चंद्रपूर,: नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनी व्यवस्थापनाच्या अन्यायकारक भुमिकेविरोधात प्रहार संघटनेतर्फे बुधवार, २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता नकोडा ते नायब तहसीलदार कार्यालय घुग्घूसपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक बेरोजगार युवकांना या उद्योगामध्ये रोजगार देण्याचे निर्देश देण्यात यावे, यापूर्वीच्या नोकरभरतीमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना रोजगार देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात यावी, या उद्योगामुळे वर्धा नदीचे पाणी तसेच वायू प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे या व्यवस्थापनावर प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण विभागाला देण्यात यावे, या उद्योगामुळे नकोडा ग्रामवासीयांना वर्षानुवर्षे आरोग्य व अन्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, व्यवस्थापनाने नकोडा गाव वगळून दूरच्या इतर गावांना दत्तक घेवून कल्याणकारी योजना राबविल्या आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, या उद्योगाच्या वेल्फेअर, सीएसआर निधीतून नकोडा गावाला रुग्णवाहिका, ऑटो व बसस्टँड आदी सुविधा देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक घुग्घूस, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, विभागीय प्रदूषण नियंत्रण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी यांना देण्यात येणार आहे.
या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, जिल्हा संघटक फिरोज खान पठाण, नकोडा येथील प्रहारचे कार्यकर्ते विनोद कांबळे, सतीश चोपणे, किशोर बांदूरकर आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.