकशी झालेली नाही. दरम्यान कोल्हे यांनी शपथपत्रांत त्यांचा धंदा शेतकरी असल्याची खोटी माहीती दिली. शीक्षक असूनही आपण कोणत्याही शासकीय नोकरीत नसल्याचे नमूद केले याबाबत त्यांचेवर भादंवीच्या संबधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात यावा अशी तक्रारही ‘दणका’ने रामटेक पोलीस ठाण्यात दिनांक 17 जानेवारी 2018 रोजी दाखल केली आहे.खरेतर डीडीआर यांनी चौकशी करून त्यांना पदावरून हटविणे व पोलीसांत तक्रार दाखल करणे गरजेचे होते मात्र राजकीय दबावाखाली हे होवू शकले नाही. 
.‘‘महारास्त्र कृषी  उत्पन्न पणण (विकास व विनियम) नियम 1967 चे नियम 41(1) जी च्या  तरतुदीनुसार शासकीय सेवक किंवा स्थानीक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी असेल तर तो बाजार समीतीचा सदस्य होवू शकत नाही असा स्पष्ट नियम असतांना अपात्र मानसाला नियुक्त करण्यात आले ही चुक सुधारण्याऐवजी त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न स्थानीक आमदार जिल्हयाचे पालकमंत्री यांच्या आशीर्वादाने  करीत असल्याचे याप्रकरणी जोरदार चर्चा केली जात आहे. 
    याप्रकरणी संबधित अधिकारी यांचेवर राजकीय दबाव असल्याने या प्रकरणी चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिण्यात आले आहे काय? असा प्रश्न निर्माण झााला आहेनेमके कोणाचे राजकीय दडपण या अधिकारींवर आहे. दबाव आहे म्हणून चुकीची नियुक्ती वैध ठरवायची का? हा सत्ताधिषांचा आपल्या अधिकाराचा दुरूपयोग नाही कां? असे अनेक प्रश्न यानिमीत्ताने रामटेक तालुक्यांत विचारले जात आहेत.यापुर्वी रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीने कधीही स्वखर्चाने दिनदर्शिका छापल्या नाहीत मात्र यावेळी पहील्यांदाच नवे प्रशासकीय मंडळ पदारूढ होताच अठठेचाळीस हजार रूपयांचा खर्च करून केवळ स्वतःच्या नावाचा उदोउदो करण्यासाठी या दिनदर्शिका छापण्यात आल्याची चर्चा केली जात आहे. सोबतच दोन खुर्च्या 14000 रूपये व आभाराची जाहीरात तीही फक्त एकाच वृत्तपत्रांत रूपये 11500 एकूण 73500 एवढा नियमबाहय खर्च करण्यांत आल्याचे समजते. किरपान यांचेवर वेगवेगळयारीतीने   दबाव टाकण्याचा प्रयत्न अनिल कोल्हे करीत असल्याचा आरोप किरपान यांनी केला आहे. 
  1 व 2 फेब्रुवारीला नगरधनला भरणार भव्य दंगल स्पर्धा

1 व 2 फेब्रुवारीला नगरधनला भरणार भव्य दंगल स्पर्धा

रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेक तालुक्यातील हमलापुरी येथील  उमरावजी क्रिडा व बहुद्देशिय संस्था व उमरावजी महीला व  पुरुष  तालीम संघ नगरधनच्या वतीने कुस्तीच्या प्रचार व  प्रसारानिमीत्य नगरधनला दिनांक 1 व 2 फेब्रुवारीला  पुरुष  महीलांच्या भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यांत आल्या आहेत.  साईबाबा मंदीराच्या पटांगणावर या स्पर्धा संपन्न होणार असून  आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते उद्घाटन संपन्न  होणार आहे.खासदार कृपालजी तुमाने हे अध्यक्षस्थानी राहणारआहेत.
माजी मंत्री राजेंद्र मुळक,आमदार सुनिल केदार,अविनाश   पुंड,अमोल देशमुख,माजी खा प्रकाश   धव,माजी आमदार  आशिष जयस्वाल,आनंदराव देशमुख,पर्यटक मीत्र चंद्रपाल  चौकसे,रंजित सफेलकर,वर्षा  धोपटे,देवेंद्र गोडबोले,नरेश धोपटे,थोरात साहेब,नगरधनचे सरपंच  प्रशांत  कामडी,तहसिलदार  धर्मेश फुसाटे,सचिन किरपान,नामदेवराव कडुकर,उदयसिंह  यादव,ज्ञानेश्वर  ढोक व अन्य अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित  राहणार आहेत.यावेळी महीला व पुरुषांच्या  विविध वयोगटातील   कुस्ती स्पर्धा होणार आहेत. महत्वाचे असे की,नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना रोख पारीतोशिके व सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यांत येणार आहे. या  कार्यक्रमाला कुस्तीप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे  आवाहन उमराव क्रीडा  व बहुद्देशिय संस्थेचे अध्यक्ष गजानन मेश्राम यांनी केले आहे.
महिला कुस्ती साठी इमेज परिणाम
चंद्रपूरला व्यसनातून मुक्त करण्यासाठी शहरातील खर्रा दुकानांवर होणार कार्यवाही

चंद्रपूरला व्यसनातून मुक्त करण्यासाठी शहरातील खर्रा दुकानांवर होणार कार्यवाही

शाळा व महाविद्यालय परिसरातील पान ठेल्यांवर होणार कारवाई 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
kharra साठी इमेज परिणाममहाराष्ट्रामध्ये विदर्भात त्यातही चंद्रपूरमध्ये तंबाखू सेवनातून होणा-या दुर्धर आजाराची संख्या मोठया प्रमाणात असून चंद्रपूरला या व्यसनातून मुक्त करण्यासाठी धडक कार्यवाही करा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी आज दिले.
            राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. तंबाखूपासून होणा-या कॅन्सरसारख्या आजाराची संख्या झपाटयाने जिल्हयात वाढत आहे. यामध्ये ख-र्यामध्ये टाकण्यात येणारा सुगंधी तंबाखूपासून मोठे नुकसान होत आहे. जिल्हयामध्ये मौखिक आरोग्य तपासणीमध्ये एकूण लोकसंख्येच्या मोठया संख्येतील जनतेला तंबाखू सेवनातून मौखिक आजार असल्याचे पुढे आल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जिल्हयामध्ये खर्रा सेवनामुळे मोठया प्रमाणात कॅन्सर आजारात वाढ होत असल्याचेही पुढे येत असून जवळपास 36 टक्के लोकांना तंबाखूचे व्यसन जडल्याचे पुढे आले अशी माहिती  आजच्या बैठकीत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.नगराळे यांनी दिली.
            बंदी घालण्यात आलेल्या सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने या विभागाने धडक कार्यवाही करावी. शहरातील मोक्यांच्या ठिकाणी मोठया प्रमाणात खर्रा तयार करण्याचे काम व प्रतिबंधीत तंबाखू वापरण्याचा गुन्हा होत असल्याच्या तक्रारी असून या संदर्भात कडक कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस विभागाला देण्यात आले आहे.
            शाळांच्या परिसरातील दुकानांमध्ये तंबाखू जन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी असून कोटपा कायदयाअंतर्गत कार्यवाही करण्याचे अधिकार पोलीस व अन्न व औषध विभागाला आहे. संबंधीत शाळा मुख्याध्यापकांनी याबाबतीत तक्रारी अन्न व औषधी विभागाकडे कराव्यात. यासाठी भरारी पथक तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम साठी इमेज परिणाम चंद्रपूर जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी येत्या काळात व्यापक प्रसिध्दी प्रचार मोहीम राबविण्यात यावी. तसेच अवैधरित्या घातक खर्रा तयार करणा-यांवर कार्यवाहीची तिव्रता वाढवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला तंबाखूमुक्त जनजागरण अभियान राबविणारे शिक्षक हरिचंद्र कृष्णाजी पाल उपस्थित होते. त्यांनी अनियंत्रीत तंबाखू सेवनाबाबत जिल्हयामध्ये संख्या वाढत असल्याचे सांगितले. तरुणांई ख-र्याच्या आहारी जात असून यातून कॅन्सर सारख्या दुर्धंर आजाराची संख्या वाढत असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस, शिक्षण, आरोग्य, महानगरपालिका, कामगार कार्यालय, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेतक-यांचा आठ फेब्रुवारीला रास्तारोको

