चंद्रपूर: बल्लारपुरातील एका व्यापाराचा येथील अष्टभुजा वॉर्डातील रेल्वे पुलाजवळ संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. रामनगर पोलिसांनी तुर्तास अपघाताची नोंद केली असली तरी मृताच्या शरिरावर जखमा असल्याने व त्याच्या वाहनाची स्थिती बघता, हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला असून ते शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.
जगदीश पंजवानी (३0)असे मृत व्यापार्याचे नाव असून ते बल्लारपुरात बसस्थानक परिसरातील रहिवासी होते. बल्लारपुरातील सातनल चौकात त्यांचे किराणा दुकान आहे. पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरकडे येत असलेल्या राहुल लोहकरे नामक व्यक्तीला अष्टभुजा रेल्वे पुलाजवळ एक व्यक्ती पडून असलेला दिसला. त्यांनी याची सूचना रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताजवळ असलेल्या मोबाईलवरून फोन केल्यानंतर ते जगदीश पंजवानी असल्याची ओळख पटली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून चौकशी सुरू केली आहे. मात्र मृताच्या शरिरावर जखमा असल्याने त्यांची हत्या तर करण्यात आली नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह आणि घटनास्थळाची स्थिती पाहता पोलीसही संभ्रमात आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय काहीच सांगता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.