সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 11, 2013

सक्रिय लोकप्रतिनिधी हंसराज अहीर

सक्रिय लोकप्रतिनिधी हंसराज अहीर
खासदार हंसराज अहीर मागील अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या परिचयाचे आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ात त्यांना न ओळखणारा माणूस शोधून सापडणार नाही. इतका त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. चंद्रपूर शहरात १९७८ पासून राजकारणात पदार्पण करणार्‍या हंसराज अहीर यांच्या आरोग्य सेवा, रक्तदान आणि युवकांमधील कामांमुळे ते सर्वत्र 'भैय्या' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजकारण करीत आहोत. त्यांच्या सोबत राजकीय आणि समाजकारणाचे घेतलेले संस्कार आजतागायत कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात अनेक थोर नेते झाले असले तरी संसदीय राजकारणात त्यांना फार यश प्राप्त झाले नाही. परंतु, खा. हंसराज अहीर याला अपवाद ठरले आहेत. शांत, निर्गवी आणि संयत बोलण्यातून महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यामुळे त्यांना तत्कालिन लोकसभा अध्यक्षांनी अनेकदा गौरविले. त्यानंतर त्यांनी आपल्या जिल्ह्य़ातील खाण क्षेत्रातील लोकांचे भूमी अधिग्रहणामुळे होत असलेल्या नुकसानीचा आढावा घेत या विरुद्ध सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे खाण क्षेत्रातील भूमी अधिग्रहणाचा मोबदला ८ ते १0 लाख मिळू लागला. येथील विविध उद्योगांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांनाही त्यांनी वाचा फोडली. यामुळे इंग्रजकालीन भूमी अधिग्रहण कायद्यात केंद्र सरकारला कालोचित बदल करावे लागले. यासाठी खा. अहीर यांनी सातत्याने संघर्ष केला. संसदेत यावर २ खासगी विधेयकही सादर केले होते. शेतकरी हिताचे प्रश्न लावून धरुन ते सोडविण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील कोळसा घोटाळा उघडकीस आणून विरोधकांना काँग्रेस विरोधात लढण्याची उमेद जागविणारे खा. अहीर यांच्या अभ्यासूवृत्ती आणि सातत्यामुळे कायम लक्षात राहतील. सतत संघर्ष आणि लोकसंपर्कात अग्रणी असणारे खा. हंसराज अहीर यांच्या वाढदिवशी त्यांना लोकसेवेचा हा वारसा सातत्याने चालविण्यासाठी उदंड आयुष्य प्राप्त होवो, अशी परमेश्‍वर चरणी प्रार्थना.
- राजेश मून
जिल्हा सरचिटणीस, 
भाजपा चंद्रपूर

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.