शेतक-यांचा आठ फेब्रुवारीला रास्तारोको

खापा रोडच्या कामामुळे पिकांचे नुकसान
सावनेर/प्रतिनिधी:
 सावनेर खापा राष्ट्रीय राजमार्गाच्या          चौपदरीकरणाच्या कामामुळे सस्त्याच्या षेजारी असलेल्या शेतात रस्त्याची माती उडून कपाशी , तुर, उस या पिकांबर बसून पिकांचे नुकसान झाल्याने संमंधीत शेतक-यांनी वारंवार प्रशासनाला पत्रलिहूनही शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतक-यांनी 8 फेब्रवारीला रास्तारोकोचा निर्णय घेतला आहे.
मागील अडीच महीन्यापासून खापा सावनेर राष्ट्रीय राजमार्ग 753चे चौपदरीकरणाचे काम झपात्याने सूरू असून तेथील रस्त्याच्या कामामुळे आजुबाजूच्या शेतातील पीकांवर धुळवड उडून पीकांचे नुकसान झाले आहे. कापूस
मातीने माखून खराब झाल्याने तो मजूर लावून वेचणे शेतक-यांना परवडत नाही. सोबतच तुरीच्या व उसाच्या पीकांचेही मोठे नुकसान झाले आहे. यासंबंधी  दि. 7 डीसेंबर रोजी नुकसानग्रस्त शेतक-यांनी तहसिलदारांना, प्रदुषन  नियंत्रण विभाग तसेच राष्ट्रीय राजमार्ग सा.बा.विभागासही पत्र देण्यात आले होते. तसेच संमंधीत  शेतक-यांनी पून्हा नव्याने उपविभागीय अधिकारी वर्शाराणी भोसले यांना स्मरण पत्र देउन सात दिवसाच्या आत मोबदला देण्याची मागणी करण्यात आली व न दिल्यास रास्ता रोको तसेच कामबंद आंदोलन करण्याचा इशारा
देण्यात आला होता. परंतू याही उपरांत शासनाने दखल न घेतल्याने व शेतक-यांना नुकसान भरपाई न दिल्याने अखेर शेतक-यांनी दि. 18 जानेवारी रोज गुरूवारी कामबंद आंदोल पुकारले होते. आंदोलनाची तिव्रता पहाता उपविभागिय अधिकारी यांनी आदि. 17 रोजी सायं. 4 वाजता तडकाफडकी बैठक बोलावून शेतक-यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानाच्या भरपाई संमंधी वेळ मागण्यात आली यावर शेतक-यांनी दि. 22 पर्यंत निर्णय न झाल्यास कांमबंद आंदोलन करण्याचे ठरविले होते. यावर दि.22 रोजी निर्णयाकरीता उपविभागीय ठकिस सा.बां. विभागाकडून कोणीही चर्चेस न येता उपविभागीय अधिका-यांच्या आदेशाची अवहेलना करण्यात आली. यावर दि. 31 रोजी झालेल्या बैठकित सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उपस्थित झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस.व्ही.ढगे यांनी संमंधीत
प्रकरण वरिष्ठ  अधिकारी यांच्याअख्त्यारीत असल्याचे सांगत हात झटकण्यात आले. त्यामुळे शेतक-यांनी 8 फेब्रवारीला रास्तारोकोचा निर्णय घेतला आहे. यावेळी बैठकीत उपविभागीय अधिकारी वर्शाराणी भोंसले, शेतकरी शेशराव डोइ्रफोडे, सेवकराम राउत, विनायक झाडे,बाल्या चोरे,शंकरराव  कराव राउत, तेजराम
हकंदे, गुणवंता ठाकरे, संजय कानगो, अषोक चोरे, मंजुर शेख, आनंदराव डोईफोडे, प्रेमलाल सेवके, सचिन झाडे इत्यादी उपस्थित होते.
आज बघता येणार खग्रास चंद्रग्रहण; नीळा दिसणार सुपरमून

आज बघता येणार खग्रास चंद्रग्रहण; नीळा दिसणार सुपरमून

मुंबई ऑनलाईन काव्यशिल्प:
खग्रास चंद्रग्रहण - सुपरमून - ब्ल्यूमून - आज चंद्राच विलोभनीय दृश्य दिसणार !  नववर्षाच्या सुरूवातीला खगोलप्रेमींना यंदा दोनदा 'चंद्राच' विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळाली आहे.एकाच महिन्यात दोनदा जगभरात 'सुपरमून' चं दर्शन झालं आहे. आज खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी योग आला आहे. 
 चंद्रग्रहण कधी होणार सुरू ? 
आज सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितीजाच्या खाली असल्याने आपणास दिसू शकणार नाही. नंतर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल आणि आपणा सर्वास साध्या डोळ्यांनी सुपर-ब्ल्यू-ब्लडमूनचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने पौर्णिमा असूनही चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगाचे दिसते. म्हणून त्याला ‘ ब्लड मून ‘ म्हणतात.ग्रहण सायंकाळी सात वाजता आहे. त्यावेळी चंद्रबिंब पूर्व आकाशात बरेच वरती आलेले दिसेल. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण सुटेल, चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर येईल. 
कधी पहाल चंद्राचे विलोभनीय रूप ?
आज सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून रात्री सात वाजून अडतीस मिनिटांपर्यंत पूर्व आकाशात साध्या डोळ्यांनी सुपर, ब्ल्यू, ब्लडमूनचे आपणास विलोभनीय दर्शन घेता येईल
नासा करणार फेसबुक लाईव्ह चंद्राचे विलोभनीय पाहताना, त्यातील बदल पाहताना नासाचे तज्ञ याबाबात खास माहिती देणार आहे. त्यामुळे प्रवासात असणार्‍यांसाठी मोबाईलच्या माध्यमातूनही सुपरमून पाहता येणार आहे.
सूपरमून म्हणजे काय ?
ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी त्याला ‘ सुपरमून ‘ म्हणतात. मात्र ‘ सुपरमून ‘ ही संज्ञा खगोलशास्त्रीय नाही. रिचर्ड नोले यांनी १९७९ मध्ये हे नाव दिले. अशावेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते.चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५९ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे.
ब्ल्यूमून दिसणार 
  एका इंग्रजी महिन्यात ज्यावेळी दोन पौर्णिमा येतात त्यावेळी दुसर्‍या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हणतात. जरी त्याला ब्ल्यू मून म्हटले गेले असले तरी त्यावेळी चंद्र काही ‘ ब्ल्यू ‘ रंगाचा दिसत नाही. यावेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हटलेले आहे.

