चिमूर :
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या कोलारा गावातील विठोबा नागोसे (वय ५५ वर्षे) हा दिनांक ९ जानेवारीला सकाळी सरपण जमा करण्याकरीता जंगलात गेला असता दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करुन नरडीचा घोट घेतला.
२०१४ या नववर्षातील मानव-वन्यजीव संघर्षातील बळीची ही दुसरी घटना असून पहिली घटना लोहारा येथील मंगला गुलाब शेंडे ही महिला बुधवारी, दुपारच्या सुमारास लोहारा जवळील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ३९६ मध्ये सरपन गोळा करण्यासाठी गेली होती. सरपन गोळा करीत असताना झुडूपात दबा धरुन बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला होता. यात तिचा जागीच मृत्यू झाला होता.
प्राप्त माहितीनुसार दिनांक ९ जानेवारीला सकाळी मृतक गावातील सहकार्यासोबत सरपणाकरीता जंगलात गेला असता दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केल्याने आरडाओरड झाली. तेव्हा मृतकाचे सहकारी गावाकडे परत आल असता नागरिकांनी मृतकाचा शोध घेण्याकरीता घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा मृतक विठोबा नागोसे यांचा मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळुन आला.घटनेच्या काही वेळानंतर पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार विखे पाटील तसेच वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी करीत आहेत.