সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 20, 2013

मुरलीधर शिंगोटे यांना बाबा आमटे पुरस्कार जाहीर

 परभणी : भांडवलशाहीविरुद्ध जोरदार लढा देत मराठी वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दै. 'पुण्य नगरी'चे संस्थापक-संपादक मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा कै. बाबा आमटे पुरस्कार जाहीर झाला आहे.

६ जानेवारी २0१४ रोजी अक्षदा मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी येथे सायंकाळी ६ वा. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हरिओम सेवाभावी संस्था, परभणी यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कार वितरण सोहळय़ाला डॉ. विकास आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रकाश आमटे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प सुविधेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. यापूर्वीही मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांना विविध प्रकारचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.

दै. 'पुण्य नगरी'चे संस्थापक-संपादक असलेले मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांनी सुरुवातीला वृत्तपत्रात वितरण व्यवसाय आणि त्यानंतर मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, दै. पुण्य नगरी ही वृत्तपत्रे सुरू करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडलेली आहे. कुठल्याही प्रकारचा आधार, राजकीय पाठबळ नसताना शून्यातून विश्‍व निर्माण करून त्यांनी अलौकिक असे यश संपादन केलेले आहे. ही गोष्ट केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला गौरवास्पद अशी आहे. त्यांचे हे यश वाखाणण्याजोगे असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हरिओम सेवाभावी संस्थेने कै. बाबा आमटे पुरस्कार जाहीर केला आहे. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष असलेले बाळासाहेब जाधव यांनी याबाबत पत्र पाठवून बाबा आमटे पुरस्कार जाहीर झाल्याचे मुरलीधर शिंगोटे यांना कळविले आहे. त्यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.