संरक्षित आणि प्रादेशिक वनात 16 ते 23 जानेवारी दरम्यान व्याघ्र गणना करण्यात येणार आहे. भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून, एनटीसीए नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनात दर चार वर्षांनी ही गणना करण्यात येते.
वाघ असलेल्या 17 राज्यांमध्ये ही गणना होत आहे. यंदा प्रथमच गोवा आणि नागालॅण्ड राज्याचा समावेश यात केला आहे. रेषा विभाजन (ट्रान्झीट लाइन) पद्धतीने ही व्याघ्र गणना करण्यात येणार आहे. 2006 पासून या प्रकारने गणना सुरू झाली आहे. 2006 मध्ये देशातील वाघांची संख्या 1411 तर 2010 मध्ये 1706 वाघांची नोंद झाली होती. यंदा प्रथमच गोवा, नागालॅण्ड, गडचिरोली, धुळे परिसरात व्याघ्र गणना करण्यात येत असल्याने आश्चर्यकारण आकडा समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात वनविभागाने 5500 बीटमध्ये तृणभक्षकांची गणना केली आहे. प्रत्येक बीटमध्ये एक रेषा विभाजन पद्धती लावण्यात आली होती. वनमंत्र्यांनी राज्यात 200 पेक्षा अधिक वाघ असून, चंद्रपूर जिल्ह्यात 100 वाघ असल्याचे स्पष्ट केले आहे. 2005 मध्ये राज्यात 268 वाघ होते. ती संख्या 200 वर आल्यामुळे गेल्या आठ वर्षांत 68 वाघांची संख्या कमी झाली आहे. यामुळे शिकाऱ्यांनी वाघांना लक्ष्य केले आहे. 2010 मध्ये अनेक बीटमध्ये व्याघ्र गणना करण्यात आलेली नव्हती यंदा त्या बीटमध्येही गणना केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील गणनेत भारतीय वन्यजीव संस्थानचे चमू येणार असून, काही नमुनेही गोळा केले आहेत. आता आठ दिवसांच्या कालावधीत प्राथमिक स्तरावर ही माहिती गोळा करण्यात येणार आहे