ग्रहणात गरोदर महिलांनी चुकूनही करू नयेत ही कामं....
असं म्हटलं जातं की, गरोदर महिलेने ग्रहण न पाळल्यास त्याचा विपरित परिणाम हा गर्भातील बाळावर होत असतो. आणि हाच परिणाम टाळण्यासाठी अनेक गरोदर महिला कटाक्षाने हा ग्रहण पाळतात. या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी करू नये याची यादी अनेकदा ज्येष्ठ मंडळींकडून सांगितली जाते. आणि ती गोष्ट गरोदर महिला आवर्जून पाळतात. त्यामुळे खालील दिल्याप्रमाणे ग्रहणाच्या दिवशी या गोष्टी करू नयेत. ग्रहणाचा काळ गरोदर महिलांनी अधिक जपावा असं कायम सगळ्यांकडून सांगितलं जातं. त्या प्रमाणे घरच्या मंडळींकडून काळजी घेतली देखील जाते. खालील गोष्टी गरोदर महिलांनी टाळाव्यात
१) ग्रहणाच्या वेळी म्हणजे ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत काहीही खाऊ नये.
२) यावेळेत साधं पाणी प्राशन न करता फक्त नारळ पाण्याचे सेवन करावे.
३) आणि रात्री दूध-भात खाल्यास उत्तम समजला जातो.
४) त्याचप्रमाणे यावेळी गर्भवती महिलेने गाठ मारू नये.
५) त्यामुळे रक्षाबंधन असले तरीही यावेळी भावाला राखी बांधू नये.
६) तसेच गरोदर महिलेने कोणतीही वस्तू किंवा भाजी यावेळी कापू नये, चिरू नये.
७) तसेच यावेळी गरोदर महिलेने कोणतीही गोष्ट फाडू नये.
८) असे सांगितले जाते की, यावेळी आळस देऊ नये, कुस बदलू नये तसेच लोळायचं देखील नाही.
९) त्यामुळे गरोदर स्त्रीने शांत बसून नामस्मरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतो.
१०) त्याचप्रमाणे ग्रहणाच्यावेळी कोणतेही कापड पिळू नये.
११) आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही गोष्ट शिळी खाऊ नये. यामध्ये जेवण, दूध आणि पाण्याचा समावेश आहे.
ग्रहणात गरोदर महिलांनी 'या' गोष्टी करणं कटाक्षाने टाळा... अन्यथा
चारचाकी वाहनांवर दगडफेक:१५ दिवसातील ही दुसरी घटना

चारचाकी वाहनांवर दगडफेक:१५ दिवसातील ही दुसरी घटना


 
१५ दिवसातील दुसरी घटना
Striking incidents on the Dathla road caused panic | दाताळा मार्गावर दगडफेकीच्या घटनांमुळे दहशत
चंद्रपूर प्रतिनिधी:  
येथील दाताळा मार्गावर रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत दुचाकी व चारचाकी वाहनांवर दगडफेक होत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. सोमवारी रात्री १०.५० वाजता जीवनज्योती कॉलनी जगन्नाथबाबानगर, दाताळा रोड येथे घरासमोर उभ्या असलेल्या एका कारवर अज्ञात इसमाने दगडफेक करून काचा फोडल्या. गेल्या १५ दिवसातील ही दुसरी घटना आहे.

सोमवारच्या रात्री १०.५० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक उमेश सिताराम आडे हे एमएच २९ एआर १९८५ या क्रमांकाची सुझूकी सेंट्रो कार दाताळा मार्गावरील जीवनज्योती कॉलनी जगन्नाथ बाबानगर येथील घरासमोर उभी करून ठेवली होती. दरम्यान, काही अज्ञात इसमांनी कारवर दगडफेक करून रॉड व लाकडाने कारच्या काचा फोडल्या. याबाबत उमेश आडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

या मार्गावर यापूर्वी १६ जानेवारीला सुद्धा अशाच प्रकारे होंडा कारचा पाठलाग करून अज्ञात इसमांनी दगडफेक केली होती. या घटनेतही कारचे मोठे नुकसान झाले होते. १५ दिवसानंतर पुन्हा अशीच घटना घडल्याने या मार्गावर जाणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.काही महिन्यांपूर्वी देखील शहरातील जेलरोड परिसरात अश्याच प्रकारे अध्यात इसमांकडून कारवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अश्याच प्रकारे आणखी घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे   पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेवून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या मार्गावर नेहमीच वर्दळ राहत असल्याने लुटण्यासाठी अशा घटना घडत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. 

Tuesday, January 30, 2018

 पत्रकारिता पुरस्कारसाठी प्रवेशिका पाठवा

पत्रकारिता पुरस्कारसाठी प्रवेशिका पाठवा

चंद्रपूर, दि. 30 जानेवारी - राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2017 ते 31 डिसेंबर, 2017 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2018 असा आहे.

स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय,मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुनेdgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in या संगणक संकेत- स्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी नजिकच्या जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसपंर्क महासंचालनालयाकडून करण्यात आले आहे.
कर्जमाफीच्या लाभासाठी करा संपर्क

कर्जमाफीच्या लाभासाठी करा संपर्क

चंद्रपूर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ ज्या अर्जदार शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही, त्या शेतक-यांनी कर्ज खात्याच्या अचूक तपशीलासह त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.
राज्य शासनाने पात्र ठरलेल्या शेवटच्या शेतक-याला न्याय मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवण्याचे ठरविले असून त्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा. आपल्या बँकेत जावून खात्याबाबत चौकशी करावी, आवश्यक कागदपत्रे सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती गठित केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत उपलब्ध करुन दिलेल्या आहेत व बँकांनी त्यांच्या शाखेत त्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.
कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची अचूक माहिती आपल्या बँकेच्या शाखेत त्वरीत सादर करावी. शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करुन त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणी अंती ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.
बेकायदा खर्रा सेंटरवर धडक कार्यवाही करा :

