सेवाग्राम रुग्णालयाच्या मैदानावर शुक्रवारी (२४ जानेवारी) राज्यातील काँग्रेस पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत तळागळातलया कार्यकर्त्यांची मते जाणून जाहीरनामा तयार करण्याच्या दृष्टीने आयोजित बैठकीत काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी येणार असल्याचे संकेत आहेत.
बैठकीला राज्यभरातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जि. प., पं. स. व नगरपरिषद सदस्य आणि प्रदेशचे पदाधिकारी अशा निवडक लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. तत्पूर्वी सेवाग्राम पंचायत राज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात देशभरातील २५0 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पंचायत राज शिबिराला सकाळी ११ वाजता खा. राहुल गांधी उपस्थित राहतील. या ठिकाणी सुमारे एक तास शिबिरार्थींशी चर्चा करतील. यानंतर ते पदाधिकार्यांच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधतील.