সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 17, 2013

आज चंद्रपूर भूषण पुरस्कार सोहळा



चंद्रपूर : लोकाग्रणी स्व. बळवंत राघव उपाख्य बाबासाहेब देशमुख स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ११ वा चंद्रपूर भूषण पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध साहित्यिक तथा दैनिक लोकमतचे माजी संपादक तसेच चंद्रपूरच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राचे अध्र्वयु, प्राचार्य पु.ह. उपाख्य मदन धनकर यांना जाहीर झाला आहे. 
सदर पुरस्कारचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख ११ हजार रुपये असे आहे. या पुरस्काराचे वितरण १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३0 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित आहे. 
१७ नोव्हेंबरला येणारी कार्तिक पोर्णिमा ही माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या जीवनातील सहस्त्रावी पोर्णिमा आहे. या सुयोगाचे औचित्य साधून त्यांचा 'सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा' चंद्रपूर भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर लगेच आयोजित आहे. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी उपस्थित राहतील. पालकमंत्री संजय देवतळे व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती आयोजकानी केली आहे.

आजवरचे 'चंद्रपूर भूषण'शांताराम पोटदुखे, स्व. तुकारामदादा गीताचार्य, प्रथम मुख्य माहिती आयुक्त डॉ. सुरेश जोशी, संशोधक डॉ. अब्दुल बशीर, सर्वोच्च न्यायालयाचे नवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, साहित्यिक के.ज. पुरोहित, महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग, धान संशोधक दादाजी खोब्रागडे, डॉ. विकास आमटे, ८५ व्या अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांना प्रदान करण्यात आले आहेत.
****************************************************

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.