সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 13, 2013

नारायण साईचा अहेरीत शोध


अहेरी : लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरूंगात असलेले स्वयंघोषित संत आसाराम बापू यांचे पुत्र नारायण साई हे महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त अहेरी भागात दडून असल्याची चर्चा सुरूअसल्याने पोलिसांनी या भागात नारायण साईचा शोध सुरू केला आहे.
आलापल्ली येथील हॉटेलसमोर काही नागरिकांना नारायण साई दिसल्याची चर्चा रविवारपासून सुरूहोती. त्यावरून अहेरी परिसरात नारायण साई आपल्या भक्तगणांकडे वेश बदलून दडून असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस विभाग सक्रिय झाला असून विविध ठिकाणी नारायण साईच्या शोधात पोलीस कर्मचारी व अधिकारी गुप्त शोध घेत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
अहेरीजवळील चिंचगुंडी येथे आसाराम बापूंचे आo्रम असून नारायण साई या आo्रमात लपून असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अहेरी, आलापल्ली, एटापल्ली या अतिदुर्गम भागात नारायण साई लपून असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचप्रमाणो आलापल्ली मार्गे सिरोंचाकडून छत्तीसगड किंवा आंध्र प्रदेशमध्ये नारायण साई निघून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुरत येथील न्यायालयाने नारायण साई यांना फरार घोषित केले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा मागील अनेक दिवसांपासून नारायण साईच्या शोधात आहे. विशेष म्हणजे नारायण साई अहेरीच्या चिंचगुंडी गावातील आसाराम बापूंच्या आo्रमात २00६ मध्ये काही दिवस मुक्कामाने असल्याचा दावा परिसरातील नागरिक करीत आहेत.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.