बेकायदा खर्रा सेंटरवर धडक कार्यवाही करा :

  • अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे
  • अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाने सक्रीय होण्याचे आवाहन


चंद्रपूर, दि.30 जानेवारी- महाराष्ट्रामध्ये विदर्भात त्यातही चंद्रपूरमध्ये तंबाखू सेवनातून होणा-या दुर्धर आजाराची संख्या मोठया प्रमाणात असून चंद्रपूरला या व्यसनातून मुक्त करण्यासाठी धडक कार्यवाही करा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी आज दिले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. तंबाखूपासून होणा-या कॅन्सरसारख्या आजाराची संख्या झपाटयाने जिल्हयात वाढत आहे. यामध्ये ख-र्यामध्ये टाकण्यात येणारा सुगंधी तंबाखूपासून मोठे नुकसान होत आहे. जिल्हयामध्ये मौखिक आरोग्य तपासणीमध्ये एकूण लोकसंख्येच्या मोठया संख्येतील जनतेला तंबाखू सेवनातून मौखिक आजार असल्याचे पुढे आल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जिल्हयामध्ये खर्रा सेवनामुळे मोठया प्रमाणात कॅन्सर आजारात वाढ होत असल्याचेही पुढे येत असून जवळपास 36 टक्के लोकांना तंबाखूचे व्यसन जडल्याचे पुढे आले अशी माहिती आजच्या बैठकीत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.नगराळे यांनी दिली.
'पंचतत्वात ' निनादल्या अनवट सुरावटी

'पंचतत्वात ' निनादल्या अनवट सुरावटी

नववर्षानिमित्त सुरसप्तकचा सांगीतिक नजराणा 
 
नागपुरात प्रथमच 'पंचतत्त्व 'ही अनोखी संकल्पना घेऊन संगीतसंस्था सुरसप्तकने नववर्षानिमित्त सांगीतिक नजराणा रसिकांनासाठी नुकताच म्हणजे शनिवार दिनांक २७ जानेवारी २०१८ ला श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात पेश केला.'ये कौन चित्रकार है' या गीतानी विजय देशपांडे यांनी सुरेल प्रारंभ केला.डॉ.अमोल कुलकर्णी यांनी गायलेल्या 'दिये जलते है 'व 'गारवा' या गीतांनी एक समा बांधला. 'सांज ढले ,गगन तले' या गीतात आशिष घाटे यांनी तरल भाव ओतले. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या गीतातून सुचित्रा कातरकरांनी वृक्षराजीने महत्व सांगितले.ऋचा येनूरकरच्या 'जब चली थंडी हवा' या गीताने प्रियजनांच्या आठवणीला उजाळा मिळाला.'ये चांद स रोशन चेहरा' व खोया खोया चांद' ही निसर्गराज यांनी नेहमीप्रमाणे सहजतेने सुरेख गायली. 'पंछी बनु उडती फिरू ' व 'वारा गाई गाणे ' ही गीते अर्चना चौधरीने गात रसिकांना निसर्गभ्रमण करविले.अश्विनी लुले,संगीता भगत यांनी 'सागर किनारे ,'जिथे सागरा धरणी मिळते ' या गीतांद्वारे सागर लहरींवर रसिकांना डोलवले. 'तुम्हे देखती हूँ ' 'ही वाट दूर जाते' 'गगन गंध आला ' 'खुदा भी आसमासे जब' 'ये राते ये मौसम ' 'झील मिल सितारोंका' 'ये पर्बतोके दायरे',' तुन गगन के चंद्रमा ' ही गीते पद्मजा सिन्हा,प्रतीक्षा पट्टलवार,अरुण ओझरकर ,अपूर्व मासोदकर यांनी तयारीने गावुन मैफिलीची रंगत वाढवली .सुप्रसिद्ध कवयित्री ,गायिका, सुचित्रा कातरकर यांची कार्यक्रमाची संकल्पना होती ..स्वरसाधनाचे अध्यक्ष श्री श्यामराव देशपांडे व बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक श्री सुनील अग्निहोत्री हे कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपथित होते . प्रा .उज्ज्वला अंधारे यांनी निवेदन व प्रा. पद्मजा सिन्हा यांनी सूत्रसंचालन केले. . श्रीकांत पिसे ,विशाल दशसहस्त्र ,आशिष घाटे ,रवी सातफळे ,विजय देशपांडे ,तुषार विघ्ने आर्या देशपांडे या वादकांची त्यांना साथसंगत केली. रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून गीतांचा आस्वाद लुटला.
लहानग्यांना पकडुन-पकडुन दिले दो बुंद जिंदगी के...

लहानग्यांना पकडुन-पकडुन दिले दो बुंद जिंदगी के...

  गजेंद्र डोंगरे
बाजारगाव-(दि.२८/जानेवारी) शासनाच्या वतीने देशभरात एकाच वेळी आयोजित केलेली पल्स-पोलिओ विशेष लसीकरण मोहीम गोंडखैरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतिने धड्याक्यात पार पडली.
      येथून जाणाऱ्या नागपुर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतिने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या लहानग्यांना शोधून काढून प्रत्येकाला पोलिओचा डोज पाजण्यात आला.या केंद्रावर येणारे चार मार्ग व जाणारे चार मार्ग असे आठ पोलिओ बुथ दोन पाळीत लावण्यात आले.या सोळा पोलिओ केंद्रावर एकुन ३२ स्वयंसेवक कामावर होते.त्यांनी या ठिकाणी दिवसभरात ६३६ - ०ते५ वयोगटातील मुलांना पोलिओ लस पाजुन रोगापासून आश्वस्त करण्यात आले.एकाच ठिकाणी एवढे मोठे काम झाल्याने स्वयंसेवकांमध्ये उत्साह दुणावला.या केंद्रावर सहायक संचालक आरोग्य सेवा डाँ.फारुकी,जिल्हा हत्तीरोग अधिकारी डाँ.पाठक,डाँ.वाळके यांनी भेट देऊन प्रोत्साहन दिले.
      प्राथमिक आरोग्य केंद्र गोंडखैरीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ३९ गावांमध्ये ही मोहीम एकाचवेळी राबविण्यात आली.यात एकुन १६५ कर्मचारी,आशा,अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला.एकुन ४५ बुथ,१९ ट्रांझिट-टिम व दोन मोबाईल-टिम असा ताफा या लसीकरणासाठी लावाण्यात आला होता.कार्यक्षेत्रातील सुमारे ३२४७ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी एकुन ३२३३ लहान-सहान मुलांना पोलिओचा डोज पाजण्यात आला.कार्यक्षेत्रात एकुन काम ९९%टक्के झाले.
       मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.योगेंद्र सवई यांच्या नेतृत्वात प्रभारी वैद्यकिय अधिकारी डाँ.सोनाली बाके,डाँ.यमुना मांडवधरे,डाँ.पवन वर्मा,आरोग्यसहायक दिनू गतफने,संजय आमटे,सरस्वती सुरजूसे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ हरीश गावंडे,प्रकाश इंगोले,प्रमोद तरवटकर,योगेंद्र चंदनखेडे,देवानंद भगत,सुनिल आत्राम,औनिअ अधिकारी अजय काठोळे,दिलीप ठाकरे यांचेसह सर्व आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका व आशा स्वयंमसेविकांनी अथक परिश्रम केले.
फोटो....!

महोत्सवास रसिकांनी दमदार हजेरी

महोत्सवास रसिकांनी दमदार हजेरी

वार्ताहर / रामटेक
रामटेक येथील नेहरू ग्राऊंड येथे कालिदास राष्ट्रीय लोकमहोत्सव आणि आदिवासी संस्कृती पर्व थाटात झाला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवास रसिकांनी दमदार हजेरी लावली. तरुणांची अफाट गर्दी या लोकोत्सवाने अनुभवली. गणेशवंदनेपासून सुरू झालेला कार्यक्रम आणि राजस्थानी लोकनृत्याने झालेला समारोप रसिकांना अपूर्व आनंद देणारा ठरला.
या महोत्सवात राजस्थान येथील मांगणी, कालबेलिया, छत्तीसगढ येथील पंथी लोकनृत्य, मध्यप्रदेशातील सैला करमा, गुदुमबाजा वाघ तसेच महाराष्ट्रातील पोवाडे, नृत्य, लावणी, सोंगीमुखवटे, परधान ढेमसा, नृत्य व खडीगंमत यांनी रामटेककर रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले. प्रशासनाने अतिशय चोख तयारी व बंदोबस्त ठेवला होता. रसिकांसाठीही सुविधा होती. या महोत्सवाचा रामटेककर रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार, आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी, उपविभागीय अधिकारी राम जोशी, तहसीलदार धर्मेश पुसाटे, लोहीत मनानी, उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश पारधी, पोलिस निरिक्षक, खंडविकास अधिकारी बी. डब्ल्यू यावले तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचा रामटेककर रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. इतिहास रसिकप्रेमी मागणीमुळे तसेच आमदार डी. मल्लीकार्जून रेड्डी यांनी सतत पाठपुरावा व कृतीशील प्रयत्न केल्यामुळे आणि आयुक्त अनुपकुमार यांनी व संपूर्ण प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध आखणीतून रामटेककरांना कालिदास महोत्सवाचा अपूर्व आनंदाचा लाभ मिळाला. अखेर आयुक्त अनुपकुमार यांनी रामटेकचे वैभव कालिदास महोत्सवाचे आयोजन यशस्वीपणे रामटेकला करून एकप्रकारे रामटेककर रसिकांचा भावनाचा आदर व सम्मान केल्याचे चित्र दिसून आले. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन साजरा होणारा कालिदास महोत्सव यावर्षी आदिवासी लोकसंस्कृतीच्या दर्शनाने नटलेला होता. विभिन्न नृत्यकलांचा आस्वाद घेताना रसिक प्रेक्षकांनी कौतुक केले तसेच आभार मानले. आमदार डी. मल्लीकार्जून रेड्डी, विभागीय आयुक्त अनुपकुमार व उत्तम नियोजन करून रंगारंग कार्यक्रम सादर करण्याकरिता संपूर्ण कार्यरत असणार्‍या प्रशासकीय विभागाचे उपविभागीय अधिकारी राम जोशी, माजी आमदार आनंदराव देशमुख, माजी आमदार आशीष जयस्वाल, न. प. उपाध्यक्ष कविता मुलमुले, तहसीलदार धर्मेश पुसाटे, खंडविकास अधिकारी बी. डब्ल्यू यावले, चंद्रपाल चौकसे, सदानंद निमकर, अशोक बर्वे, न. प. रामटेकचे सदस्य, रामटेक नगरीतील गणमान्य नागरिक, इतिहासप्रेमी व रसिकांची यावेळी अफाट गर्दी होती. कालिदासांची प्रतीकृती असलेली रांगोळी प्रवीणा र्मजीवे यांनी उत्कृष्टपणे काढली. त्यामुळे कालिदास महोत्सवात मान्यवरांतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.

     

महोत्सवास रसिकांनी दमदार हजेरी

महोत्सवास रसिकांनी दमदार हजेरी

वार्ताहर / रामटेक
रामटेक येथील नेहरू ग्राऊंड येथे कालिदास राष्ट्रीय लोकमहोत्सव आणि आदिवासी संस्कृती पर्व थाटात झाला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवास रसिकांनी दमदार हजेरी लावली. तरुणांची अफाट गर्दी या लोकोत्सवाने अनुभवली. गणेशवंदनेपासून सुरू झालेला कार्यक्रम आणि राजस्थानी लोकनृत्याने झालेला समारोप रसिकांना अपूर्व आनंद देणारा ठरला.
या महोत्सवात राजस्थान येथील मांगणी, कालबेलिया, छत्तीसगढ येथील पंथी लोकनृत्य, मध्यप्रदेशातील सैला करमा, गुदुमबाजा वाघ तसेच महाराष्ट्रातील पोवाडे, नृत्य, लावणी, सोंगीमुखवटे, परधान ढेमसा, नृत्य व खडीगंमत यांनी रामटेककर रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले. प्रशासनाने अतिशय चोख तयारी व बंदोबस्त ठेवला होता. रसिकांसाठीही सुविधा होती. या महोत्सवाचा रामटेककर रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार, आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी, उपविभागीय अधिकारी राम जोशी, तहसीलदार धर्मेश पुसाटे, लोहीत मनानी, उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश पारधी, पोलिस निरिक्षक, खंडविकास अधिकारी बी. डब्ल्यू यावले तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचा रामटेककर रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. इतिहास रसिकप्रेमी मागणीमुळे तसेच आमदार डी. मल्लीकार्जून रेड्डी यांनी सतत पाठपुरावा व कृतीशील प्रयत्न केल्यामुळे आणि आयुक्त अनुपकुमार यांनी व संपूर्ण प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध आखणीतून रामटेककरांना कालिदास महोत्सवाचा अपूर्व आनंदाचा लाभ मिळाला. अखेर आयुक्त अनुपकुमार यांनी रामटेकचे वैभव कालिदास महोत्सवाचे आयोजन यशस्वीपणे रामटेकला करून एकप्रकारे रामटेककर रसिकांचा भावनाचा आदर व सम्मान केल्याचे चित्र दिसून आले. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन साजरा होणारा कालिदास महोत्सव यावर्षी आदिवासी लोकसंस्कृतीच्या दर्शनाने नटलेला होता. विभिन्न नृत्यकलांचा आस्वाद घेताना रसिक प्रेक्षकांनी कौतुक केले तसेच आभार मानले. आमदार डी. मल्लीकार्जून रेड्डी, विभागीय आयुक्त अनुपकुमार व उत्तम नियोजन करून रंगारंग कार्यक्रम सादर करण्याकरिता संपूर्ण कार्यरत असणार्‍या प्रशासकीय विभागाचे उपविभागीय अधिकारी राम जोशी, माजी आमदार आनंदराव देशमुख, माजी आमदार आशीष जयस्वाल, न. प. उपाध्यक्ष कविता मुलमुले, तहसीलदार धर्मेश पुसाटे, खंडविकास अधिकारी बी. डब्ल्यू यावले, चंद्रपाल चौकसे, सदानंद निमकर, अशोक बर्वे, न. प. रामटेकचे सदस्य, रामटेक नगरीतील गणमान्य नागरिक, इतिहासप्रेमी व रसिकांची यावेळी अफाट गर्दी होती. कालिदासांची प्रतीकृती असलेली रांगोळी प्रवीणा र्मजीवे यांनी उत्कृष्टपणे काढली. त्यामुळे कालिदास महोत्सवात मान्यवरांतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.

