प्रा. सूर्यकांत खनके : तेली समाजाचा चंद्रपुरात उपवर-वधु परिचय मेळावा
चंद्रपूर : समाज कार्याला जोपर्यंत राजकारणाची जोड मिळत नाही, तो पर्यत समाजाचा विकास शक्य नाही, असे मत प्रा. सूर्यकांत खनके यांनी व्यक्त केले.
तेली युवक मडळाच्या वतीने रविवारी (ता. १२) तुकूम येथील मातोश्री सांस्कृतिक सभागृहात आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून झाले. अध्यक्षस्थानी प्रा. वासुदेवराव रागिट होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विद्या बागडे, युवा उद्योजक नितीन पोहाणे, प्रा. रमेश पिसे, अॅड. रवी खनके, नगरसेवक आकाश साखरकर, अनिल खनके, डॉ. राहुल मोगरे, रवींद्र जुमडे, रेखाताई वैरागडे यांची मंचावर उपस्थिती होती. मेळाव्यात वर-वधुंची माहिती असलेली ‘प्रेरणा या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. यात सुमारे सातशे उपवर-वधूचे नाव, शिक्षण, जन्मतारीख, मामेकूळ, नोकरी, व्यवसाय, अपेक्षा आदी माहिती आहे.
यावेळी प्रा. विद्या बागडे म्हणाल्या, अनिष्ट रूढी, परमपरा व हुड्यांची प्रथा यावर वधू-वर परिचय मेळाव्याने आळा घातला जातो. मेळावे समाज हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक बी. डी. बिजवे यांनी तर आभार संध्या वाढई यांनी मानले. यावेळी सुनील बुटले, गोविल मेहरकुरे, प्रशांत देवतळे, शिरीष तपासे, कैलास रहाटे, रमेश कुयटे, ‘मनोज झाडे, विकास टिपले, संतोष झाडे, योगेश देवतळे आदी उपस्थित होते.