সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 16, 2014

श्री श्रींच्या प्रवचनात मोदींचा प्रचार

चंद्रपूर : 'व्होट फॉर बेटर इंडिया' असा फलक आपल्या मंचावर झळकावीत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरू श्री श्री रविशंकर यांनी सरकार चालविण्यासाठी अनुभवी आणि सक्षम नेतृत्व हवे असल्याचा राजकीय संदेश बुधवारी आपल्या प्रवचनातून दिला. स्थानिक चांदा क्लब मैदानावर त्यांचे प्रवचन झाले. दरम्यान, श्री श्रींच्या प्रवचनात मोदींचाच प्रचार झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
01.jpg प्रदर्शित करत आहे

राहुल गांधी आपणास कधी भेटले नाही. नरेंद्र मोदी भेटले असल्याने त्यांना मी चांगले ओळखतो, असे सांगत मोदी यांनी गुजरातचा चांगला विकास केला, असेही ते म्हणाले. श्री श्री पुढे म्हणाले, एवढा मोठा देश चालविण्यासाठी खिचडी सरकार नसावे. सत्ताधारी व विरोधी या दोन्ही बाकावरील राजकीय माणसे परिपक्व असावी. देश चालविण्यासाठी अनुभवी पक्षाने पुढे यावे आणि जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहावे. भ्रष्टाचाराविरोधात उभे राहण्याचा संदेश देत त्यांनी 'व्होट फॉर बेटर इंडिया'चा नाराही दिला.

१२ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात केवळ ३0 ते ४0 टक्के मतदान होते, ही बाब योग्य नव्हे. सरकार ही माणसांनीच निर्माण केलेली व्यवस्था आहे. त्यामुळे ती मजबूत करा. भेदभाव करणारे, स्वार्थपणा जोपासणारे, काळा पैसा विदेशात नेणारे सरकार काय कामाचे, राजकारण शुद्ध असावे. जनमानसाची स्पंदने सरकारमध्ये दिसायला हवी. त्यासाठी उमेदवारी देण्यापूर्वी माणसे पडताळली जावी, असेही ते म्हणाले.

सत्संगदरम्यान श्री श्री रविशंकर यांनी उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पारधी समुदायासाठी काम करणार्‍या यवतमाळातील दीनदयाल संस्थेला त्यांनी मदत दिली.

सोबतच तीन गावांसाठी बजरंगबलीची मूर्ती भेट दिली. विविध ठिकाणांवरुन सुमारे ३५ ते ४0 हजार भक्तसमुदाय उपस्थित होता. प्रवचनादरम्यान कुण्याही पक्षाचे नाव न घेता राजकीय मांडणी केली. श्री श्री रविशंकर यांनी कुणाचाही प्रचार केला नसला तरी त्यांचा अंगुलिनिर्देश मात्र मोदींकडेच होता.




पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीवर टिप्पणी करताना ते म्हणाले, लर्निंग लायसन्स असणार्‍या व्यक्तीला हिमालयातून वाहन चालविण्यासाठी सांगणे योग्य नव्हे. आम आदमी पार्टीला दिल्लीत संधी मिळाली आहे. त्यामुळे आता लोकांनी त्यांचे तेथील कार्य पाहिले व पारखले पाहिजे.

आसारामबापूंविषयीच्या एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, सीतेचे अपहरण करतानाही रावणाने साधूचे रुप घेतले होते. मात्र यामुळे सर्व संतांकडे अंगुलिनिर्देश करणे योग्य नाही. शंकराचार्य व साध्वी प्रज्ञा यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. मात्र नंतर ते निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले. लाच न घेणे आणि न देणे याविषयीची भक्तांना आपण शपथ देत असतोच, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला गुरू वैश्यपायन, महापौर संगीता अमृतकर उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.