देवनाथ
गंडाटे : सकाळ
वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. २१ : शहरात
कुणालाही पासपोर्ट फोटो
काढायचा असो की, डोळ्यांसाठी
चष्मा. ते
मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे
छोटा बाजार. स्वातंत्र्यपूर्व
काळात येथे भाजीबाजार
भरायचा. किराणा
दुकाने आणि सरपण, गवतासाठी
हा चौक प्रसिद्ध होता. काळाच्या
ओघात भाजीबाजार बंद
झाला. मात्र, चौकाची
छोटा बाजारङ्क अशी ओळख कायम
राहिली.
गांधी
चौक ते जटपुरा गेट मार्गावर
असलेल्या छोटा बाजार चौकात
१९९० पर्यंत बाजार भरायचा. तेव्हा
शहरातील नागरिक येथे भाजी
खरेदीसाठी यायचे. शेजारीच
एक विहीर होती. त्या
काळात शहरात नळयोजना
नव्हती. त्यामुळे
इथल्या गोड पाण्याच्या विहिरीची
ख्याती होती. काही
काळानंतर ती विहीरसुद्धा
बुजली. ७०
वर्षांपूर्वी जानबाजी मोगरे
यांनी या चौकात आशा फोटो
स्डुडिओची स्थापना
केली. त्यांच्यापूर्वी
विश्वेजवार, रंगारी
आणि दीपक फोटो स्टुडिओ
होते. मात्र, शहराच्या
मध्यवर्ती भागातील छोटा बाजार
चौकातील मोगरे यांच्या स्टुडिओने
गर्दी खेचली. पुढे
जानबाजींचे पुतणे भालचंद्र
मोगरे यांनी वयाच्या १५ व्या
वर्षांपासून कॅमेरा हाती
घेतला. आता
भालचंद्र मोगरे यांचे वय ७५
वर्षे आहेत. त्यामुळे
त्यांचा व्यवसाय मुलगा
सांभाळतोय. गेल्या
१० वर्षांत या चौकात चार फोटो
स्टुडिओ स्थापन झाले. या
चौकाने ब्लॅक अॅण्ड व्हाइट
ते कलर असा प्रवास अनुभवला
आहे. भालचंद्र
मोगरे यांचे आजोबा धोंडोबाजी
मोगरे व हजारेंची मिठाईची
दुकाने प्रसिद्ध होती. सायकल, घड्याळ
दुरुस्तीचे दुकानसुद्धा या
चौकात होते. आता
ही दुकाने बंद पडलीत. वडाचे
झाड आणि कुंभार मोहल्ला ही
छोटा बाजार चौकाची आणखी एक
ओळख. या
वडाच्या झाडाखाली गत ४०
वर्षांपासून विड्याच्या
पानाची विक्री होते. मोतीराम
पेटले यांनी सुरू केलेला
व्यवसाय पुढे सुधाकर पेटले
आणि आता त्यांचा नातू प्रवीण
पेटले सांभाळत आहे. झाडाखाली
शंकर महादेवाच्या नंदीबैलाचे
छोटेसे मंदिर आहे. या
चौकात मिळणारी मामा जिलेबी
सर्वदूर प्रसिद्ध आहे.
छोटा
बाजार चौकाचे आणखी एक वैशिष्ट्य
म्हणजे येथे नेत्ररोगाचे
क्लिनिक आणि चष्माघरे
आहेत. त्यांची
संख्या जवळपास १० आहे. त्यामुळे
डोळ्यांची तपासणी आणि चष्मा
खरेदीसाठी याच चौकात यावे
लागते. जवळच
जिल्हा सामान्य रुग्णालय
असल्याने चौकात औषधालये
आहेत. काही
वर्षांपासून गांधी मार्गावर
इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक
वस्तूंची दुकाने आहेत. एलोरा
स्टेशनरी, ठकरे
मेडिकल, अंदनकर
यांचे पुस्तकालय, सोरते
आइस्क्रीम अनेक वर्षांपासून
सुरू आहे.