रायगडमध्ये युवाशक्तीचा गजर
उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
अलिबाग (प्रतिनिधी) - येथे १५ जानेवारीपासून युवा सेनेचे दोन दिवस ‘युवा सेना लक्ष्य २०१४’ हे राज्यव्यापी शिबीर होत आहे. या शिबिराची जोरदार तयारी सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो युवासैनिक उपस्थित राहणार असल्याने रायगड जिल्ह्यातील कडेकपार्यात युवाशक्तीचा गजर घुमणार आहे.
अलिबाग येथील हॉटेल साईइन येथे दोन दिवस होणार्या या शिबिरासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही उपस्थित राहणार असल्याने तरुणांमध्ये उत्सुकता आहे. युवा सेना प्रवक्ता राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली. शिबिरात युवासैनिकांसाठी निवडणूक प्रक्रिया, प्रचार, सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेचा प्रचार, निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक काम अशा विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. शिबिरात युवा सेनेची सक्रिय कार्यकारिणी, जिल्हा युवाधिकारी, उपजिल्हा युवाधिकारी, तालुका युवा अधिकारी, शहर युवाधिकारी, मुंबईतील विधानसभा युवाधिकारी, युवा सेनेच्या संलग्न संघटना युवा ब्रिगेड, सोशल मीडिया सेल, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.