     

स्वच्छ चंद्रपूरला भूमिगत गटारींची गरज

स्वच्छ चंद्रपूरला भूमिगत गटारींची गरज

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Clean Chandrapur needs underground sewerage | स्वच्छ चंद्रपूरला भूमिगत गटारींची गरज
 सध्या चंद्रपूर स्वच्छता अभियानात देशातील नामांकित शहरांशी स्पर्धा करीत आहे. शहर स्वच्छ दिसू लागले आहे. आता ते सुंदर दिसण्यासाठी भूमिगत गटारी कार्यान्वित होणे गरजेचे आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून शहरातील या महत्त्वाकांक्षी सिव्हरेज योजनेचे काम रखडलेलेच आहे. किंबहुना योजनेच्या फलश्रुतीवरच अनेकांना शंका आहे. ही योजना कार्यान्वित झाली तर स्वच्छता अभियानात स्वच्छ चंद्रपूरला निश्चितच सुंदरतेचे झळाळी मिळणार आहे.
चंद्रपूर शहराचे रुप पालटतेय यात दुमत नाही. पूर्वीपेक्षा आता चंद्रपूर नक्कीच स्वच्छ झालेय, हेही खरे आहे. मात्र नाली स्वच्छतेची बोंब अद्यापही अनेक वॉर्डात कायम आहे. नाल्यांमध्ये प्लॉस्टिक कोंबून असल्याचे चित्र आजही शहरात दिसून येते. २००७ मध्ये सिव्हरेज योजनेबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तेव्हा या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरीही देण्यात आली होती. त्यानंतर योजनेचे काम सुरू झाले. रहमतनगर परिसरात या योजनेसाठी उभारण्यात आलेला ट्रीटमेंट प्लांट वादात सापडला होता. आता त्यातील त्रुट्या दूर केल्याची माहिती आहे. या योजनेचे दुसरे ट्रीटमेंट प्लांट पठाणपुरा परिसरात आहे. विशेष म्हणजे, अनेक वॉर्डात पाईपलाईन टाकण्याचे काम शिल्लक असल्याची माहिती आहे. याशिवाय या सिव्हरेज योजनेच्या पाईपलाईनची तपासणीदेखील अद्याप झालेली नाही. त्यामुळे या योजनेच्या फलश्रुतीवर अनेकजण शंका व्यक्त करताना दिसत आहे. महानगरपालिका सध्या शहर स्वच्छतेवर विशेष भर देत आहे. यासाठी मोठा निधी खर्च केला जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम शहरात दिसूनही येत आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत चंद्रपूर देशातील काही नामांकित शहरांशी स्पर्धा करीत आहे. आता अशावेळी सिव्हरेज योजनेचे काम पूर्ण करून ही योजना कार्यान्वित करण्यात आली तरच चंद्रपूर शहराचा चेहरामोहरा बदलू शकणार आहे.

२००९ पासूनच कामाला सुरुवात
२००९-१० या आर्थिक वर्षात भूमिगत मलनिस्सारण योजना हाती घेण्यात आली. या योजनेचे कंत्राट शिवास्वाती कन्स्ट्रक्शन कंपनी, हैदराबाद यांना देण्यात आले. २००९ मध्येच वर्क आॅर्डरही निघाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. दोन वर्षात म्हणजे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र प्रारंभापासून या योजनेला समस्यांचे ग्रहण लागत आले. रस्ते, वीज केबल आदी अनेक बाबींमुळे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आली नाही. त्यानंतर योजनेच्या कामाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. मात्र २०१२ पर्यंतही संबंधित कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर २०१३ पर्यंत पुन्हा मुदत वाढ दिली. आता २०१८ उजळले आहे. मात्र भूमिगत मलनिस्सारण योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

अशी वाढली योजनेची किंमत
भूमिगत मलनिस्सारण योजनेला प्रारंभ झाला तेव्हा योजनेसाठी ७० कोटींचा खर्च अपेक्षित होता. कामे वेळेत न झाल्याने योजना ९० कोटींवर गेली. नंतर पुन्हा योजनेची किंमत वाढून ती १०० कोटींच्याही पार गेली. आता २०१८ उजळले आहे. योजना कार्यान्वित व्हायला आणखी विलंब झाला तर अंदाजपत्रकीय किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या मेडिकलमधील एसीबीच्या सापळ्यात महिला डॉक्टरसह दोघे अडकले

नागपूरच्या मेडिकलमधील एसीबीच्या सापळ्यात महिला डॉक्टरसह दोघे अडकले

नागपूर/प्रतिनिधी :
Both of them stuck with a woman doctor in Nagpur's ACB tractor | नागपूरच्या मेडिकलमधील एसीबीच्या सापळ्यात महिला डॉक्टरसह दोघे अडकले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील एका रुग्णाकडून तीन हजार रुपयाची लाच घेताना सोमवारी एका कनिष्ठ डॉक्टरसह महिला डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. रात्री ही कारवाई झाल्याने महिला डॉक्टरला मंगळवारी ताब्यात घेतले जाणार आहे. या कारवाईने मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे.त्यांचे नाव नेत्ररोग विभागातील कनिष्ठ डॉक्टर स्वानंद प्रधान (२६) व सहायक प्राध्यापक डॉ. वंदना अय्यर (३५) असे सांगण्यात येते 
कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतून हजारो कोटी रुपयाचा कोळश्याची चोरी

कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतून हजारो कोटी रुपयाचा कोळश्याची चोरी

