बल्लारपूर शहरातील नागरीकांच्या समस्या घे न श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड.पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बल्लारपुरात अनेक कुटुुंबाकडे शिधापत्रिका नाही व नविन दिल्या जात नाही, बिपिएल धारकांना बिपिएलचे कार्ड बनवुन दिल्या जात नाही, बिपिएल उत्पन्न प्रमाणपत्राचे अट लावुन पन्नास हजाराचे वरील उत्पन्न दाखविणे, निराधार योजनेची अमलबजावणी केल्या जात नाही अशा रविंद्रनगर येथिल लोकांच्या समस्यांना घेऊन श्रमिक एल्गारचे वतीने अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसिल कार्यालयावर पोहचल्यानंतर शिष्ठमंडळासोबत तहसिलदार बि.डी.टेळे यांनी चर्चा केली परंतु मोर्चेÚयांना समाधानकारक उत्तर न देता आमच्याकडे कर्मचारी नसल्याचे उत्तर देऊन हात झटकलेे. त्यामुळे मोर्चेकरीत महीला संतापुन तहसिलदारचा निषेध करीत कॅबीनमधुन निघाले व नागपूरचे आयुक्त बि.वेणुगोपाल रड्डीे हे जिल्हाधिकारीे कार्यालयात असल्याने महीला चंद्रपूर गाठुन व त्यांना भेटुन समस्या मांडल्या यावर रेड्डी व जिल्हाधिकारी डाॅ.म्हैसेकर यांनी या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
या मोर्चात महासचिव विजय कोरेवार, फरजाना शेख, संगिता गेडाम, सलमा शेख, प्रविण चिचघरे, सुर्यकांत भूरसे, फातीमा शेख, जमीना शेख, प्रेमदास उईके, कपिला भसारकर, फिरोजा पठाण, हसीना पठाण, शमीना पठाण आदींसह शेकडो महीला सहभागी होते.