लॉजवर वेश्या व्यवसाय: ग्राहकांसह दोन महिलांना पकडले
चंद्रपूर : येथील जटपुरा वॉर्डातील सुपर लॉजवर आज सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या आदेशावरून रामनगर पोलिसांनी धाड घातली. या धाडीत वेश्या व्यवसाय करणार्या दोन महिला व दोन पुरुष ग्राहकांना ताब्यात घेतले.
अनिल किसन वैद्य (४0) रा. बाबुपेठ वॉर्ड व सुखदेव धनलाल पारधी (३0) रा. दुर्गापूर अशी आरोपीची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द भादंविच्या कलम ११0, ११७ अन्वये गुुुुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा वॉर्ड येथील सुपर लॉज येथे गेल्या अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबत पोलीस अधीक्षक राजीव जैन यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी याची दखल घेत रामनगर पोलिसांना ताबडतोब कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार रामनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी सुपर लॉजवर धाड टाकली. धाडीत पोलिसांना दोन महिला व दोन पुरुष रूममध्ये आढळून आले. यावेळी पोलिसांनी लॉजमधील नोंदवहीचीसुद्धा तपासणी करण्यात आली. अलीकडे चंद्रपुरात काही लॉज व हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय जोरात सुरू आहे. पोलिसांनी आज केलेल्या या कारवाईमुळे लॉजिंग व हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सुपर लॉज येथे वेश्या आणल्या जात होत्या. फक्त दोन तासाकरिता या लॉजची रूम किरायाने मिळायची. तसेच चंद्रपूर तालुक्यातील लहान मोठय़ा गावामधूनसुध्दा वेश्या या ठिकाणी यायच्या.
यापूर्वी पोलिसांनी रात्रीच्या वेळी धाड टाकली होती. तेव्हा काहीच आढळले नव्हते. तेव्हापासूनच पोलिसांनी लॉजवर नजर ठेवली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी याच वॉर्डातील लॉजमध्ये तीन वेश्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांची कारवाई झाली नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात पुन्हा हा व्यवसाय शहरात फोफावला होता.