नागपूर - यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कस्तुरचंद पार्कवर जीवनदायी आरोग्य योजनेचे लोकार्पण केले. या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील गोर-गरीब महिलांना आरोग्य सुविधा देणारी ही योजना आहे.
सोनिया गांधी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या जीवनदायी योजनेचे 100 लाभार्थ्यांही या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, फौजिया खान यांच्यासह राज्य शासनातील अनेक मंत्री उपस्थित होते.