चंद्रपूर : सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या जीवनावर आधारित शिर्डी के साईबाबा हे महानाट्य येत्या ३० नोव्हेंबरपासून तीन दिवस चांदा क्लब मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी सहा ते १० वाजेपर्यंत चालणा-या या नाटकात साडेतीन हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. संस्कार मल्टी सव्र्हिसेसद्वारा प्रस्तुत, आसावरी तिडके निर्मित हे महानाट्य नटराज सांस्कृतिक कला केंद्र आणि पीक प्लॅनेटच्या वतीने सादर करण्यात येईल. संपूर्ण वैदर्भीय २०० कलावंत यात कला सादर करतील.
३० नोव्हेंबरपासून चंद्रपुरात शिर्डी के साईबाबा