विवेकहीन कृत्य महिला लैंगिक अत्याचाराला बळी
मानवी संवेदना बोथड झाल्याचे चित्र स्पष्ट करणारी महिलांच्या अत्याचाराबाबतची आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केली. महिलांवरील अत्याचारात सहाव्या क्रमांकावर असले, तरी पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारे चित्र आहे. कायदे कडक करूनही वर्ष 2011च्या तुलनेत 2012 मध्ये दररोज अत्याचारग्रस्त महिलेच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. 2011मध्ये राज्यात 15 हजार 728 महिलांच्या अत्याचाराबाबत तक्रारींची नोंद केली होती. पुढच्याच वर्षी यात 625 अत्याचारग्रस्त महिलांची वाढ झाली. महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य सरकारच्या योजनांना समाजातील पाषाणांनी धक्का लावला आहे. पोलिसांच्या संवेदनशीलतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अनास्था, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे 2012 मध्ये राज्यात दररोज पाच महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद आहे. राज्यात वर्षभरात 1829 बलात्कारांची, 1140 अपहरण, हुंडाबंदी असतानाही 329 आणि पती व नातेवाइकांकडून छळाची 7 हजार 15 प्रकरणांची नोंद आहे. 2011 च्या तुलनेत ही आकडेवारी थोड्याफार फरकाने अधिक आहे. महिलांसाठी कायदे असल्यानंतर या आकडेवारीत घट होण्याची अपेक्षा केली जात असताना त्यात वाढ होणे हे राज्यातील नागरिकांसाठी चिंतेचा विषय आहे. राज्यातील महिला सुरक्षित नसल्याचेच हे द्योतक असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अधिका-याचे विवेकहीन कृत्य
शासकीय सेवेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत सर्वच ठिकाणी रंगेल कारनाम्याने वादग्रस्त ठरलेले येथील जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) विवेक बोंदरे यांच्या कृत्याचे चंद्रपुरातही दर्शन झाले आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ग्रामसेवक संघटनांनी कंबर कसली आहे.
राजुरा तालुक्यातील हरदोना येथे कार्यरत ग्रामसेविकेने दोन महिन्यांपूर्वी तिचे पती यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असल्याने त्याच जिल्ह्यात बदलीची मागणी केली. ३१ सप्टेंबरला बोंदरे यांनी कार्यालयात बोलाविल्यावर आपली नियुक्तीच नियमबाह्य असल्याचे सांगून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. हे टाळण्यासाठी लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. यापूर्वी अहमदनगर, वर्धा आणि सावली येथे कार्यरत असताना महिला कर्मचाèयांना शारिरिक सुखासाठी त्रास दिल्याचा आरोप झाला होता. वर्धा येथील प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच चंद्रपुरात ङ्केब्रुवारी २०१३ मध्ये लोहारा जंगल परिसरात रंगेल कृत्याची घटना उघड झाली होती. मात्र, तेव्हा तक्रारीसाठी कुणी पुढे न आल्याने प्रकरण दबले. आता तब्बल १० महिन्यांनी महिला ग्रामसेविकेने झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा, यासाठी रामनगर पोलिस ठाणे गाठले. त्यामुळे होणारी ही बदनामी टाळण्यासाठी श्री. बोंदरे यांनीही ही तक्रार खोटी असल्यासंदर्भात प्रतितक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सत्य काय, हे उघड करण्यासाठी पोलिसांपुढे पेच निर्माण झाला. या आरोपाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर कारवाईचा मार्ग मोकळा होईल.
बोंदरेंच्या चौकशीसाठी महिला समिती
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) विवेक बोंदरे यांनी लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप एका ग्रामसेविकेने केल्यानंतर चौकशीसाठी महिला समिती गठित करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांनी दिली. या समितीत आठ महिला आणि एक पुरुष अधिकारी असून, येत्या दोन दिवसांत अहवाल सादर होणार आहे. या अहवालानंतर जिल्हा परिषद प्रशासन पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे पाठविण्यात येईल.
आमदार मुनगंटीवार गृहमंत्र्यांना भेटणार
उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक बोंदरे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार मंगळवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेणार आहेत. ग्रामसेविकेच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, ग्रामविकास मंत्री उपबल्ध न झाल्याने प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
मनसेचे जिल्हाधिका-यांना निवेदन
महिला कर्मचाèयांना शारिरिक सुखासाठी त्रास देणाèया विवेक बोंदरे यांना सेवेतून बडतङ्र्क करण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने जिल्हाधिकाèयांमाङ्र्कत ग्रामविकासमंत्र्यांना पाठविले. या निवेदनात एक महिन्याच्या आत बोंदरे यांच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा सचिव राजू कुकडे, बळीराम शेळके, संदीप सिडा, भरत गुुप्ता, अर्चना डोंगरे, माया मेश्राम, पियूष धुपे, सुजय अवधरे, सुरेश रविदास उपस्थित होते.
ग्रामसेवक संघटनेचे निदर्शने
शारिरिक आणि आर्थिक मागणीसाठी ग्रामसेवकांना त्रस्त करणाèया विवेक बोंदरे यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करीत जिल्हाभरातून आलेल्या ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेत निदर्शने केली. बोंदरे यांनी रुजू झाल्यापासूनच कर्मचाèयांना त्रास देणे सुरू केले असून, दौèयादरम्यान ग्रामसेवकांना धमकावणे, बदली करून देण्यासाठी पैशाची मागणी करणे, महिला कर्मचाèयांकडे वाईट भावनेतून बघणे, आदी कारनाम्यांचा निषेध करण्यात आला.
३ डिसेंबरपासून बेमुदत असहकार आंदोलन
उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे यांच्यावर दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे २ डिसेंबर रोजी पंचायत समिती स्तरावर निषेध नोंदविण्यात येणार असून ३ डिसेंबरपासून बेमुदत असहकार आंदोलन करण्यात येणार आहे.
महिला तक्रार कमेटीची स्थापना करण्यात आली आहे. सदर प्रकरण चौकशी कमेटीकडे सोपविण्यात आले आहे.चौकशीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- संपदा मेहता
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, चंद्रपूर