সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 09, 2013

एसटीने बिघडविले प्रवाशांचे बजेट

चंद्रपूर : लोकवाहिनी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यामध्ये वाढ केल्यानंतर आता चंद्रपूरवरून नागपूरला जाण्यासाठी १५३ रुपये, गडचिरोली ८३ तर, शिर्डीला जाण्यासाठी ८५६ रुपये मोजावे लागणार आहे. एसटीने भाडेवाढ केल्याने सामान्य प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांच्या पसंतीची असलेल्या एसटीचे जाळे गावागावांत आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी प्रवासी आपुलकीने एसटीचा प्रवास करतात. डिझेलच्या वाढलेल्या किंमतीमुळे काही महिन्यापूर्वी एसटीने भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडले असतानाच आता पुन्हा भाडेवाढ झाल्याने प्रवाशांची चांगलीच दमछाक होत आहे.
चंद्रपूरवरून नागपूरला जाण्यासाठी पूर्वी १५0 रुपये लागायचे. मात्र याच प्रवासासाठी आता १५३ रुपये मोजावे लागणार आहे. वरोरा ४७, भद्रावती २७ , घुग्घूस २७, राजुरा २७, गडचांदूर ५२, चिमूर १0४, गडचिरोली ८३, मुल ४९, यवतमाळ १७७, वर्धा १५३, अहेरी येथे जाण्यासाठी प्रवाशांना १२४ रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी जलद व साध्यागाडीसाठी प्रत्येक टप्प्याला ६.५८ रुपये द्यावे लागत होते. आता नव्या दरवाढीनुसार १२ ते ४0 कि.मी. च्या प्रवासासाठी १ रुपया आणि ४0 ते १0८ कि.मी.च्या प्रवासासाठी २ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे. चंद्रपूर बस स्थानकामधून ९४ बसेस सुटतात. यामाध्यमातून १५ ते २0 हजार प्रवाशी प्रवास करतात. याशिवाय आंध्रप्रदेशातील करिमनगर, आदिलाबाद, निजामाबाद तसेच मध्यप्रदेशच्या राजनांदगावपर्यंत येथून बसेस जातात. गेल्या वर्षभरात डिझलची अनेकवेळा भाववाढ झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने आता प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र याचा भुर्दंड प्रवाशांवरच बसणार आहे. त्यामुळे महागाई वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

चंद्रपूर येथून जाण्यासाठी असे पडतील दर (रुपयामध्ये)
        जुने दर  नवीन दर
  • नागपूर     १५0   १५३
  • वरोरा      ४६     ४७
  • अहेरी      १२१    १२४
  • वर्धा       १५0    १५३
  • गडचिरोली  ८१   ८३
  • गडचांदूर   ५२   ५९
  • राजुरा     २६   २७
  • भद्रावती   २६   २७
  • घुग्घूस    २६   २७
  • शिर्डी     ८५0  ८५६
  • जाम     ९२    ९४
  • यवतमाळ  १७३ १७७

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.