সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, January 13, 2014

दारुमुक्तीचा निश्चय करून चांगला माणूस बनावे : राणी बंग

कोरपना :-     दारूमुळे मेंदूवर अधिक परिणाम होत असतो परिणामात विवेकशक्तीचा नाश होतो, कॅन्सर चे प्रमाण वाढते मेणबत्ती सारखी दिसणारी शरीरयष्टीउदबत्ती सारखी होते, काही पुरुष व्यसनधीनतेमुळे अनैतिक संबधाकडे वळत आहे तेव्हा दारुमुक्तीचा निश्चय करून प्रत्येकाने चांगला माणूस बनण्याचा निश्चय केला पाहिजे असे मत समाजसेविका महाराष्ट्रभूषण डॉ राणी बंग यांनी गडचांदूर येथील दारू व्यसन मुक्ती मेळाव्यात व्यक्त केले .
     कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे शेषराव महाराज समिती कोरपना द्वारा आयोजित दारू मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या या वेळी अध्यक्ष म्हणून भ्रष्टाचार समितीचे विश्वस्त डॉ शिवराज कुंभारे ,प्रमुख मार्गदर्शक शेषराव महाराज दारू व्यसन संस्थेचे उतराधिकारी संतोष महाराज अबीद अली,जिल्हा  परिषद चे कृषी सभापती अरुण निमजे,शैख रउफ भाई, अविनाश आंबेकर,गोपाल मालपाणी,डॉ संजय भोयर, सोपान नागरगोजे,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
    बंग म्हणाल्या निवडनुकीमध्ये मतासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे विरोधी पक्षातील मतदारांना दारू पाजून मतदानापासून वंचित ठेवता येते असे काही राजकीय पक्षातील मोठे नेते विनोदाने बोलतात मात्र यामुळे सामाजिक स्वास्थ भिघडत असून दारूचे प्रलोभन देणा-र्यांना  नाकारले पाहिजे  शेषराव महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी कार्य सुरु केले आहे त्यमुळे चांगल्या मार्गाने जो नेतो तोच खरा देव ठरतो माणूस दारू पिला कि पोपटा सारखा बोलतो,कोल्ह्यासारखा लबाड वागतो वाघासारखा डरकाळी फोडतो आणि दुकारासारखा लोळायलालागतो, असा विनोदात्मक दृष्टान्त देत त्यांनी दारूचे दुष्परिणाम सांगितले.
     गडचिरोली पासून दारूमुक्ती आंदोलनाची सुरु झालेली लढाई चंद्रपूर जिल्ह्यात आजही सुरु आहे सरकारने आश्वासन दिले मात्र आजही लढा कायम ठेवावा लागत आहे. या लढ्यात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे सांगत त्यांनी ‘दारू दुकाने हात्लीच पाहिजे दारूची बाटली फुटलीच पाहिजे ‘ अशा घोषणा दिल्या, दारूमुक्तीच्या दुसर्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे अशी विनंती या वेळी केली.

     डॉ शिवराज कुंभारे यांनी जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याचा परिचय देत अन्नाची प्रकृती ठीक नसल्याने ते आज उपस्थित राहू शकले नाही राळेगणसिद्धीत अण्णांनी  दारूबंदी केली याच प्रमाणे प्रत्यक गावात दारू बंदी झाली पाहिजे असे यावेळी सांगितले. प्रास्ताविक प्रमोद खडसे यांनी केले तर संचालन सचिन देशमुख तर आभार लक्ष्मीकांत धानोरकर यांनी मानले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.