भद्रावती/वरोरा ( शिरीष उगे ):
wcl nagpur साठी इमेज परिणामद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा या भागातील कर्नाटका एम्टा ही खुली कोळसा खान ही गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. ही कोळसा खान सुरु असतांना साठवुन ठेवलेला जवळपास दिड लाख टन कोळसा एम्टाच्या सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्याच्या संगमताने चोरी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आजपावेतो या खाणीतून हजारो कोटी रुपयाचा कोळसा चोरीस गेला आहे.  
     कोळसा खान वितरित करतांना तत्कालीन युपीए सरकारने चुका केल्या असे सद्याच्या एनडीए सरकारच्या निर्देशनास आल्यानंतर त्यांनी देशातील अनेक कोळसा खाणी बंद केल्या त्यात तालुक्यातील बरांज मोकासा येथील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीचा सुद्धा समावेश आहे. हा कोळसा खान मार्च २०१५ ला बंद करण्यात आली. खान सुरु असतांना काढलेला कोळसा इतर वाहतुकीकरिता एका ठिकाणी साठवून ठेवण्यात आला. परंतु बंदीमुळे तो त्याठिकाणी तसाच राहिला. या कोळश्यासोबत खाणीतील इतर कार्यरत वाहनांची तसेच कार्यालयाची देखभाल करण्याकरिता कर्नाटका एम्टा कंपनीचे सुरक्षा अधिकाऱ्यांसह ५० च्या वर सुरक्षा कर्मचारी नियुक्त करून ठेवले आहे. हे कर्मचारी आजही याठिकाणी  आहेत. बंदच्या काढत या कर्मचाऱ्यांची काही कोळस्या व्यापाऱ्यांशी साठ - गाठ करून त्याठिकाणी कंपनीने काढून ठेवलेला दिड लाख टन कोळसा विकण्याचा त्यांनी सौदा केला. 
     या कोळस्याची किंमत हजारो कोटीच्या दरात जाते. या खाणीतून रात्रोला जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये कोळसा भरून वणी सोबतच इतर ठिकाणी विकला जात आहे. हे काम गेल्या वर्षापारापासून सरार्स सुरु आहे. याव्यतिरिक्त दररोज पहाटेच्या वेळेस २० ते २५ दुचाकी मोटार सायकलस्वार एकाच वेळेस एका गाडीवर ४ पोती कोळसा भरून त्याची वाहतूक करीत आहे. हा कोळसा विटभट्टीधारक तथा लहान कोळसा व्यापाऱ्यांना विकल्या जात आहे. आज याठिकाणी केवळ २० ते २५ हजार टन कोळसा शिल्लक आहे. ज्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कंपनीने पगारी नेमणूक करून सुरक्षा करण्याचे काम दिले आहे तेच कर्मचारी सुरक्षा ऐवजी हा संपूर्ण कोळसा चोरीच्या घश्यात घालीत आहे. 
     आठवळाभरापूर्वी दुचाकीने कोळसा वाहतूक करतांना एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकी वाहनधारक गंभीर जखमी झाल्याची घटना मानोरा फाट्याजवळ घडली. यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. सदर प्रकरणाने स्थानिक काही पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत. करिता या प्रकरणाचे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी चौकशी करून दोषींवर कारवाही करावी. खान चालू असतांना स्टॉक रजिस्टरमध्ये नमूद केलेला कोळसा त्याठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे हे लक्षात घेता याच सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी या साठविलेल्या कोळशाच्या काही भागाला आग लावून तो जळून खाक झाल्याचे आढळून आलेले आहे.

Monday, January 29, 2018

राजस्थानी गायक व नृत्यांगनांनी गाजविला कालीदास महोत्सव

राजस्थानी गायक व नृत्यांगनांनी गाजविला कालीदास महोत्सव

 कालीदास स्मारकाची मात्र यावेळीही उपेक्षाच,राहीली अंधारातच
रामटेक तालुका प्रतिनिधी-
रामटेकच्या ज्या पावन व निसर्गरम्य भुमीत महाकवी कालीदासांनी मेघदूत या  अजरामर महाकाव्याची रचना केली त्याच भुमीत गेली विस वर्शे सातत्याने(मधली काही वर्षे वगळता)संपन्न होणारया  कालीदास समारोहाचे दोन दिवसीय भव्य आयोजन रामटेकच्या नेहरू मैदानावर संपन्न  यावर्षीच्या  कालीदास महोत्सवावर राजस्थानी गायक,कलावंत,वाद्यवृंद व  नृत्यांगनांनी आपली अमिट छाप उमटविली. आयोजन समीतीने केलेल्या भव्य  आयोजनप्रसंगी केलेला नेत्रदिपक मंच व बैठकव्यवस्थेची रसीकांनी प्रशंसा केली.  विभागीय आयुक्त अनुपकुमार या मुळातच कलोपासक अधिकाऱ्याला  दर्जेदार आयोजनाचे श्रेय द्यायला हवेच तद्वतच रामटेकचा कालीदास महोत्सव रामटेकला  करण्यासाठी वृत्तपत्रांनी बातम्या लीहील्यानंतर अत्यंत ताकदीने हा कार्यक्रम  रामटेकला व्हावा यासाठी स्थानीक आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केलेले  प्रयत्न प्रशासनीय आहेत व हा कार्यक्रम रामअेक झाला यासाठीचे श्रेयही अनुपकुमारांनी आमदारांना दिले हे विषेश.

महोत्सवाच्या दुसर्या  दिवशी उद्घाटन अनाथांचे नाथ असलेल्या प्रसिद्ध  समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर  आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी,विभागीय आयुक्त अनुपकुमार,माजी आमदार  आनंदराव देशमुख ,उपनगराध्यक्षा कविता मुलमुले,माजी नगराध्यक्ष अशोक  बर्वे,गजाननरा भेदे,पर्यटक मीत्र चंद्रपाल चौकसे,आदिवासी अप्पर आयुक्त उॉ माधवी  खोडे,उपायुक्त रविंद्र ठाकरे,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष त्रिलोक मेहर,सुधाकर तेलंग,सचिन कलंत्री,उपविभागीय अधिकारी राम जोशी ,तहसिलदार धर्मेश  फुसाटे,व अन्य अधिकारी,लोकप्रतिनिधी हजर होते.

दुसर्या दिवशी सोंगी मुखोटे या नाशीकच्या कलावंतानी सादर केलेल्या  नृत्याने रसकिांच्या मनावर मोहीनी घातली तर राजस्थानी ललनांनी सादर केलेल्या भवाई नृत्याने रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकविला.राजस्थानी गायक कलावंतानी भजन सादर केले.आलोक टंडन यांच्या पंथी नृत्याला मात्र म्हणाव तसा प्रभाव पाडता आला नाही. नामदेव आडे आणि संचाने सादर केलेले ढेमसा नृत्य,फकीरा कोम आणी संचाने सादर केलेल्या रेला नृत्याने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. स्थानीक कलावंतांनाही यावेळी सादरीकरणाची संधी मीळाली मात्र त्यांना आपल्या  कलेचा कुठलाही प्रभाव पाडता आला नाही.उलट कालीदास महोत्सवासारख्या आंतर्रास्त्रीय  दर्जेदार कार्यक्रमाची आगामी काळांत मंडई होवू नये अषी अपेक्षा रसिकांनी यावेळी व्यक्त केली.महोत्सवावर आपल्या कलेचा अमिट ठसा राजस्थानी  कलावंतानीच उमटविला.पहीला दिवस गायक कलावंतानी गाजविला तर दुसरा दिवस जोशपुर्ण भवाई नृत्य,कालबेलिया आणी कजरी नृत्यांचा देखणा अविष्कार  करीत  राजस्थानी ललनांनी ससिकांना भावविभोर केले. कार्यक्रमाच्या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी आयुक्तांनी जाहीरपणे  आपल्या भाषणातून  रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी ,तहसिलदार धर्मेश  फुसाटे व त्यांच्या संपुर्ण चमूचे कौतुक केले.रसिकांच्या हजारोंच्या संख्येत उपस्थितीबद्दल अनुपकुमारांनी धन्यवाद दिले.महाकवी कालीदासांचा मात्र प्रशासनाला विसर पडला होता. रामटेकच्या गडावरील त्यांच्या स्मारकावर कुठल्याही प्रकारची रोषणाई यानिमीत्ताने करण्यात आली नव्हती.




