সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 18, 2013

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना 81 कोटी 84 लाखाची मदत- पालकमंत्री

अद्याक्षराप्रमाणे गुरुवारपासून वाटपास सुरुवात

    अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या 50 टक्के वरील शेतमालाच्या नुकसानीच्या संबंधाने भात पिकाकरीता प्रति हेक्टरी 7500 रुपये तर इतर पिकांकरीता प्रती हेक्टरी 5 हजार प्रमाणे 133 कोटी 39 लाख 77 हजार 500 रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.  त्यापैकी 60 टक्के म्हणजे 81 कोटी 84 लाख 62 हजार रुपयाचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे.  उर्वरीत निधी लवकरच प्राप्त होईल तो सुध्दा वाटप करण्यात येईल असे देवतळे यांनी सांगितले.
    जिल्हयातील 1413 गावे खरीपांचे असून नजर आणेवारीमध्ये 565 गावांची आणेवारी 50 टक्क्याच्या आत आली होती.  सुधारीत आणेवारीत 754 गावाची आणेवारी 50 टक्केच्या आत असल्याचे यावेळी जिल्हाधिका-यांनी सांगितले.   या सर्व शेतक-यांना शासकीय मदत वाटप करण्यात येईल असे ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसांनीसाठी 368 कोटी रुपये  निधी मागणीचा प्रस्ताव पाठविला होता.  त्यापैकी 268 कोटी रुपये मुलभूत सुविधेकरीता मागितले होते असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
    अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलाचे नुकसान झाले असून रस्त्यासाठी 7 कोटी रुपये प्राप्त झाले असून रस्ते दुरुस्तीच्या कामास सुरवात झाली आहे.   त्याचप्रमाणे मनपा अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपयाची मागणी केली असून ती लवकरच प्राप्त होतील असे यावेळी सांगण्यात आले. दाताळा पुलासाठी 23 कोटी व राजूरा पूलासाठी 68 कोटीचा प्रस्ताव पाठविला असल्याचे पालकमंत्री म्हणाले. महानगर पालिकाअंतर्गत मूलभूत सोयीसुविधांकरीता 60 कोटी रुपयांच्या प्रस्तावास आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली असून 30 कोटीचा निधी राज्य शासन देणार असून  30 कोटी रुपये मनपा चंद्रपूर खर्च करणार आहे.  यातून 148 कामे घेण्यात येणार असल्याचे देवतळे यांनी सांगितले.
    डब्ल्युसिएलच्या ओव्हर बर्डनचा आढावा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला असून समितीने या संबंधी काही शिफारशी केल्या आहेत.  त्या शिफारसीवर अंमल करण्यासंबंधी  डब्ल्युसिएलला लेखी निर्देश दिले असून एक महिण्याच्या आत अंमल न केल्यास कायदेशिर कारवाही करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. 
    पूरपरिस्थितीमध्ये ज्या गावांचा संपर्क सतत तुटतो अशा गावांना जोडणा-या पुलांची उंची वाढविण्यासाठी विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.  महानगर पालिका क्षेत्रातील ब्ल्यु लाईन रेड लाईनच्या सॅटेलाईट ईमेज प्राप्त करण्याची कार्यवाही सुरु असून ईमेज प्राप्त होताच पुढील निर्णय घेण्यात येईल असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.          

चंद्रपूर दि.18- चंद्रपूर जिल्हयात जून, जुलै व ऑगष्ट 2013 या महिण्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदान वाटप करण्यासाठी राज्य शासनाकडून 81 कोटी 84 लाख 62 हजार रुपयाचा निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला असून गुरुवार 21 नोव्हेंबर पासून सर्व तालुक्यात अद्याक्षराप्रमाणे गावातील शेतक-यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय देवतळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकलेवार व कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग उपस्थित होते. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.