चंद्रपूर: लिव इन रिलेशनशिपला सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली असली तरी ही व्यवस्था भारतीय संस्कृतीला अनुरुप नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण विरोध करीत नाही. मात्र दुसर्या बाजूने विचार करता ही व्यवस्था भारतीय संस्कृतीला घातक आहे. यामुळे माणसाचे आयुष्य वा संसार चिरकाल सुखी राहू शकत नाही. ही व्यवस्था विदेशात आहे. आपण अनेकवेळा विदेशाचा दौरा केला. त्यात अशा व्यवस्थेतून तिथेही चिरकाल सूख मिळाल्याचे दिसले नाही. त्यामुळे भारतातही अशी स्थिती निर्माण होऊ शकते, असे मत आर्ट ऑफ लिव्हींगचे गुरु आनंद वैश्यपायन यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्त केले.
यावेळी ते पुढे म्हणाले, पंडित श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींगमागे नागरिकांना सुखी आणि आनंदी बनविणे, हा उद्देश आहे. आध्यात्मद्वारा स्वत:च्या आत्माचा स्वत:लाच परिचय करून देऊन त्याद्वारे दुसर्यांना सहकार्य करायला लावणे, हाही एक उद्देश आहे. आपण चांगले काम नेहमीच पोस्टपोंड करतो. वाईट काम असले की ते प्रकर्षाने करतो. मात्र हे योग्य नाही. चांगले काम कधीही पोस्टपोंड करू नये. तेच प्रकर्षाने करावे, असेही त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हींगचे भाई सलील, महापौर संगिता अमृतकर, गोपाल अमृतकर, दामोदर सारडा व आर्ट ऑफ लिव्हींगचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) श्री श्री रविशंकर १५ ला चंद्रपुरात आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक पंडित श्री श्री रविशंकर यांचे १५ जानेवारी रोजी चंद्रपुरात आगमन होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या ९ जानेवारीला सकाळी ९ वाजता महानगरपालिका व आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेद्वारा गांधी चौकात स्वच्छता अभियान