সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 12, 2014

बनावट जाहिरातींना बळी पडू नका

महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांचे आवाहन

राज्य सरकारच्या विविध पदांसाठी येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीची त्या-त्या विभागातील तालुका- जिल्हा पातळीवरील कार्यालयात जाऊन उमेदवारांनी शहानिशा करावी. कोणत्याही सरकारी नोकरीसाठी प्रशिक्षण वा कोणत्याही कारणास्तव पैसे घेतले जात नाहीत, त्यामुळे अशा बनावट जाहिरातींना बळी पडून तरुणांनी पैसे भरू नयेत, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र सरकारची नोकरी देतो, असे सांगून देशभरातील तरुणांना गंडा घालणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके दोन राज्यांत पाठविण्यात येणार आहेत. ही टोळी ज्या राज्यातून आपले नेटवर्क चालविते, त्याची ठोस माहितीही समोर आली आहे. 

महाराष्ट्र सुकन्या बालविकास योजनेच्या कॉल सेंटरसाठी "ग्राहक सेवा प्रतिनिधी' म्हणून नोकरी देतो, असे आमिष दाखवून प्रत्येक उमेदवाराकडून 13 हजार 200 रुपये उकळणाऱ्या टोळीविरोधात महिला व बालविकास विभागाने शुक्रवारी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती, त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  पोलिस आयुक्‍त गुलाबराव पोळ, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी पुढील तपासासाठीच्या सूचना दिल्या आहेत. या फसवणुकीच्या प्रकारात जो मोबाईल नंबर वापरला आहे, त्याची सर्व माहिती घेण्यात आली असून, ही टोळी परराज्यांतून सर्व सूत्रे हलवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ज्या खात्यावर हे पैसे भरून घेण्यात येत होते, हे खाते रोहित सिंग या नावाने गेल्या महिन्यातच उघडण्यात आले आहे. या खात्यावरून महाराष्ट्रातील व्यवहार झाले असल्याचा अंदाज असून, आणखी काही बॅंक खाती असण्याचाही संशय पोलिस तपासात व्यक्त करण्यात आला आहे. 

या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांची पथके इतर राज्यांत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली. या टोळीने आपले मुख्यालय गोव्याला असल्याचा पत्ता दिला आहे. मात्र, "सकाळ'ने केलेल्या तपासात हा पत्ताही बनावट असल्याचे उघड झाले. या टोळीची कार्यपद्धती लक्षात घेऊन तपासाची यंत्रणा निश्‍चित करण्यात आली असून, लवकरच ही टोळी पोलिसांच्या हाती लागेल, असा विश्‍वास कांबळे यांनी व्यक्त केला. ज्या तरुणांची फसवणूक झाली आहे, त्यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.