সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 02, 2014

बॅंक अध्यक्षांना मारहाण प्रकरण : कर्मचार्‍यांनी नोंदविला निषेध

चंद्रपूर :
निलंबित महिला कर्मचार्‍याला पुन्हा नोकरीवर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांसह काही महिला कार्यकर्त्यांनी येथील कन्यका नागरी सहकारी बॅंकेत सोमवारी राडा केला. बॅंकेचे अध्यक्ष प्रफुल्ल भास्करवार यांच्या अंगावर शाई फेकून त्यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी मनसे शहर अध्यक्षासह आठजणांना मंगळवारी अटक केली. 
मनसेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, शहर अध्यक्ष संदीप गायकवाड, शहर सचिव भरत गुप्ता, राजू कुकडे, प्रकाश चंदनखेडे, मनोज तांबेकर, सुजय अवतरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेच्या कर्मचार्‍यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली. यासोबतच विदर्भ अर्बन बॅंक को-ऑपरेटिव्ह असोसिएशननेही या घटनेचा निषेध नोंदविला आहे. बॅंकेतील मुख्य शाखेत घडलेल्या या घटनेनंतर मंगळवारी जिल्ह्यातील ११ शाखांतील कामकाज दिवसभर बंद होते. कर्मचार्‍यांनी बॅंकेसमोर निषेध फलक लाऊन आपला रोष व्यक्त केला.
अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली असा आरोप याच बॅंकेतील निलंबित महिला कर्मचार्‍याने केला होता. यावरून मनसेच्या पदाधिकार्‍यांनी बॅंकेत जाऊन अध्यक्ष प्रफुल्ल भास्करवार यांना याबाबत जाब विचारला. महिला कर्मचार्‍याला पुन्हा नोकरीवर रुजू करून घ्या, अशी मागणी केली. चर्चेतून मनसे कार्यकर्त्यांंचे समाधान झाले नाही. यातून शाब्दिक चकमक उडाली. भास्करवार यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली व त्यांच्या अंगावर शाई फेकली होती.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.