সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 06, 2013

शेतकरी संघटनेचे १२ वे राष्ट्रीय अधिवेशन चंद्रपुरात

कार्यक्रम पत्रिका आणि संघानेच्या अन्य घडामोडी बघण्यासाठी विशेष लेबल मध्ये click kara
http://www.sharadjoshi.in/node/130
http://shetkari-sanghatana.blogspot.in/


चंद्रपुर- अन्नसुरक्षा आणि सिलिंगसारखे कायदे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बोकांडी लादत आहे. आधीच बुडतीला निघालेली शेती या कायद्यांमुळे आणखी नेस्तनाबूद होणार आहे. या प्रश्नांसह शेती समोरच्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे येत्या आठ नोव्हेंबरपासून चंद्रपुरात राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचे बारावे राष्ट्रीय संयुक्त अधिवेशन येत्या आठ, नऊ आणि १० नोव्हेंबर रोजी चांदा क्लब मेंदानावर होत आहे. उद्घाटन माजी खासदार शरद जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पीटीआयचे माजी अध्यक्ष वेदप्रकाश वैदिक, लोकसत्ता पार्टीचे आमदार जयप्रकाश नारायण, अखिल भारतीय किसान स‘न्वय समितीचे अध्यक्ष सरदार भूपेंद्रqसह मान, डॉ. मानवेंद्र काचोडे राहणार असून, स्वागताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप आहेत. आठ आणि नऊ रोजी प्रतिनिधी संमेलन, १० नोव्हेंबर रोजी खुले अधिवेशन होईल. अधिवेशनात अन्नसुरक्षा कायदा, सिqलगचा कायदा, जैविक तंत्रज्ञान, शेतीचे प्रश्न, महिला प्रश्न, मलमत्ता आणि सुरक्षेचा प्रश्न, वाढती बेरोजगारी, पाणीसमस्या, विदर्भ राज्याची निर्‘िती आदी विषयांवर चर्चा होईल. यावेळी २०१४च्या अनुषंगाने निवडणुकीची भूमीका ठरविण्यात येणार आहे. अधिवेशनाला महाराष्ट्र, हरियाना, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान यासह देशातील १४ राज्यातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
 चुकीच्या धोरणांमुळे तीन लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत गळ्याला फास लावला. एकट्या विदर्भात ३४ हजार शेतकरी संपले तरी सरकार धडा घ्यायला तयार नाही. शेतमालाचा भाव ठरविण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला नाही. ४० टक्के लोकांनी शेतीकडे पाठ फिरवल्याचे सिद्ध होत आहे. अशा परिस्थितीत सरकार अन्नसुरक्षा आणि सिलिंग कायद्याचा हट्ट धरून शेतीची आणखी नासाडी करत आहे. या कायद्यांमुळे पीक परिस्थिती बदलून शेतमालाच्या दर्जाची वाट लागणार आहे. त्याला शेतकरी संघटनेचा विरोध आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने त्यासंबंधीचे धोरण ठरविण्यासाठी हे राष्ट्रीय अधिवेशन चंद्रपुरात होणार आहे. '

शरद जोशींची उपस्थिती
तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाचे शेतकरी संघटनेचे नेते खासदार शरद जोशी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता उद्घाटन होईल. पहिले दोन दिवस देशभरातून आलेले शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींचे अधिवेशन होईल. १० नोव्हेंबरला खुले अधिवेशन होईल.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.