चंद्रपूर
जिल्ह्य़ातील गोंडपिपरील तालुक्यातील धाबा गावाजवळ आज शनिवारी ११ जानेवारीला सकाळच्या सुमारास दोन पिल्लासह वावरणार्या अस्वलाने 'मॉर्निग वॉक' करणार्या सतीश कोटूकवार (३0) या युवकाला हल्ला करून जागीच ठार केले.
या नंतर अस्वल जंगलाच्या दिनेशे पळ काढला. तर एक पिल्लू मृतदेहाजवळच आढळले. वनविभागाने ते पिल्लू तालुक्यात घेतले असले तरी पिल्लाच्या शोधात अस्वल गावात येण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सतीश कोटूकवार हा मूकबधिर होता व गावातच कपड्यांना इस्त्री करण्याचे दुकान चालवित होता. आज सकाळी गावाबाहेरील मार्गावर तो फिरायला गेला असताना अचानक त्याच्यावर अस्वलाने हल्ला चढविला. त्यात ज्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा हल्ला चढविल्यानंतर अस्वल जंगलात निघून गेली. पण, अस्वलाचे एक पिल्लू तिथेच राहिले. चार ते पाच महिन्याच्या या पिल्लाला वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे. या पिल्लामुळे युवकावर हल्ला करणारी अस्वल मादा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मादा अस्वलाचे पिल्लू लहान असताना ती अतिशय आक्रमक व्यवहार करते व त्यातूनच हा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हल्ला करणार्या मादा अस्वलाची तिच्या पिल्लापासून वेगळी झाल्यामुळे ती या भागात परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे व त्यामुळे वनविभागाने या भागात आपली गस्त वाढवली आहे.