सामाजिक कामात पत्रकारांनी योगदान द्यावे
कम्युनिस्ट नेते गणपतराव अमृतकर यांचे प्रतिपादन
चंद्रपूर -जिल्हा पत्रकार संघच्या वतीने पत्रकारा दिनाचा सोहळा ६ जानेवारी २०१४ ला उत्साहात झाला. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात झालेल्या पत्रकार दिन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीधरराव बलकी होते.
कम्युनिस्ट नेते गणपतराव अमृतकर, माजी कामगार नेता विश्वासराव लहामगे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किशोरभाऊ जोरगेवार, महाराष्ट्र बहुभाषीय पत्रकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष यशवंतराव दाचेवार प्रमुख वक्ते होते. पाहुण्याचे स्वागत दीप प्रज्वलन, मालाअर्पण केल्यानंतर काङ्र्मक्रमाला सुरूवात झाली. पाहुण्यांचे पुष्प गुच्छांनी स्वागत करण्यात आले. धुन्नाजींनी पत्रकारितेतील अडचणी व व्यथा कथन करून शासनाने जिल्हा वृत्तपत्रांना सहयोग द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यशवंतराव दाचेवार यांनी जिल्ह्यातील विविध संघ व संगटनांनी एकत्र येऊन शासनावर दबाव आणावा असे मनोगत वर्तविले.
प्रमुख पाहुणे गणपतराव अमृतकर यांनी सामाजिक काङ्र्र्मातील पत्रकारांच्या योगदानावर भर दिला. किशोरभाऊ जोरगेवार यांनी पत्रकारांच्या अडचणी व गृहनिर्माण योजनेसाठी सहकाङ्र्म देण्यावर शब्द दिला. विश्वासराव लहामगे यांनी कामगार क्षेत्र व सामाजिक वांधिलकी यात पत्रकारांचे भरीव योगदानावर प्रकाश टाकला. मराठी पत्रकारितेचे आद्यजनक बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण दिनी ६ जानेवारी ला पत्रकारितेत भरीव योगदान देणाèया पत्रकारांचा गौरव करण्यांत आला. दै. लोकशाही वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर यांना दर्पण पुरस्कार तर दै. लोकसत्ताचे राजुरा तालुका प्रतिनिधी अनिल बाळसराङ्क यांना टिळक स्मृती पुरस्कार, दै. भास्कर चे चंद्रपूर प्रतिनिधी मुकेश वाळके यांना मा.सा. कन्नमवार पुरस्कार, दै. देशोन्नतीचे प्रतिनिधी प्रकाश देवगडे यांना पा. ना. भिमनवार पुरस्कार आणि दै. लोकशाहीचे भद्रावती तालुका प्रतिनिधी तथा न.प. भद्रावतीचे आरोग्य सभापती राजुभाऊ गैनवार यांना तु. ना. काटकर पुरस्काराचा सन्मान लाभला.
व्यासपिठावर पाहुणे आणि पुरस्कार प्राप्त पत्रकारांना शाल, श्रीङ्कळ, पुष्पगुच्छ तसेच स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संत गाडगेबाबा सामाजिक बांधिलकी पुरस्काराचा मान कामगार नेता विश्वासराव लहामगे यांना देण्यात आला. सर्व पुरस्कार प्राप्त महानुभावांनी मनोगत व्यक्त केले. काङ्र्मक्रमाचे संचालन प्रा. कु. आरती दाचेवार यांनी तर आभार प्रदर्शन सरचिटणीस प्रकाश चांभारे यांनी केले. या प्रसंगी पत्रकार बांधवांसोबत ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विजय चंदावार, इतिहास संशोधक टी.टी जुलमे, राम नायडू, गौरव बडकेलवार यांचे सह हरचरणqसह वधावन, सैय्यद रमजान अली, अशोक कोटकर, अनिल देठे, राजेश सोलापन, प्रभाकर आवारी, शेख गुरूजी, अनवर मिर्जा, श्याम पाथोडे, यशवंत निखुरे, पुंडलिक निनावे, भोले, एम.के. सेलोटे, दिपील मांढरे, यांचे सह जिल्ह्यातील अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.