२४0 बुथ : मोबाईल बुथही राहणार, २४ ला मोजणी
चंद्रपूर : विदर्भ राज्याच्या बाजूने असलेले जनमत अजमाविण्यासाठी गुरूवारी विदर्भ जनमत चाचणी घेतली जात आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने होणार्या या जनमत चाचणीसाठी तयारी पूर्ण झाली आहेत.
चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रामध्ये हे जनमत घेतले जाणार आहे. त्यासाठी २४0 बुथ उभारले जाणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक ही जबाबदारी पार पाडतील. गुरूवारी सकाळी ९ वाजेपासून या जनमत चाचणीला सुरूवात होईल. ती सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. आवश्यक्ता भासल्यास गरजेनुसार ही वेळ वाढविली जाईल, असे आयोजकांनी सांगितले आहे.
सरकारी कर्मचार्यांना मतदान करणे सोईचे व्हावे यासाठी शासकीय कार्यालयांपुढे मोबाईल बुथ ठेवले जातील. एका वाहनावर ही यंत्रणा बसविलेली असून ते वाहन दिवसभर कार्यालयासमोर ठेवले जाणार आहे. या सोबतच उद्या गुरूवार असल्याने मंदीरात होणारी गर्दी लक्षात घेता तिथेही दिवसभर मोबाईल बुथ ठेवले जाणार आहे. यासोबतच मस्जिद, बौद्ध विहार याठिकाणीसुद्धा बुथ ठेवले जाणार आहे.
अन्य निवडणुकामध्ये मतदारांच्या बोटावर शाई लावली जाते त्या धर्तीवर मतदारांना मतदारांची खुण पटविली जाणार आहे. मतपत्रिका तयार केली असून त्यावर होय अथवा नाही असा शेरा मतदारांना नोंदवायचा आहे. नागरिकांनी आपला कौल दर्शवावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.