चंद्रपूर : चंद्रपूर पंचशताब्दी महोत्सव समिती, महानगरपालिका तथा चांदा जिल्हा फूटबॉल संघटनेच्या वतीने स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विदर्भस्तरीय फुटबॉल सामने घेण्यात आले. यात १२ फूटबॉल संघांनी भाग घेतला. आज अंतिम सामना यंग अंसार क्लब नागपूर व सीडीएफए चंद्रपूर संघादरम्यान अत्यंत चुरशीचा झाला. ट्रायबेकरमध्ये चौथ्या प्रयत्नात यंग अंसार क्लब विजेता ठरुन महापौर चषकाचा धनी ठरला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचशताब्दी महोत्सव समितीचे संयोजक माजी खासदार नरेश पुगलिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर संगीता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी, आयुक्त प्रकाश बोखड, उपायुक्त राजेश मोहिते, रवींद्र देवतळे, विलास कंदेवार, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, हिंदकेसरी अमोल लुथडे, फूटबॉल संघटनेचे अध्यक्ष के. के. सिंग, सचिव दीपक दीक्षित, सरवर खान यांची उपस्थिती होती. विदर्भस्तरीय फूटबॉल सामन्यात अंतीम लढत होण्यापूर्वी ईगल क्लब नागपूर व बिग बेन क्लब नागपूर संघादरम्यान महिलांचा सामना झाला. यावेळी बीग बेन महिला संघाने ईगल क्लबवर २-0 अशी मात केली. फूटबॉलच्या अंतीम सामन्यात विजेता यंग अंसार क्लब नागपूरला महापौर चषक, रोख ३१ हजार रुपये प्रदान करुन सन्मानित करण्यात आले तर उपजिवेता सीडीएफए संघाला चषक व रोख २१ हजार रुपये बक्षिस देण्यात आले. अंत्यत चुरशीच्या सामन्यात निर्धारीत वेळात १-१ अशी बरोबरी साधली. ट्रायबेकरच्या माध्यमातून उत्कंठावर्धक सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. |
Thursday, January 09, 2014
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য