সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 12, 2014

बहाद्दर हरिदासने दिली वाघाशी झुंज

वरोरा : शेतातून बैल घेऊन सायंकाळी परत येत असताना पायवाटेलगतच्या झुडपामधून अचानक वाघ एका २८ वर्षीय युवकासमोर आला. युवकाने प्रसंगवधान दाखवून धाडसाने वाघाचा पहिला वार चुकविला. हातात काठी घेऊन प्रतिकार करु लागला. १0 ते १५ मिनिटे त्यांच्या ही झुंज सुरू होती. अखेर युवकाच्या धाडसामुळे वाघाला माघारी वळावे लागले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सावरी शेतशिवारात घडली. यामध्ये युवक जखमी झाला.
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या सावरी (बी.) गावातील युवक हरिदास यादव शेंडे हा १0 जानेवारी रोजी बैल घेऊन शेतात गेला. शेतातील दिवसभराची कामे आटोपून हरिदास सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बैल घेऊन घराकडे परत येत होता. दरम्यान, सुभाष कारेकार यांच्या शेतालगतच्या झुडुपामधून अचानक वाघ निघाला. तेव्हा हरिदासचे लक्ष नव्हते. वाघ दिसताच हरिदासच्या बैलांनी अचानक धूम ठोकल्याने हरिदास थोडा थबकला. समोर पट्टेदार वाघ दिसताच प्रारंभी हरिदासही घाबरला. मात्र त्यानंतर त्याने प्रसंगवधान दाखविले. वाघाने हरिदासवर उडी घेतली. मात्र हरिदासने हा वार चुकविला. हरिदास आरडाओरड करीत हातातील काठी फिरवू लागला. वाघाने अनेकदा हरिदासवर हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु हरिदासाने मोठय़ा धैर्याने वाघाचा प्रयत्न हाणून पाडला. वाघ आणि हरिदासमधील ही झुंज सुमारे १५ मिनिटे सुरू राहिली. हरिदासची आरडाओरड सुरूच असल्याने अखेर वाघाने तिथून धूम ठोकीत जंगलात पसार झाला. यापूर्वीही वाघाने सावरी या गावालगतच्या शेतात हल्ला करुन दोघांचा बळी घेतला होता. या घटना विस्मरणात जाण्यापूर्वीच शुक्रवारी वाघाने हरिदासवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. हरिदासला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने रुग्णालयात जाऊन हरिदासची भेट घेतली असता त्याने त्याने आपबिती कथन केली. याबाबत वनपरिमंडळ अधिकारी संजय पडवे यांच्याशी संपर्क साधला असता घटनेची माहिती मिळाली असून वनकर्मचारी घटनास्थळी गेल्याचे सांगितले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.