'चिंधी बाजार' हे नाटक रविवारी सकाळी ११.३० वाजता चंद्रपूरच्या नवोदिताने सादर केले. या नाटक बघण्यासाठी हाउसफुल गर्दी होती. संपूर्ण नाटक बघितल्यानंतर कथेचा मर्म समजाला. गोरगरिबांची व्यथा हृदय हेलावणारी आहे. नूतन धवणे यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला. कसं काय हाय…। बर हाय म्हणत नाटकात खलनायक प्रशांत कक्कड यांनी विनोदी रूपाने हसू फुलविले. महात्म्याची छायाचित्रे विकणारा तरुण साम्यवादी विचाराचा भावाला. कायद्याची भाषा आणि बाबासाहेबाचे संविधान तो पटवून देत होता. नाटकाचे दिग्दर्शक प्रा. जयश्री कापसे-गावंडे यांनी छोटीशी भूमिका सादर करीत कलाकृतीला जोड दिली. लेखक हेमंत मानकर यांच्या कथेला सर्वच कलावंतानी न्याय दिला. शिवाय हे नाटक संगीत आणि प्रकाश योजना, स्टेज सजवट यामुळे अधिक सरस ठरले…. एका शब्दात सांगायचे म्हणजे… रस्त्यावरचं जिणं अर्थात 'चिंधी बाजार'
