সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 03, 2014

चंद्रपूर विभाग १५ कोटींच्या तोट्यात!

चंद्रपूर- 'आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या' अशा स्थितीला तोंड देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ नवनवीन उपक्रम अंमलात आणत असले तरी राज्य परिवहन महामंडळाचे चंद्रपूर विभाग वर्षाकाठी तब्बल १५ कोटीच्या तोट्यात आहे.
येथील वर्षाचा सरासरी २0 कोटीने खर्च वाढला आहे. यास डिझेलची झालेली भाववाढ, कामगार करार व सोबतच खासगी प्रवाशी वाहतूक मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहे. राज्य परिवहन महामंडळाने महसूल वाढीसाठी नव्या वर्षापासून प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याचा नवा उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून वाहक प्रवाशांसाठी उद्घोषणा करून नमस्कार, मी बसचा वाहक आपले स्वागत करतो आदींसह एस.टी.मध्ये सौजन्याचे स्वर ऐकण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू केला असला तरी वर्षाकाठी एस.टी. महामंडळाला होणारा तोटा सरासरी भरून निघणारा नाही. चंद्रपूर विभागात चंद्रपूर, राजुरा, गडचिरोली, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी, अहेरी या आगारांचा समावेश होता. या सर्व आगारांमध्ये १ हजार ४३ चालक तर १ हजार १0 वाहक आहेत. यात ५३७ बसेसचा समावेश आहे.
चंद्रपूर विभागाला या सर्व आगारातून एप्रिल ते नोव्हेंबर २0१३ पर्यंत चालू वर्षात १२७ कोटी ३५ लाख खर्च आला. तर ९८ कोटी ४ लाख उत्पन्न झाले. हेच मागील वर्षात १0७ कोटी १४ लाख खर्च तर ९२ कोटी ९६ लाख उत्पन्न होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५ कोटीने उत्पन्नात भर पडली असली तरी वर्षाकाठी सरासरी २0 कोटीने खर्च वाढला आहे. चंद्रपूर विभागातील बहुतांश ग्रामीण भागात बसफेर्‍यांची कमतरता व तुलनेत खासगी प्रवाशी वाहतूक सर्वाधिक आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाची बस रिकामीच फेर्‍या मारत असल्याचे चित्र बरेचदा दिसून येते. यासोबतच शासनाने केलेली डिझेलची भाववाढ, कामगार करार, बससाठी लागणारे स्पेअर पार्ट्स, टायर, ऑईल आदी खर्चही या तोट्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत ठरले आहेत. कर्मचार्‍यांवर १ कि.मी. अंतरासाठी साधारणत: ९ रु. ५0 पैसे खर्च होतात. मात्र त्या तुलनेत आवक मात्र नगण्यच असते. त्यामुळेही चंद्रपूर विभाग तोट्यातच चालला. ही स्थिती एकट्या चंद्रपूर विभागाची नाही तर सर्व राज्यातील विभागातीलच असल्याची माहिती चंद्रपूर विभागातील एका कर्तव्यदक्ष अधिकार्‍यानी लोकशाही वार्ताशी बोलताना दिली. खासगी प्रवाशी वाहतूकही चंद्रपूर विभागाअंतर्गत मोठय़ा प्रमाणात आहे. खासगी प्रवाशी वाहतूकदार बस सुटण्याच्या वेळातच आपली वाहने सोडतात. या सोबतच काही दिवसांमध्ये ते तिकीटदामध्ये सुट करतात. तर मध्यंतरीच वाढवितात. मात्र परिवहन विभागात तसे होत नाही. त्यामुळे प्रवासीही बसकडे दुर्लक्ष करीत आहेत. एकंदरीत खासगी प्रवाशी वाहतूक परिवहन महामंडळ तोट्यात येण्यास मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहेत

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.