भाजपा महिला आघाडी तर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

भाजपा महिला आघाडी तर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर /प्रतिनिधी:
बाबूपेठ  येथे भाजपा नगरसेविका सौ. कल्पनाताई बगूलकर(भाजपा महिला आघाडी, बाबुपेठ)  यांच्यातर्फे    मकर संक्रांति निमित्य बाबुपेठ परिसरातील महिलांचे एकत्रीकरण करून त्यांच्यासाठी हळदी- कुंकूवाचा भव्य कार्यक्रम बाबुपेठ बालाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.

       सदर   कार्यक्रमाचे  अध्यक्ष  आमदार नानाभाऊ शामकुळे तथा प्रमुख अतिथी  ब्रिजभूषण पाझारे (समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर), सौ.  अनुराधाताई हजारे (महिला व बालकल्याण सभापती मनपा  चंद्रपूर), नगरसेविका सौ. शीलाताई चव्हाण, सौ. मायाताई उईके, सौ. ज्योती गेडाम,  निलम आक्केवार, भाजपा प्रभाग अध्यक्ष रवी नंदुरकर, भाजपा प्रभाग प्रभारी निखील बोटूवार,   भाजपा शाखाध्यक्ष विजय रामगिरवार उपस्थित होते.  तथा वार्डातील हजारो महिला सदर कार्यक्रमाला  उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका सौ. कल्पनाताई बगूलकर यांनी केला. प्रास्तविकामध्ये सौ. कल्पनाताईंनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती दिली तसेच हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्याची भूमिका या विषयावर माहिती दिली. तसेच ब्रिजभूषणभाऊ पाझारे यांनी अशा  कार्यक्रमाद्वारे महिलांना संघटीत करून  भारतीय जनता पार्टी पक्षाचा विचार महिला पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सौ.  कल्पनाताई बगूलकर  गेल्या अनेक वर्षांपासून करीत असल्याबाबत  बोलले व  महिलांचा सर्वात महत्त्वाचा  सण म्हणजे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम  तसेच  सरकारच्या महत्वाचा महिलांसाठी योजना जसे की निराधार योजना श्रावणबाळ योजना उतरू योजना संकल्पना ताई च्या माध्यमातून तुम्ही करून घ्या व काही अडचण आल्यास माझ्याकडून पूर्ण मदत करील  असेही ते म्हणाले होते. अन्य  मान्यवरांनी आपले मार्गदर्शन करून हळदी कुंकवाचा कार्यक्रमाची सुरुवात केली.
 सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन  सौ. वर्षा कोठेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सौ.  मायाताई पळवेकर, सौ. कांताताई कोहपरे, संध्या धकाते, भोयरताई, इत्यादी महिला व  भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते नंदकिशोर बगूलकर, विवेक  शिंदे, दिवाकर पिपरे, मनीष  पिपरे, राहुल पिजदुरकर,  विशाल बनारसे, शादाब शेख  या सर्वांनीकार्य केले.

Sunday, January 28, 2018

नवीन आव्हाने व तंत्रज्ञानानुसार बदल आत्मसात करा

नवीन आव्हाने व तंत्रज्ञानानुसार बदल आत्मसात करा

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक 
श्री. संजीव कुमार यांचे प्रतिपादन

नागपूर: सद्यस्थितीत विज वितरण व्यवसायाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवनवीन आव्हाने यातून निर्माण होत आहेत. ही आव्हाने व नवीन तंत्रज्ञानानुसार बदल आत्मसात केला तरच महावितरण स्वतःच्या बळावर सक्षमपणे उभे राहू शकेल, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ येथे आयोजित सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या ४५ व्या वार्षिक अधिवेशनप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. जलसंधारण मंत्री श्री. राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, महापारेषणचे संचालक गणपत मुंढे, महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. सतीश करपे, श्री. संजय ताकसांडे, मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर, श्री. सुरेश गणेशकर, असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार म्हणाले, नवीन तंत्रज्ञान, ग्राहकांच्या अपेक्षा, नवीन धोरण, वितरण क्षेत्रातील स्पर्धा आणि वीज निर्मिती क्षेत्रातील मोठे बदल यासारख्या विविध कारणांमुळे वीज वितरण व्यवसायात कमालीचे बदल होत आहेत. हे बदल समजून घेऊन आपल्या कार्यप्रणालीत आवश्यक त्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा संघटना प्रबळ असूनही काही सार्वजनिक उपक्रम धोक्यात आल्याची उदाहरणे आहेत. त्यासाठीच एकूणातील ५ टक्के मीटर रिडींगची फेरपाडताळणी, फिडर रिडींग आदींसारख्या उपाययोजना आखल्या असून त्यांना योग्य प्रतिसाद अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले, एम्प्लॉयी पोर्टल आणि डॅशबोर्ड या दोन सुविधा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. एम्प्लॉयी पोर्टलमध्ये वैयक्तिक सेवेशी संबंधित सर्व बाबींसोबतच आवश्यक परिपत्रकेही माहितीसाठी देण्यात आली आहेत. तर कारवाईशी संबंधीत प्रकरणे निश्श्चित कालमर्यादेत निकाली काढण्याची तरतूद यात आहे. यासोबतच येऊ घातलेल्या कर्मचारी पून:र्रचनेत संचालन, दुरुस्ती, बिलिंग, वसुली अशा विविध कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ देण्यात येणार आहे. यातून जबाबदारी निश्चित होऊन कामात सुसूत्रता येईल. प्रत्येकाचा जॉब-चार्ट तयार असेल व कामात सुस्पष्टता येईल. प्रत्येक क्षेत्रात काम केल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळणार नसल्याचे श्री. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले. महावितरण डिजिटल युटिलिटी म्हणून जाहीर करण्यात आले असून लवकरच सर्व महावितरणची सर्व देणी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसच्या माध्यमातून चुकती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


---------\
इलेक्ट्रिक चार्जिंगचे ५०० सबस्टेशन
इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा देणारे ५०० सबस्टेशन राज्यात स्थापन करण्यात येणार आहेत. काळाची पावले ओळखून तसेच राज्यातील वीज ग्राहकांचे योगदान लक्षात घेऊन ही सुविधा देण्यात येणार असल्याचे श्री. संजीव कुमार यांनी सांगितले.