সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 14, 2014

ब्रह्मपुरी न. प. निवडणुकीत भाजपाची आघाडी

भाजपा १०, तर स्वतंत्र विकास आघाडीला ९ कॉंग्रेसला अवघ्या एका जागेवर मानावे लागले समाधान तर राष्ट्रवादीला भोपळा
ब्रह्मपुरी, : ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने उत्तम कामगिरी करून १० जागी विजय संपादन केला. अशोक भैयाप्रणीत स्वतंत्र विकास आघाडीला ९ जागा, तर आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पंजा चिन्हावर लढलेल्या कॉंग्रेसला केवळ एक जागा मिळाली. संदीप गड्डमवार, अशोक रामटेके यांच्या नेतृत्वात लढलेल्या राष्ट्रवादी-रिपाइं युतीला तर भोपळाही फोडता आला नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक असलेले रिपाइंचे अशोक रामटेके यांना विद्यमान न. प. उपाध्यक्ष स्वतंत्र विकास आघाडीचे सतीश हुमने यांनी पराभूत केले. तर स्वतंत्र विकास आघाडीच्या विद्यमान नगराध्यक्ष संदीप आमले यांना भाजपाचे प्रशांत ताम्हण यांनी पराजित केले. आ. विजय वडेट्टीवार यांचा पंजा चिन्हावर लढण्याचा आग्रह व अशोक भैया यांचा आघाडी करून लढण्याचा निर्णय कॉंग्रेसला पराजयाकडे घेऊन गेला.
सकाळी ११ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रभाग एक कुर्झा-बोंडेगावमधील चारही गटातील जागी भाजपा विजयी झाल्याने भाजपा गोटात उत्साह निर्माण झाला. भाजपा तालुका अध्यक्ष दीपक उराडे यांच्या पत्नी रिता दीपक उराडे नामाप्र गटातून २०२५ असे विक्रमी मतदान घेऊन विजयी झाल्या. त्यांनी स्वतंत्र विकास आघाडीच्या संगीता दिनकर खेत्रे (१०६५) यांना पराभूत केले. याच प्रभागात अनुसूचित जाती महिला गटातून स्वर्णलता किशोर बडोले, सर्वसाधारण क गटात भाजपाचे संजय मणिराम बावनकुळे यांनी अपक्ष उमेदवार व सध्या गुंठेवारीत अटकेत जेलमध्ये असलेले विलास विखार यांना पराभूत केले. बावनकुळे ११५८ तर विखार यांना ११५३ मते मिळालीत.
प्रभाग दोनमधील सर्वसाधारण ड गटात भाजपाचे विक्रम रामचंद्र कावळे यांचा विजय झाला. त्यांना ११२२ मते मिळाली. येथे द्वितीय स्थानावरील अपक्ष उमेदवार एकनाथ विखार यांना ६१२ मते मिळालीत. १० उमेदवार रिंगणात असलेल्या या गटात कॉंग्रेस उमेदवाराला फक्त २६७ मते मिळाली. प्रभाग क्रमांक २ टिळकनगर-धुमनखेडा (नामाप्र) प्रभागात भाजपाचे सुधीर रघुनाथ राऊत १३७७ मते घेऊन विजयी झाले. स्वतंत्र विकास आघाडीचे सुरेश रामचंद्र करंबे यांना १०१ मते मिळाली. कॉंग्रेसचे राकेश पडोळे ९१७ मते घेऊन तिसर्‍या स्थानावर गेले. राष्ट्रवादीचे वासुदेव सोंदरकर यांना ५१० मते मिळालीत. प्रभाग २ मधील सर्वसाधारण गटात भाजपाचे प्रशांत प्रभाकर ताम्हण यांनी अपक्ष उमेदवार दीनकर ऊर्फ बाला शुक्ला यांना पराभूत केले. ताम्हण यांना ९८९, तर शुक्ला यांना ९०० मते आहेत. विद्यमान नगराध्यक्ष संदीप आमले (स्व.वि.आ.) यांना ८०३, कॉंग्रेसचे दिघोरे यांना ७४२, तर राष्ट्रवादीचे आकरे यांना ५९३ मते आहेत.
सर्वसाधारण महिला गटात भाजपाच्या यास्मीन बहाद्दूर लाखाणी यांनी १४८३ मते घेऊन कॉंग्रेसच्या उमेदवार व माजी न. प. अध्यक्षा वनिता ठाकूर (१०१४) यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला गटात भाजपाच्या अनघा अविनाश दंडवते यांनी १४६४ मते घेऊन स्वतंत्र विकास आघाडीच्या कमल शंकरराव कावळे (११५५) यांचा पराभव केला. कॉंग्रेसच्या मेघना कार यांना ८३२ मते मिळालीत.
प्रभाग ३ रेणुका मातामधील चारही जागा स्वतंत्र विकास आघाडीने जिंकल्या. प्रतिभा फुलझेले (१२२७), योगिता बनपूरकर (१०८१), नरेंद्र कामथे (११२७), अशोक किसनलाल भैया (१३२८) अशी मते त्यांना मिळाली. प्रभाग ४ देलनवाडी येथे सतीश हुमने (१४९८, स्व.वि.आ.), रश्मी कैलास पेशने कॉंग्रेस ११९४, गिरीधर बोरकर स्व.वि.आ. ८९८, भाजपाच्या हेमलता अरविंद नंदूरकर १०७६ मते घेऊन विजयी झाले. प्रभाग ५ पेठवॉर्ड येथील विजयी उमेदवार नामाप्र भाजपाचे मनोज भुपाल, स्वतंत्र विकास आघाडी अंजली उरकुडे, विजय ढोक, अर्चना खंडाते असे आहेत. दरम्यान, प्रभाग ४ अनुजाती गटातील भाजपाचे अनिल गराडे १० मतांनी पराभूत झाल्याने त्यांनी फेर मतमोजणी मागितली. तसेच गुंठेवारीत अडकलेले विलास विखार (प्रभाग १) यांनी पाच मतांनी पराभूत झाल्याने फेर मतमोजणी मागितली. मात्र त्यातही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.